Thursday, February 29, 2024
Homeअध्यात्मसोमवती अमावस्या.. हे 4 सोपे उपाय करा.. कालसर्प दोष दूर होईल..

सोमवती अमावस्या.. हे 4 सोपे उपाय करा.. कालसर्प दोष दूर होईल..

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. यंदाची म्हणजे या नवीन वर्षाची पहिली सोमवती अमावस्या 20 फेब्रुवारीला आहे. ही माघ अमावस्या सोमवारी असल्याने त्याला सोमवती अमावस्या म्हटलं जातं. या दिवशी स्नान, दान केल्याने पुण्य मिळतं अशी धार्मिक श्रद्धा असते. अमावस्या 19 फेब्रुवारीला दुपारी 4.18 ला सुरू होईल तर 20 फेब्रुवारी दुपारू 12.35 पर्यंत आहे. या दिवशी पहाटे परिघ योग आणि सकाळी 11.30 पासून शिवयोग आहे. परिघ योगामुळे शत्रूंविरुद्ध केलेल्या कार्यात यश मिळेल.

सोमवती अमावस्येला भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. ज्या स्त्रिया व्रत ठेवतात, त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होते. ज्या लोकांच्या कुंडलीत कालसर्प दोष आहे, त्यांनी सोमवती अमावस्येला काही सोपे उपाय करून यापासून मुक्ती मिळवू शकता.

कुंडलीत राहू आणि केतूच्या विशेष स्थानामुळे कालसर्प दोष निर्माण होतो. काय आहेत उपाय जाणून घेऊसोमवती अमावस्येला सकाळी स्नान करून विधीपुर्वक शंकराची पूजा करावी. त्यानंतर शिवतांडव स्तोत्र किंवा शिव रक्षा स्तोत्राचे पठण करावे.

भगवान भोलेनाथांच्या आशीर्वादाने तुम्हाला लाभ होईल. ज्या लोकांना कालसर्प दोष आहे अशा लोकांनी राहू काळात शंकराची पूजा करावी. कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्याचा सर्वज्ञात मार्ग म्हणजे तीर्थस्नान करून चांदीचानाग आणि नागिनीच्या जोडीची पूजा करून त्या नदीच्या प्रवाहात विसर्जित करणे.

त्यानंतर मनापासून नमस्कार करून कालसर्प दोषापासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना करावी. कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे रुद्राभिषेक. रुद्राभिषेक केल्याने कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते.

18 फेब्रुवारी महाशिवरात्रीचा दिवस रुद्राभिषेकासाठी शुभ दिवस आहे. इतर ग्रहदोष यामुळे शांत होतात. राहु ग्रहाला शांत केले तरी कालसर्प दोषातून मुक्ती मिळते. याशिवाय नाशिक किंवा उज्जैनच्या ज्योतिर्लिंग मंदिरात पूजा केल्यास या दोषातून मुक्ती मिळते.

महाकालच्या मंदिर परिसरात नाग मंदिर आहे. जे नागपंचमीला वर्षातून एकदा उघडते. याचे दर्शन व पूजा केल्याने कालसर्पापासून मुक्ती मिळते असे मानले जाते.

कालसर्प दोषामुळे होणारे नुकसान जन्मकुंडलीत जर हा दोष असेल तर त्या व्यक्तीच्या करिअर किंवा व्यवसायात प्रगती होत नाही. वैवाहिक जीवनात अनेक अडळे निर्माण होतातमृत्यूची भीती असून स्वप्नात साप दिसतात. शारीरिक आजार, वेदना, आजारपण इत्यादी गोष्टी होतात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथे सादर केलेले लेख केवळ माहितीच्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज ला लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेयर करा. धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स