स्त्रियांनी गायत्री मंत्र का म्हणू नये.? बघा शास्त्रोक्त आधार काय सांगतो..

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… शास्त्र जे करू नका म्हणते; तेच नेमके करावयास धावणे, हा सामान्य स्वभाव असतो. आणि त्यामुळेच नाश होत असतो, हे आपणांस समजत नाही.

असे परमपूज्य सद्गुरू श्री.मामासाहेब देशपांडे महाराज त्यांच्या ‘अभंग अमृत’ या ग्रंथात पान क्रमांक १७८ वर सांगतात आणि हे समजावण्यासाठी खालील कथा सांगतात-

स्त्रिया आणि गायत्रीमंत्र – सहज विषयांवरून विषय निघाला; म्हणून मला माझ्या आईची गोष्ट आठवली. माझ्या मातुःश्री (परमपूज्य सद्गुरु मातु:श्री पार्वतीदेवी देशपांडे) या परमार्थातील एक थोर अधिकारी होत्या. त्यांच्याकडे अनेक स्त्रिया मार्गदर्शनासाठी येत असत. एकदा अशाच पाच-सहा जणी त्यांच्याकडे आल्या होत्या. चर्चा सुरू झाली.

एका बाईने आमच्या मातुःश्रींना विचारले की, “बायकांनी गायत्री मंत्र का म्हणू नये.? त्यावर आमच्या मातुःश्री चटकन् सावरून बसल्या. एक-दोन मिनिटे स्तब्धतेत गेली. मग त्या सांगू लागल्या; “हा प्रश्न योग्य आहे. या प्रश्नाचे उत्तर देण्याची माझी पात्रता नाही. परंतु मला एक माहीत आहे की, सर्व ऋषी,मुनी, साधू, संत सदैव आपल्या हिताचेच सांगत असतात. त्यावर माझा नितांत विश्वास आहे. माझे तीर्थरूप पू.श्री.नारायणराव सोनटक्के हे मोठे अभ्यासक होते. अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ महाराज यांचे ते निःसीम भक्त होते.

गायत्रीमंत्राची अक्षरे आहेत चोवीस ! प्रत्येक अक्षर एका एका नाडीद्वारे प्रकाशित होत असते. जसे टाईपरायटरवर एकेका अक्षरासाठी एक एक बटण असते आणि ते दाबले की, नेमके तेच अक्षर उमटते. तसे गायत्रीमंत्रातील प्रत्येक अक्षर एकेका नाडीद्वारे प्रकाशित होते. पुरुषांना पूर्ण चोवीस नाड्या आहेत. परंतु स्त्रियांना मात्र फक्त बावीसच नाड्या आहेत. त्या दोन नाहीत, त्यामुळे स्त्रियांना दाढी-मिशा येत नाहीत व प्रोस्टेट ग्रंथी वाढत नाही.

या अशा दोन नाड्या कमी असल्यामुळे, चोवीस अक्षरांचा गायत्रीमंत्र जपला तर उपयोगी पडत नाही.ज्याप्रमाणे टाईपरायटरवर जेवढा कागद असेल, तेवढीच अक्षरे उमटणार. आणि कागद संपल्यावर अक्षरांची बटने दाबली तरी अक्षरे उमटणार नाहीत. त्याप्रमाणे ही अक्षरे परिणाम करू शकणार नाहीत.

इतकेच नव्हे तर.. गायत्रीमंत्र हा पुरुषबीज वाढविणारा मंत्र असल्यामुळे, तो जपल्याने बीज वाढू शकते. शास्त्र असे आहे की, स्त्रियांमध्ये बीज वाढू नये; शोणित वाढावे. स्त्रियांनी गायत्रीजप केला तर, शोणित जळून जाईल. त्यामुळे या जन्मी केलेला जप,पुढल्या जन्मी धड स्त्री नाही, धड पुरुष नाही असा तृतीयपंथी बनवतो.

अशांना दाढी-मिशा येतात. परंतु त्याचबरोबर लुगडे नेसण्याची हौस निर्माण होते. स्त्रियांप्रमाणे हातवारे करावे असे वाटू लागते. या सर्व पूर्वजन्मीच्या स्त्रीवा’सना! परंतु, त्या जन्मात गायत्री जपल्यामुळे बीज वाढले, दाढी-मिश्या फुटल्या; पण मूळचे स्त्रीसंस्कार असल्यामुळे लुगडे नेसण्याची हौस मात्र राहिली. असे होऊ नये, शोणित जळू नये, अर्धवट बीज वाढू नये; यास्तव बायकांनी गायत्री जपू नये !”

आजकाल, स्वतःचा मोठेपणा सांगण्याकरिता, “तुम्ही करा; काही होत नाही. मी आहे ना !” असे सांगण्याचे फॅडच आहे. परंतु ऐकणाऱ्यांच्या हे लक्षात येत नाही की, आपण असे केले तर काय घडेल. ?

प.प.श्री.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी, तसेच सर्व प्रमुख आचार्यांनी म्हणून च सांगितले आहे.. स्त्रियांनी गायत्री मंत्र म्हणू नये.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

Leave a Comment