सुवासिनींनी त्यांच्या या 6 गोष्टी कधीही कुणासोबत वाटून घेऊ नये..!! नाहीतर आयुष्यभर र’डत बसावं लागेल..!!

मित्रांनो, आपल्या भारतीय महिला काही बाबतीत खुपचं भोळ्या असतात. मग त्या भोळेपणा मध्येच त्या काही चूका करून फसतात.. होतं काय या सुवासिनी महिला बर्‍याचदा आपल्या मैत्रिणीं सोबत, आसपासच्या, किंवा शेजारच्या ओळखीच्या गृहिणीं सोबत घरातील बऱ्याच काही गोष्टी शेयर करत असतात. आणि मग असंच गप्पांमध्ये अनेक विषय निघतात. साडी, कपडे, किंवा इतर काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा वाढत जाते.

उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या शेजारणीने किंवा नात्यातील एखाद्या महिलेने त्यांना कौतुकाने जर म्हटले की तुझ्या कपाळावरील कंकू खूपच छान दिसतंय कुठे घेतलेलं आहे..?? तसेच त्यांच्या हातातल्या बांगड्यांना बघून कुणी म्हणालं की चांगल्या दिसत आहेत कुठल्या दुकानांतून विकत घेतल्यात..??

मग होतं काय असं कोडकौतुक ऐकून त्यांना जरा हवेत असल्या सारखं वाटायला लागतं की, कुणीतरी आपलं कौतुक करत आहेत. कोणाकडूनही असं कौतुक ऐकल्यानंतर त्या लगेचच हातातील बांगड्या काढून त्यांना ट्रायल साठी देतात, पण त्या या गोष्टीपासून अनभिज्ञ असतात की असे केल्याने त्या स्वत:वर काही संकट ओढावून घेत आहेत.

शास्त्रानुसार लग्न झालेल्या महिलांनी ज्या की सुवासिनी असतात, त्यांनी त्यांच्या काही गोष्टी इतरांसोबत शेयर करू नयेत. असे केल्याने केवळ त्यांचे वैवाहिक सं-बंध कमजोर होतात. तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की विवाहित महिलांनी आपल्या नातेवाईक महिला किंवा मैत्रिणींसोबत कोणत्या गोष्टी शेयर करायला नाही पाहिजे.

कपाळाचं कुंकू –

मित्रांनो, आपल्या भारतीय शास्त्र परंपरेनुसार ‘कुंकू’ हे सुवासिनी महिलांचे सर्वात मोठे सौभाग्य चिन्ह मानले जाते. म्हणूनच सुवासिनींनी कधीही आपण वापरत असलेलं कुंकू दुसर्‍या कुणालाही देऊ नये. हाच नियम टिकलीच्या बाबतीत सुद्धा लागू पडतो. त्याबद्दल पुढे सविस्तर वाचणार आहोतच..

याउलट तुम्ही त्यांना एक नवीन कुंकवाची डबी भेट म्हणून देऊ शकतात. त्याच प्रमाणे सुवासिनी महिलांनी दुसर्‍या कुणासमोर कपाळावर चुकूनही कुंकू लावू नये. तसे केल्याने आपल्या वैवाहिक जिवनात अनेक अडथळे निर्माण होण्याची दाट शक्यता असते.

स्वतःच्या विवाहामध्ये घेतलेले कपडे –

सुवासिनींनी त्यांच्या लग्नसमारंभात जे काही कपडे घातले असतील, त्यापैकी काही लग्नाचे कपडे असतील किंवा हळदीच्या दिवसाच्या पिवळ्या रंगाच्या साड्या असतील, तर यापैकी कोणतीही वस्तू दुसऱ्या कोणाला वापरायला तसेच घालायला देऊ नये. असे केल्याने सुद्धा तुमचे वैवाहिक जीवन आणि सौभाग्य सुद्धा धोक्यात येण्याची शक्यता असते.

डोळ्यातींल काजळ –

मित्रांनो, काजळ हे केवळ महिलांच्या डोळ्यांचे सौंदर्यच वाढवत नाही तर इतरांच्या वाईट नजरांपासून सुद्धा ते आपले संरक्षण करत असते. असे मानले जाते की सुवासिनी महिलांनी कधीही त्यांच वापरात असलेलं काजळ कुणाबरोबर शेयर करू नये. असे केल्याने त्यांच्या प्रति असलेले पतीचे प्रेम कमी व्हायला लागते आणि परिवारात भांडणं देखील होतात.

टिकली. –

कुंकवासारखीच टिकली देखील सुवासिनींच्या सौभाग्याच्या चिन्हांपैकी एक चिन्ह मानली जाते. म्हणून कोणत्याही सुवासिनीने आपली टिकली कुणालाही वापरायला देऊ नये.

शास्त्रांनुसार अशी मान्यता देखील आहे की सुवासिनीने स्वतःच्या कपाळावरील टिकली काढून इतर कुणाच्या कपाळावर लावल्याने पतीचे प्रेम हे दोघांत विभागले जात असते. जर आपण एखाद्याला टिकली देऊ इच्छित असाल तर त्यांना नवीन टिकलीचे पॅकेट खरेदी करून भेट म्हणून द्यावे.

मेहंदी –

आपल्या हिंदू परंपरेत मेहंदीला सुद्धा सौभाग्य खूण समजले जाते. असे मानले जाते की मेहंदी जितकी जास्त एका स्त्रीच्या हातावर रंगते तितकेच जास्त प्रेम त्या सुवासिनीला तिच्या नवऱ्याकडून मिळते.

त्याच बरोबर जर आपण एखाद्या इतर स्त्री ला आपली मेहंदी लावण्यासाठी दिली तर नवऱ्याचे प्रेम देखील विभागले जाते. आणि अशा परिस्थितीत उरलेली मेहंदी कधीही इतर कोणत्याही सुवासीनीला देऊ नये.

हातातील बांगड्या आणि पैंजण –

आपल्या शास्त्रात असेही म्हटले जाते की सुवासिनी च्या हातातील बांगड्या आणि तिच्या पायातील पैंजणाचे, महत्त्वं एका सुवासिनीच्या आयुष्यामध्ये अनन्यसाधारण आहे. साधारणपणे महिला काय करतात एखाद्या कार्यक्रमात सजून जाण्यासाठी, ओळखीच्या इतर कुणाकडूनही कपड्यांना मॅचिंग होणाऱ्या बांगड्या घेत असतात.

तसेच इतरांकडून मॅचिंग पैंजण तातपुरते वापरण्यासाठी घेत असतात. परंतु असे करणे सुद्धा खूप अशुभ मानले जाते. अशा वेळी जर कुणी तुमच्या कडे तुमची आभूषणं मागायला आलेत तर कधीही आपल्या बांगड्या तसेच पैंजण दुसऱ्या कुणासोबत शेयर करु नका. तसे केल्याने वै’वाहिक जीवनात अशांतता निर्माण होण्याची शक्यता असते.

टिप – वरील माहिती ही विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

Leave a Comment