Thursday, June 8, 2023
Homeजरा हटकेशुक्रवारच्या दिवशी अशाप्रकारे करा वैभव लक्ष्मीचं व्रत : करा या वस्तुंचे दान...

शुक्रवारच्या दिवशी अशाप्रकारे करा वैभव लक्ष्मीचं व्रत : करा या वस्तुंचे दान : मिळेल माता लक्ष्मींचा विशेष आशिर्वाद..!!

नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर, हिं दू सनातन ध र्मात देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी महिला शुक्रवारी उपवास करतात. या उपवासाला वैभव लक्ष्मी व्रत असेही म्हटले जाते.

या व्रताची अशी मान्यता आहे की वैभव लक्ष्मीचे हे व्रत केल्याने आणि मनोभावे देवी लक्ष्मीची पूजा केल्याने प्रत्येकाची इच्छा पूर्ण होते आणि आर्थिक संकटातूनही मुक्ती मिळते. तसेच देवी लक्ष्मीची पूजा केल्याने धन, ऐश्वर्य आणि सुख आणि समृद्धी प्राप्त होत असते.

आजकालच्या काळात प्रत्येकाला माता लक्ष्मींचा आशिर्वाद हवा असतो. आपल्या जीवनात पैशाची कमतरता भासू नये म्हणून लोक देवी लक्ष्मींना प्रसन्न करण्यासाठी निरनिराळे उपाय करत असतात. पण मित्रांनो, देवी लक्ष्मींना प्रसन्न करण्याचा सर्वात सोपा उपाय तुम्हाला माहिती आहे का..?

जर माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज असतील तर तुम्ही त्यांचे आशीर्वाद वैभव लक्ष्मीचे व्रत करुन मिळवू शकतात. वैभव लक्ष्मीचे व्रत शुक्रवारच्या दिवशी करावयाचे व्रत आहे. तसेच शास्त्रानुसार शुक्रवार हा माता लक्ष्मी, मा दुर्गा आणि संतोषी मातेचा दिवसही मानला गेला.

वैभव लक्ष्मीचे हे व्रत शुक्रवार च्या दिवशी आरंभ केले पाहिजे आणि फक्त शुक्रवारच्या दिवशीच ठेवले पाहिजे. परंतु एखाद्या परिस्थितीत जर तुम्हाला काही कारणास्तव घराबाहेर जावे लागले, किंवा एखाद्या ठिकाणी नातेवाईकांच्या घरी जावे लागले.

तर तुम्ही त्यापुढील शुक्रवारच्या दिवशी उपवास ठेवू शकतात. अशी मान्यता आहे की हे व्रत केवळ घरीच करावयाचे असते. असे मानले जाते की शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मींची पूजा विधीवत केली तर लक्ष्मीचा आशीर्वाद तर मिळतोच परंतु तो आशिर्वाद सदैव आपल्यासोबतच राहतो.

मित्रांनो, वैभव लक्ष्मीचं हे व्रत पुरुष आणि स्त्रियांनी दोघांनीही हे व्रत केले तर चालते. विशेषत: विवाहित सुवासिनी महिलांसाठी हे व्रत अधिक शुभ आणि फलदायी मानले गेले आहे. उपोषणाचा संकल्प सोडताना, एखाद्या व्यक्तीने मनातील इच्छा सांगणे आवश्यक असते. भक्तांनी ज्यांच्या त्यांच्या श्रद्धेनुसार व क्षमतेनुसार 11 वा 21 व्या शुक्रवारपर्यंत माता वैभव लक्ष्मीचे व्रत अवश्य करावे.

या व्रताचा विधी –
मित्रांनो, या व्रतासाठी शुक्रवारच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठणे गरजेचं आहे. लवकर उठून आंघोळ, आन्हिंकं आवरुन, दिवसभर माता लक्ष्मींचे ध्यान करावे. यानंतर संध्याकाळी पूजेचे साहित्य गोळा करुन, संध्याकाळच्या पूजेची सर्व तयारी करावी.

पूजेला बसण्यापूर्वी स्वच्छ कपडे परिधान करावेत. यानंतर पूर्वाभिमुख आसनावर बसून. आता पाटावर लाल कापड पसरवावे. त्यावर माता लक्ष्मींची आणि श्री यंत्राची मूर्ती ठेवावी. मूर्तीसमोर तांदळाची रास करावी. त्यानंतर त्या रासवर पाण्याने भरलेला तांब्याचा कलश ठेवावा.

कलशावर वाटीमध्ये चांदी किंवा सोन्याचा एखादा दागिना किंवा नाणं ठेवावं. आता माता लक्ष्मी व श्री यंत्राचा मंत्राचा जप करावा. जप करुन झाल्यानंतर, वैभव लक्ष्मीची व्रत कथा वाचावी किंवा ऐकावी. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावावा. पूजेनंतर देवी लक्ष्मींना नैवेद्य अर्पण करावा आणि नंतर तो प्रसाद म्हणून घरातील सदस्यांनी वाटून घ्यावा.

तसेच माता लक्ष्मींची मूर्ती किंवा प्रतिमा, फुले, पुष्पहार, कुमकुम, हळदी, एक मोठा कलश, चंदन, अक्षत, विभूती, मौली धागा, आरसा, कंगवा, आंब्याची पाने, सुपारीची पाने, पंचामृत, दही, केळी, दूध, पाणी, धूप काड्या , दिवे, कापूर, घंटा अशा इ. या वस्तु सुवासिनींना भेट म्हणून द्याव्यात.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स