Wednesday, October 4, 2023
Homeस्पोर्ट्सश्रीलंकेतील क्रिकेटचे भविष्य चांगले नाही म्हणून..या अष्टपैलू खेळाडूंनी श्रीलंका संघ सोडण्याचा घेतला...

श्रीलंकेतील क्रिकेटचे भविष्य चांगले नाही म्हणून..या अष्टपैलू खेळाडूंनी श्रीलंका संघ सोडण्याचा घेतला निर्णय

श्रीलंका क्रिकेट जगताला आतापर्यंतचा सगळ्यात मोठा धक्का बसण्याच्या मार्गावर आहे. मायभूमीत इंग्लंडच्या हातून २-० ने क्लिन स्विप झाल्यानंतर आता श्रीलंकाचे बरेच क्रिकेटपटू आपला देश सोडून दुसऱ्या देशाचे प्रतिनिधित्त्व करण्याच्या विचारात आहेत. अनेकांनी अमेरिका क्रिकेट संघात सहभागी होण्याचे मन बनवले असल्याचे सांगण्यात येत आहे. या वृत्ताने श्रीलंकेसह संपूर्ण क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, श्रीलंका क्रिकेट संघाला अधिक संधी न मिळणे, क्रिकेटपटूंच्या वेतनात कपात होणे अशा कित्येक कारणांमुळे खेळाडू निराश आहेत. याचमुळे त्यांनी नवा पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. मागील महिन्यात श्रीलंकन अष्टपैलू शेहान जयसूर्या अमेरिका क्रिकेट संघात सामील झाला. त्यामुळे इतर क्रिकेटपटूंनीही तोच मार्ग अवलंबण्याचे मन बनवले आहे. क्रिकेटपटूंच्या या निर्णयामुळे श्रीलंका क्रिकेट बोर्डाला मोठा झटका बसू शकतो.

उपुल थरंगासह १५ खेळाडू सोडणार देश
श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज उपुल थरंगा याची क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट सलामीवीरांमध्ये गणना केली जाते. आजवर या ३६ वर्षीय फलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १८ शतके झळकावली आहेत. हाच थरंगा श्रीलंकेची साथ सोडण्याच्या विचारात आहे.

त्याच्याबरोबर दुष्मंत चमीरा, अमिला अपोंसो, मलिंडा पुष्पकुमारा, दिलशान मुनवीरा, लाहिरू मधुशनका, मनोज सरतचंद्रा आणि निशान पेरीससारख्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेट खेळाणाऱ्या खेळाडूंनी अमेरिकेचा रस्ता धरण्याचा पर्याय स्विकारला आहे. मार्च महिन्यापर्यंत हे १५ श्रीलंकन खेळाडू अमेरिकेला रवाना होण्याची शक्यता आहे.

श्रीलंकेत भविष्य चांगले नसल्याने बनवले मन
अमिरेकेला जाण्याचा निर्णय घेतलेल्या एका खेळाडूने मुलाखतीत सांगितले की, “श्रीलंकेत क्रिकेटचे भविष्य चांगले नाही. म्हणून आम्ही अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला आहे. जगातील विविध देशांच्या क्रिकेटपटूंना एकत्रित करुन जगाला चांगले क्रिकेट देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आमचा पगार कमी केल्याने तसेच आमच्या करारात वाढ न केल्याने आम्ही नाराज होतो. आमच्या भविष्याची आम्हाला चिंता होती. त्याच चिंतेमुळे आम्ही नव्या आणि योग्य पर्यायांचा विचार करत होतो. अखेर आता आम्ही अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स