स्टारडम ची हवा डोक्यात शिरलेल्या राजेश खन्ना यांच्या जेव्हा कान शिलात बसते..!!

मुंबईतील सिनेमा जगत सर्वांना चांगलंच परिचयाचं आहे.
अनेक यशस्वी अभिनेता, अभिनेत्री यांना त्यांनी केलेल्या स्ट्रगलचं व्यवस्थित भान असतं पण काहीजण केलेलं स्ट्रगल विसरतात.

कधी कधी त्यांना मिळालेलं यश किंवा स्टारडम त्यांच्या डोक्यात जातं. व ते स्वत:ला फार काही समजायला लागतात. असाच एका अभिनेत्यासोबत घडलेला किस्सा आज तुम्हाला सांगणार आहे.

त्या काळी आपले राजेश खन्ना खुपचं फेमस होते. अभिनेता राजेश खन्ना बॉलिवूडचे एक असे अभिनेता आहेत ज्यांचे 15 चित्रपट एकापाठोपाठ सुपर डुपर हिट ठरले होते. त्याकाळी सर्वत्र फक्त आणि फक्त राजेश खन्ना यांचीचं चर्चा असायची.

एक काळ असा होता जेव्हा त्यांच्या मागे पूर्ण दुनिया वेडी झाली होती. मुली अक्षरशः राजेश खन्ना यांच्या नावाचं कुंकू भरायच्या तर प्रत्येक तरुण त्यांच्यासारखी हेअर स्टायल ठेवायचा.

चित्रपट साईन करण्यासाठी त्यांच्या दारात नेहमी निर्मात्यांची लाईन असायची. तेव्हाचा हा एक किस्सा मोठ्या प्रमाणात चर्चेत आला होता. तो म्हणजे एका दिग्गज अभिनेत्याने राजेश यांच्या कान शिलात लगावली होती.

ज्यांनी राजेश यांच्या कान शिलात लगावली ते दुसरे-तिसरे कोणी नसून सिनियर आर्टिस्ट महमूद होते जे इंडस्ट्रीचे मोठे स्टार होते.

अभिनयासोबतच त्यांनी दिग्दर्शनाकडे देखील आपला मोर्चा वळवला. त्यांनी 1979 साली प्रदर्शित झालेल्या ‘जनता हवालदार’ या चित्रपटात राजेश खन्ना यांना साईन केलं होतं. तेव्हा या चित्रपटाचं चित्रीकरण महमूद यांच्या फॉर्म हाऊसमध्ये सुरू होतं.

तर घडलं असं की एकदा महमूद यांचे पूत्र राजेश खन्ना यांना फक्त हॅलो बोलून निघून गेले होते. तेव्हा याच गोष्टीचा राजेश खान्न यांना खुपचं राग आला.

आणि त्यांनी दुसऱ्याच दिवसापासून सेटवर उशिरा येण्यास सुरूवात केली. खन्ना यांच्या उशिरा येण्या मुळे चित्रीकरणाचा देखील खोळंबा व्हायचा. ते रोजचं सेटवर लेट येत असतं. महमूद यांना राजेश खन्ना यांची तासोंतास वाट बघावी लागायची.

एक दिवस महमूद यांचं त्यांच्या रागावरचं नियंत्रण सुटलं आणि त्यांनी राजेश खन्ना यांच्या जोरात कान शिलात लगावली व म्हणाले, ‘सुपरस्टार असशील तू तुझ्या घरचा, मी चित्रपटासाठी तुला पूर्ण पैसे दिले आहेत आणि तुला हा चित्रपट पूर्ण करावाचं लागेल.’

तेव्हा राजेश खन्ना यांच्या डोक्यातून स्टारडम बाहेर आलं आणि ते चित्रीकरणासाठी सेटवर वेळेवर यायला लागले.

Leave a Comment