सुखाचे सारे झरे.. होते आटलेले.. शिवता मलाही आले.. स्वामी कृपेने आयुष्य हे फाटलेले… स्वामी असता पाठीशी…

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो मी व माझे सर्व कुटुंबीय श्री स्वामी समर्थ महाराजांचे सेवेकरी असून आम्ही मनोभावाने स्वामींची सेवा करतो अर्थात आमच्याकडून परमपूज्य गुरुमाऊली साक्षात स्वामी रुपात राहून सेवा करून घेतात सेवेकरी झाल्यापासून मला बरेच अनुभव आले परंतु त्यापैकी एक महत्त्वाचा अनुभव आपल्या पुढे मांडत आहे.

मित्रांनो, मित्रांनो दिनांक 12 जानेवारी 2012 ला रेल्वेने प्रवास करीत असताना माझा भीषण अपघात झाला या अपघातात माझा डावा पाय संपूर्ण कापला जाऊन कमरेपासून खाली दुसऱ्या पायाच्या संपूर्ण संवेदना गेल्या होत्या उपचारावर लाखो रुपये खर्च करून सुद्धा मी आज शारीरिकरित्या परावलंबी झालो आहे माझ्या परिवारात पत्नी व दोन लहान मुले असून आर्थिक दृष्ट्या माझ्याच मिळकतीवर अवलंबून होते. परंतु या अपघातामुळे माझे मिळकत पूर्णतः बंद झाली होती.

त्यामुळे आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट व्हायला किती झाले होते परंतु कोणत्याही प्रकारे आर्थिक उत्पन्न नसल्याने मुलींचे शिक्षण गृह कर्ज उपचाराचा खर्च व परिवार संगोपनाची बाहेर चिंता मला स्वतःहत होती परिवारासह या जगातून निरोप घेण्याशिवाय पर्याय दिसत नव्हता.

जीवन मरणाच्या परिस्थितीत जीवनाचा प्रवास सुरू होता अचानक एक सेवेकरी आम्हाला भेटले. त्यांनी माझ्या पत्नीला दिंडोरी प्राणी सेवा मार्गाची माहिती दिली व सेवा केंद्रात येऊन सेवा घेणे विषयी सुचविले. त्याप्रमाणे अतिशय नकारात्मक मानसिकतेने आम्ही सेवेला सुरुवात तर केली महाराजांच्या आशीर्वादाने आम्हाला मानसिक बळ मिळू लागले.

हळूहळू नकारात्मक विचार दूर सरत गेले. दरम्यान लहान मुलीचे चांगले शाळेत अचानकपणे ऍडमिशन झाले व मला माझ्या सोयीप्रमाणे होईल शेअर वर बसून काम करता येऊ शकेल अशा कामासाठी कंपनीकडून रिजॉयनिंग ऑर्डर पत्र मिळाले.

आपल्या माध्यमातून चार दिवसात सहा लाख श्री स्वामी समर्थ मंत्र जपची सेवा मी प्रतिकूल परिस्थितीत जमेल तशी केली सेवेत काही चूक झाली असल्या क्षमस्व माझ्यासोबत जगले ते माझे भाऊ परंतु स्वामी महाराजांची सेवा मिळाली हे माझे नशीब. स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने परिवाराचे व्यवस्थित रित्या संगोपन सुरू झाले. माझ्या जीवनाची गाडी स्वामी महाराजां मुळे पुन्हा एकदा फुलावर आली.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Leave a Comment