नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं पेज रॉयल कारभार वर… मित्रांनो, काही वेळेला जेव्हा आपण एखाद्या महत्त्वाच्या कामानिमित्त घराबाहेर पडतो परंतु ते कार्य करण्यात खूपच अडचणी येतात किंवा ते काम कधी कधी अपूर्ण राहुन जाते…. आणि मग आपण निराश होतो.
मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार जर आपण एखाद्या चांगल्या कामासाठी घराबाहेर पडत असाल तर त्यापूर्वी असे काही खास उपाय केलेत तर आपल्याला निराश व्हावे लागणार नाही आणि इच्छित कार्य तडीस जाईल.
आपणास हमखास यश लाभेल. याचकरीता आज आम्ही त्या वास्तु उपायांबद्दल येथे सांगत आहोत, ज्याद्वारे तुम्हाला तुमच्या कामामध्ये नक्कीच यश मिळेल. तसेच आठवड्यातील प्रत्येक वाराला काय करावे ज्यामुळे तुम्हाला कुठल्याही कामात अडथळा येणार नाही…!! ते देखील सांगणार आहोत.
सोमवार – वास्तुशस्त्रानुसार सोमवारी आपण काही खास काम करण्यासाठी घराबाहेर जात असाल तर निघण्यापूर्वी आरशात आपला चेहरा पाहूनच बाहेर पडावे. असे केल्याने आपले काम यशस्वीपणे पूर्ण होईल.
मंगळवार – जर तुम्ही मंगळवारच्या दिवशी काही कामानिमित्त घराबाहेर पडत असाल तर घरातून निघण्यापुर्वी एखादा गोड पदार्थ खाऊनच बाहेर पडावे. जर तुम्ही बेसनाचे लाडू किंवा गुळ खाल्ला तर तुमचं जे ही काम असेल ते सहज होईल.
बुधवार – जर तुम्ही बुधवारी काही खास काम करायला बाहेर जात असाल तर हिरव्या कोथिंबीरीचे पदार्थ किंवा कच्ची कोथिंबीर खाल्ल्याने खुप फायदा होईल आणि कोणतेही कठीण काम असो ते अतिशय पटकन पूर्ण होईल. तसेच हा उपाय केल्याने तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश मिळेल.
गुरुवार – आपण गुरुवारी घराबाहेर पडताना जर थोडेसे मोहरीचे दाणे खाल्लेत तर आपले काम नक्कीच निर्विघ्नपणे पार पडणार असे समजावे.
शुक्रवार – आपण शुक्रवारी काही खास काम करण्यासाठी कुठे जाणार असाल तर दुधापासून बनवलेले पदार्थ खाऊन बाहेर पडावे, मित्रांनो, खास करुन तुम्ही दही खाऊन घराबाहेर पडावे. कुठलीही अडचण न येता आपले काम अगदी चोखपणे पार पडेल.
शनिवार – मित्रांनो, तसेच तुम्ही शनिवारी काही कामानिमित्त बाहेर जात असाल तर तुम्ही आले किंवा तूप खाऊन घराबाहेर पडावे. असे केल्याने आपले काम त्वरित पूर्ण होईल.
रविवार – रविवारी तुम्ही काही अत्यंत महत्वाच्या कामासाठी बाहेर जात असाल तर आपल्याबरोबर एक सुपारी ठेवावी. त्यामुळे तुमचे कितीही महत्वाचे काम असू द्या, ते विनाविलंब व विना काही अडचणी शिवाय पार पडेल.
मित्रांनो, जर तुम्ही वरील प्रमाणे उपाय केले… तर अर्थातच तुमची सर्व कामे कुठलीही आडकाठी न येता नक्कीच पूर्ण होतील.
टीप – येथे दिलेली सर्व माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.
मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा,शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!