स्वामी म्हणतात कुणाचीही हकनाक निंदानालस्ती करु नये : लागते ब्रह्म’ह’त्येचे पापं.!!

मित्रांनो खूप व्यक्तींना दुसऱ्या ची निंदा करणे खूप समाधानी वाटते. ते नेहमी कोणाची ना कोणाची निंदा करत असतात. कोणाचे काही चांगले घडले तर त्यात वाईटच त्यांना दिसते.

कारण यांना कोणाचे चांगले बघण्याची व कोणाबद्दल चांगले बोलण्याची सवयच नसते. कोणी जर एखाद्या मंदिरात मोठी देणगी दिली किंवा महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवला त्यात पण म्हणतो यात काय मोठा देखावा आणि बडे जावा आहे.

पण इतका पैसा त्याच्याकडे कुठून येतो ना हे फक्त मलाच माहीत आहे. तो लोकांना कशा प्रकारे लुबाडतो कसे फसवतो, याविषयी आपण चर्चा करतो. आपण इतरांचे वाईट कर्म व आपल्या चांगल्या कर्माची चर्चा करतो.

परंतु याचा परिणाम असा होतो की समोरच्या व्यक्तीने जे काही वाईट कार्य केले असेल त्याची आपण चर्चा केल्यास त्या वाईट कर्माचे जे काही फळ त्या व्यक्तीला मिळणार असेल त्यातील थोडेसे फळ आपल्या नावावर ही जमा होते.

या विषयी मी तुम्हाला एक कथा सांगतो. एक राजा होता. तो खूप धार्मिक वृत्तीचा होता. त्याचा असा रोजचा नियम होता की नगरात जेवढे ब्राह्मण आहेत त्यांना रोज प्रसाद म्हणून जेवण देणे.

त्यामुळे त्याच्या भंडारी ग्रहात रोजचे अन्न शिजत असे. व राजा स्वतःच्या ब्राह्मणांना वाढत असे. रोजच्या रोज त्या राजाच्या घरी ब्राह्मणांच्या पंगती भोजन करत असत. यामुळे राजाची सगळीकडे कीर्ती पसरली.

सर्वजण त्याची वहा वहा करू लागले. राजाचा मोठा वाडा होता. त्या वाड्यातच मोकळ्या जागेत जेवण तयार करीत असत. एकदा भोजन तयार होत असताना, वरून एक घार विषारी साप पकडून नेत असताना, सापाचे तोंड उघडे असल्याने त्याचे विष नेमके खिरीच्या भांड्यात पडले.

हे कोणाच्याही लक्षात आले नाही. ब्राह्मण भोजनासाठी आले. राजाने खीर वाढली व जेवण झाल्यानंतर सर्व ब्राह्मण तिथेच मरून पडले. असे कसे घडले हे राजाला कळेना. म्हणून त्याने स्वयंपाक्याला बोलविण्यास पाठवले.

परंतु सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर त्यांनेही जेवण केले होते. व तोही मरून पडला होता. आता राजाला काय करावे सुचेना. इतक्या ब्राह्मणांची हत्या आपल्या हातून झालेली आहे. याचे त्याला खूप दुःख झाले. व त्याने स्वतः जीव देण्याचा निश्चय केला.

परंतु प्रजा ने राजाला रोखले. व आत्महत्येचे पाप करू नका असे सांगितले. परंतु राजा नेहमीच चिंतेत राहू लागला व कालांतराने तो राजा मरण पावला.

त्याला नेण्यासाठी यम देव आले व भगवंताकडे न्यायासाठी उभे केले. व सांगितले की इतक्या ब्राह्मण हत्याचे पाप कोणाच्या माथ्यावर टाकायचे. कारण राजा अन्नदानाचे पवित्र काम करत होता. त्याला दोषी धरता येणार नाही. कारण यात त्याची काही चूक नाही.

स्वयंपाक्याने उत्तम स्वयंपाक केला. त्याने त्यात काही टाकले नाही. म्हणून त्याचा हि दोष नाही. सापाने विष टाकले पण तोच मृत्यूच्या दारात उभा होता. व त्याने स्वतःहून त्यात विष टाकले नव्हते. म्हणून त्यांचाही दोष नाही.

घार आपले पोट भरण्यासाठी सापाला घेऊन जात होते. स्वतःचे पोट भरणे हे काही पाप नाही. म्हणून घार ही दोषी नाही. पण ब्रह्महत्या तर झाले आहेत. व कोणालातरी या ब्रह्म हत्यात पापी घ्यावेच लागेल.

मग काय करावे भगवंता आता तुम्हीच न्याय करा. भगवंताने यम देवाचे बोलणे ऐकले व त्याला खाली बघण्यास सांगितले. राजाच्या नगरात शोक काळा पसरली होती. सर्वजण राजा बद्दल हळहळ व्यक्त करत होते.

परंतु काही व्यक्ती राजाची निंदा करत होते व सांगत होते की त्याला बरोबर त्याच्या कर्माचे फळ मिळाले. किती ब्राह्मणांना त्याच्यामुळे जीव गमवावा लागला. राजा खूप वाईट होता त्याच्या बरोबर असेच व्हायला हवे होते.

यम देवांने हे सर्व ऐकले व भगवंतांकडे पाहिले. व भगवंताने सांगितले की हे जितके लोक राजाची निंदा करत आहेत व ब्रह्म हत्येबद्दल चर्चा करत आहेत. त्या सर्वांच्या नावावर थोडे थोडे ब्रह्महत्येचे पाप जमा करा.

जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीची निंदा करता, त्याच्याबद्दल वाईट बोलता, त्याच्या पापाची चर्चा करता तेव्हा समजुन जावे याच्या पापात आपण भागीदार आहोत. खूप घरामध्ये भांडण तंटे या गोष्टींवरून होतात की माझे कोणीही ऐकत नाही.

आपण कोणाचे ऐकून घ्यायलाच तयार नाहीत. फक्त मी सांगेल तेच खरे व तसेच करा असे मित्रांना सांगतो. परंतु आमचेच ऐका असे म्हणण्यापेक्षा माझेही ऐका असे म्हटल्यास सर्व भांडण व तंटे असेच नष्ट होते.

आपण दुसऱ्याची निंदा करण्यातच जास्त रस घेतो. इतरांची निंदा ऐकून जो आनंद आपल्याला होतो. की त्याच्यापेक्षा मोठा आनंद असूच शकत नाही असे आपल्याला वाटते. व स्वतःची प्रशंसा करणे. व इतरांकडून ही आपली प्रशंसा करून घेणे यातच आपण धन्यता मानतो.

जर कोणी आपल्या दारात कचरा टाकला तर आपण लगेच त्या व्यक्तीशी भांडणे करतो. परंतु आपल्या मनात जर कोणी कचरा टाकला. मित्रां बद्दल वाईट बोलले तर आपल्याला त्याबद्दल कसेच काही वाटत नाही.

कोणाचीही निंदा करू नये व कोणाबद्दल वाईट ही बोलू नये. व वाईट चिंतू ही नये कारण नंतर ते सर्व आपल्या पुढेच येऊन उभे राहते. म्हणून चांगले बोला व चांगले ऐका. व आपले जीवन पवित्र करा.

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद!

Leave a Comment