स्त्रीच्या या एका सौभाग्य लेण्या मुळेच, पतीला लाभते दिर्घायुष्य..!!!

मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या हिंदू परंपरेतील एका स्त्रीच्या सौभाग्य लेण्याबद्दल… मित्रांनो, आपल्या भारतातील जवळ जवळ सर्वच स्त्रिया हातांमध्ये बांगड्या घालत असतात.. तर आपल्या संस्कृतीत या बांगड्या घालणे का इतके आवश्यक मानले जाते..??

मित्रांनो, आजकाल आपण बघतो की अनेक स्त्रिया विवाहिता असूनही आपल्या हातांमध्ये बांगड्या वापरत नसतात. आपल्या हिंदू संस्कृतीमधील ही एक पद्धत आता कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे.

तर मित्रांनो, असे समजा की या लेखाचा आपला मूळ उद्देश हाच आहे की या जास्तीत जास्त स्त्रीवर्गापर्यंत हा लेख आपल्याला पोहचवायचा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हे माहीती आहे का पुर्वीच्या राजघराण्यातील अनेक महिला राण्या, महाराण्या सुद्धा सोने आणि चांदीच्या बांगड्या घालत असत.

या बांगड्या घातल्यानंतर न केवळ त्या सुंदर दिसायच्या परंतु त्यांच्या सौंदर्यात बांगड्यामुळे अजूनही भर पडत असे. खरं तर या बांगड्यांमुळे स्त्रियांच्या मनामध्ये एक प्रकारचा सात्विक भाव तयार होत असतो. तसेच ही सवय एक सुसंस्कृत पणाचं लक्षण म्हणूनही ओळखली जाते. त्याचसाठी स्त्रीयांनी या बांगड्या घालाव्यात. तसेच त्या त्या उत्सवाच्या वेळी केवळ सौंदर्य खुलवण्यासाठी स्त्रीने बांगड्या या घालाव्यात.

मित्रांनो, या बांगड्या घातल्याने सोन्याच्या आणि चांदीच्या, या धातूंचं शरिरावर घर्षण होत होते, आणि त्या धातुंचे गुण स्त्रियांच्या शरीरामध्ये उतरत असतात. परिणामी त्यांचं शरीर अधिक सुदृढ, बलवान बनते. आणि हेच कारण आहे की जुन्या स्त्रियांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती देखील जास्त असायची.

मित्रांनो, आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की सोन्याच्या बांगड्या घातल्याने रोगप्रतिकारक शक्ती कशी काय वाढू शकते. किंवा कुणाचे शरीर सुदृढ कसे बनू शकते. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की आजही आयुर्वेदामध्ये, होमिओपॅथीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सोने आणि चांदीचा वापर केला जात असतो.

सोने आणि चांदिचे भस्म जर आपण योग्य प्रमाणात शरीरामध्ये घेत गेलो तर आपली रोगप्रतिकारक शक्ती कितीतरी पटींनी वाढण्यास मदत होते. याच कारणामुळे पूर्वीच्या स्त्रिया सोने आणि चांदीच्या बांगड्या घालत असायच्या. हातातील धातूंचा घर्षणामुळे त्या धातूचे लहान लहान कण हे आपसूकच त्यांच्या शरीरामध्ये प्रवेश करायचे.

आणि याचमुळे स्त्रियांची शक्ती देखील वाढते. त्यांना दीर्घायुष्य सुद्धा लाभायचे. म्हणजे त्याकाळी स्त्रिया जास्त काळ जगत असतं. या धातूंचे तत्व त्यांच्या शरीरामध्ये निर्माण झाल्याने स्त्रियांची हाडे मजबूत होण्यास मदत मिळत असे.

आजकाल आपण पाहतो की स्त्रीया कमजोर फारच होत आहेत. त्या रोजच्या दगदगीमुळे लगेच थकून जातात. त्यांना कोणतेही काम करतांना दम लागून येतो. काही सतत आजारी पडलेल्या असतात आणि म्हणूनच अशा स्त्रियांनी सोने चांदीच्या किंवा इतर प्रकारच्या बांगड्या नक्कीच वापरायला हव्यात.

तुम्ही जर इतर कोणत्याही प्रकारच्या बांगड्या बद्दल म्हणत असाल तर त्याला अजूनही एक कारण आहे. स्त्रीयांनी या बांगड्या घातल्याने घरामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. या बांगड्यांच्या घर्षणामुळे जेव्हा किणकिण निर्माण होत असते त्यामुळे आपलं घर प्रसन्न राहतं. या आलदायक आवाजामुळे त्या स्त्रीच्या पतीला दीर्घायुष्य लाभते असे मानले जाते.

मित्रांनो, या बांगड्यांच्या आवाजाचा इतका शुभ प्रभाव देखील आहे. तसेच यामुळे देवी-देवतांची निस्सिम कृपा त्या घरावर सदैव बनून राहते. ज्या घरांमध्ये अशा प्रकारे बांगड्यांचा आवाज रोज ऐकू येत असतो त्या घरांमध्ये सुख, शांती, समृद्धी,पैसा, भरभराटी तसेच माता लक्ष्मींचा आशीर्वाद या सर्व गोष्टी आपोआपच प्राप्त होत असतात.

मित्रांनो, सर्वात महत्वाची बाब म्हणजे बांगड्या घातल्याने त्या स्त्रीच्या मनावर एक प्रकारचा संयम तयार होतो. संसार जर व्यवस्थित चालवायचा असेल तर स्त्रीने हातांमध्ये बांगड्या घातल्यास तो संयम आपोआप तिच्यामध्ये तयार होत असतो. आणि त्याच संयमाच्या बळावर स्त्री आपल्या कुटुंबाचा, आपल्या संसाराचा गाडा पुढे व्यवस्थित ओढून नेऊ शकते.

म्हणून जर तुम्ही बांगड्या घालत नसाल तर, आजपासून नक्की बांगड्या वापरण्यास सुरुवात करा. विवाहित महिलांनी तसेच माता बहिणींनी नक्कीच बांगड्या परिधान करायला हव्या. आणि आपल्या हिंदू संस्कृतीचे आपल्या भारतीय संस्कृतीचं रक्षण करायचं असेल तर यांचा आपल्याला सार्थ अभिमान देखील असायला हवा.

तसेच संस्कृती टिकवायची असेल, पुढे वाढवायची असेल, या संस्कृतीचं संवर्धन करायचं असेल तर आपण हिंदू धर्म आणि संस्कृतीत सांगितलेल्या गोष्टींना वैज्ञानिक दृष्टिकोनातून स्वीकारायला हवे त्यांची सवय करायला हवी.

टीप- येथे दिलेली सर्व माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा,शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment