Tuesday, March 19, 2024
Homeअध्यात्मसुतक म्हणजे काय.? सुतकात गणपती कसा बसवायचा.?

सुतक म्हणजे काय.? सुतकात गणपती कसा बसवायचा.?

मित्रांनो घरी कोणाचे निधन झाला असेल, कोणाचा जन्म झाला असेल, सुतक चालू असेल तर गणपती बसवावेत की नाहीत??

गोंधळ उडून जाण्याची दोन कारणे आहेत पहिली गोष्ट म्हणजे सुतक या गोष्टीबद्दल आपल्या समाजामध्ये सगळ्याच बाबतीत याच्याविषयी बरेच समज पसरले आहेत.
आणि दुसरं कारण म्हणजे अनेक गोष्टींमध्ये आपण स्वतःच्या डोक्याने जर निर्णय घेतो.

ते देव धर्माच्या बाबतीत आपण घ्यायला भितो. ते बिना बंद झालं तर या गोष्टीत डोक्याला होणारा त्रास बंद होतं. आणि देवधर्माच्या बाबतीत आपल्या डोक्याने निर्णय घेणं यामध्ये काही चुकीचं नाही.

जर सुतक चालू असेल तर अशावेळी गणपती हा उत्सव आहे की व्रत आहे हा पहिला मुद्दा असतो. जर ते व्रत असेल तर सुतक मध्ये गणपती दुसऱ्याकडून कुणाकडून तरी बसवला गेला पाहिजे. आणि आपण मनात त्याचे स्मरण करत राहिले पाहिजे.

स्मरण करण्यासाठी सुतक सोयरे आडवे येत नाही. पण जर दुसर्‍या कोणी गणपती बसवला तर गणपतीचे सगळं करायचं पण त्यांनीच आपल्याला सुतक आहे म्हटल्यानंतर. गणपती घेऊन यायचा त्यांनी, गणपतीचे साहित्य पण त्यांनीच आणायचं, पाणी पण त्यांनीच आणायचं, बसवायचा पण त्यांनीच आणि गणपतीचे दोन टाईम आरती पण त्यांनीच करायचे.

आरती अगदी साधी करायचे फक्त उदबत्ती व्हायची म्हटले तरी सुद्धा सगळं त्यांनीच करायचं. किंवा आपलं सुतक संपल्यानंतर एक दिवस गणपती आणून त्याचे विसर्जन करावे म्हणजे आपलं जे काही व्रत असेल ते तोडण्याचं काही पातक जे धार्मिक सांगितलेला असतं ते लागू नये.

आपल्या स्वतःच्या मनाला लागते हे जास्त महत्त्वाचा आहे ते होऊ नये म्हणून असं करायचं पण घरात म्हणून करत नसाल. गणपती सगळे बसवतात म्हणून आम्ही ही बसवतो अस असेल तर तो उत्सव आहे.

मग तो नाही केला तरी काही हरकत नाही. मग त्यामध्ये पाप लागण्याचा प्रश्न
येत नाही. त्यामुळे एक वर्ष झालं तरीही चालतं. कारण गणेशोत्सव हा लोकमान्य टिळकांनी चालू केला आहे आणि हा उत्सव सामाजिक गरजेपोटी, सामाजिक कारणाने सुरू केलेला होता त्यातील सहभाग म्हणून घरोघरी गणपती बसायला लागले.

आता तो उद्देशही राहिला नाही पण देवाचा आहे म्हटल्यावर श्रद्धेचा भाग मात्र शिल्लक राहिला आहे.
ते व्रत असू दे किंवा उत्सव असू दे जर कोणी दुसरा माणूस येऊन गणपती बसवणार असेल तर त्यांनी बसवावा.

आता आपण सुतक म्हणजे काय हे बघू या:
सुतक म्हणजे आपल्या घरामध्ये एखादी दुःखद घटना घडलेली आहे. आणि त्या घटनेच क्रिया करम इत्यादी सगळ्या गोष्टी संपेपर्यंत जो वेळ आहे तो वेळ कुठे दहा दिवसाचा कुठे नऊ दिवसाचा असतो.

तो सगळा वेळ दुःखाचा आहे त्यामुळे लोकांमध्ये सहभागी व्हायचं नाही. सुतक चालू असताना जर शिवाशिव झाली तर आंघोळ करायला पाहिजे असं काही नसतं.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स