स्त्रीच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या डोक्यावरील पदराचे आहेत आश्चर्यचकित करणारे फायदे..!!!

आपल्यापैकी बऱ्याचजणांनी स्त्रियांना मंदिरात पूजा करत असतांना डोक्यावर पदर घेतलेले पाहिले असेल. कारण हिंदू धर्मात स्त्रियांना मंदिरात जाताना किंवा कोणत्याही प्रकारची पूजा करताना आपले डोके झाकण्याची सूचना दिली जाते.

पण हे असं का आहे, त्यामागचा विश्वास आणि मान्यता काय आहे? तथापि, असे काय कारण आहे की स्त्रियांनी कोणत्याही प्रकारची पूजा करताना डोक्यावर पदर घेणे आवश्यक आहे. तुम्हालाही यामागील खरे कारण माहित नसेलच, चला तर जाणुन घेऊयात की डोक्यावर पदर घेण्याचे महत्त्व काय आहे…

असे म्हणतात की, डोक्यावर पदर घेतल्याने एखाद्याचे लक्ष केंद्रित केले जाते. याचा अर्थ असा की जर डोक्यावर पदर घेऊन देवताची उपासना केली गेली तर चित्त इकडे-तिकडे भटकत नाही. याद्वारे,एखादी व्यक्ती अगदी सहजपणे देवाच्या भक्तीसाठी आपले मन समर्पित करण्यास सक्षम ठरते.

कारण आपल्या धर्मग्रंथात असे म्हटले आहे की, ज्या उपासनेत परमेश्वराकडे लक्ष केंद्रीत होत नाही ती उपासना काहीच उपयोगाची नाही. वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे डोक्याच्या मध्यभागी मध्यवर्ती चक्र आढळते. असे म्हटले जाते की डोके झाकून देवाची उपासना केल्याने या चक्रावर द्रुत परिणाम होतो, ज्यामुळे बरेच प्रकारचे फायदे प्राप्त होतात.

यासह असेही म्हटले आहे की, डोक्यावर पदर घेऊन पूजा केल्यास नकारात्मक ऊर्जा व्यक्तीच्या आत प्रवेश करत नाही. यामुळे, व्यक्तीच्या मनात सकारात्मकता कायम राहते. अशा परिस्थितीत, एखादी व्यक्ती सहजपणे आपले लक्ष देवावर केंद्रित करू शकते.

आपल्या भारतीय संस्कृतीत प्राचीन काळापासून स्त्रियांनी डोक्यावर पदर घेण्याची प्रथा चालत आलेली आहे. आजही आपल्या घरातील ज्येष्ठ स्त्रिया डोक्यावर पदर घेताना आपल्याला दिसतात.

परंतु आधुनिक जीवनशैली व पाश्चात्यांचे अनुकरण करून हळूहळू डोक्यावर पदर घेण्याची पद्धत कमी कमी होत आहे. आताच्या मुलींना डोक्यावर पदर घेणारी स्त्री काकूबाई वाटते.

ते काही अंशी खरेही आहे. स्त्रिया आता प्रत्येक बाबीत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत.आपल्या घराची कुटुंबाची जबाबदारी पुरुषांइतकीच स्त्रिया घेत आहेत.

किंबहुना पुरुषांपेक्षा जास्त स्त्रियांचे घरात योगदान आहे. मग नुसता पदर सांभाळत बसण्यात काय अर्थ आहे. काही क्रियांना बंधन म्हणतात.

पण तो पदर घेणे म्हणजे काही वाईट गोष्ट नाही. पदर म्हणजे मर्यादा आहे. आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीचा मान ठेवणे. त्यांचा आदर करणे. हे पदराद्वारे दाखवता येते. परंतु नुसता डोक्यावर पदर घेऊन खरोखर आपण समोरच्या व्यक्तीला मान देऊ शकता का हो?

काही स्त्रिया बाहेर डोक्यावर पदर घेतात अगदी नाकापर्यंत पदर घेतला जातो परंतु घरात त्यांची वागणूक अतिशय चुकीची असते. आपण चांगली वर्तणूक करून सर्वांशी मिळून मिसळून राहून आपला आदर व प्रेम व्यक्त करू शकतो. त्यासाठी डोक्यावर पदर घेण्याची काही आवश्यकता नाही.

परंतु आपण जेव्हा एखादे धार्मिक कार्य करीत असतो. देव पूजा होम हवन करीत असतो. त्यावेळी डोक्यावर पदर जरूर घ्यावा. कारण मनुष्यांना नाही परंतु देवी-देवतांना मान जरूर द्यावा.

आपण कितीही मोठे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असलो तरीही भगवंता पेक्षा मोठे नक्कीच नाहीयेत. या गोष्टीचे नेहमी भान ठेवावे. पदर म्हणजे मान, सन्मान, आणि मर्यादा आहे. पदर म्हणजे दोन व्यक्तींमध्ये पडदा असतो.

पूर्वीच्या प्रत्येक प्रथा परंपरा चुकीच्या आहेत,असे अजिबात नाहीये. खरे म्हणजे पदर घ्यावा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु स्त्री साडीत व पदरात जितकी सुंदर भारदस्त व जातिवंत दिसते. तितकी ती इतर कोणत्याही वेशभूषेत दिसत नाही. इतके नक्की, काही मर्यादा असतात त्या पाळाव्याच लागतात.

परंतु त्या किती दिवस आणि कोठे कोठे पाळायच्या हे आपले आपल्यालाच ठरवायचे आहे. कोणतीही प्रथा किंवा परंपरा आपल्या डोक्यावरील ओझे होऊ नये, इतकीच अपेक्षा..

तसेही अमेरिका जपान जर्मनी रशिया किंवा इतर कोणताही देश बघा. त्या देशांमध्ये एकाही स्त्रीचे नाव आपण पतिव्रता स्त्री म्हणून घेत नाहीत. परंतु आपल्या भारतीय संस्कृतीत किती तरी स्त्रियांना पतिव्रता म्हटले जाते.

शेवटी काय…संस्कार व संस्कृती टिकवून ठेवणे व पुढच्या पिढीकडे सुपूर्द करणे हे आपल्याच हातात आहे. आपली भारतीय संस्कृती यावच्चंद्रदिवाकरौ म्हणजे जोपर्यंत आकाशात सूर्य व चंद्र आहेत तो पर्यंत महान असेल…

टीप : वर दिलेली सर्व माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपलं पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment