नमस्कार मित्रांनो, तुमच स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, स्वामी म्हणतात सकाळी लवकर उठावे. सकाळी लवकर उठल्यावर आपली नित्य कर्म उरकून स्वच्छ आंघोळ करावी. आंघोळ झाल्यावर घरामध्ये गोमूत्र शिंपडून घर स्वच्छ करून घ्यावे. घरासमोर रांगोळी काढावी.
रांगोळी काढून झाल्यावर देवपूजा करावी. आणि देवाला फुले वहावे. आणि त्यानंतर देवासमोर आरती लावावी. देवाला धूप अगरबत्ती दाखवावे. देवाची आरती करावी. त्यानंतर देवाचा जप करावा. त्यानंतर आपल्या कुळस्वामी चे नामस्मरण करावे.
त्यानंतर आपली घरातली कामे आवरल्यानंतर तुम्ही ज्यावेळी ऑफिस साठी किंवा तुमच्या कामासाठी बाहेर जात असता त्यावेळी स्वामींना एक प्रार्थना करायची. तर ती पार्थना अशी करा की हे जगाच्या मालका, हे परमेश्वरा, हे दत्त महाराज, हे श्रीपाद वल्लभ तुझी कृपा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहू दे.
आणि मी आज जे कार्य करणार आहे ते मंगल कार्य होऊ दे. आज माझ्याकडून कोणत्याही चुका होऊ नये. आज माझ्या मुळे कोणालाही त्रास होऊ नये. आज माझ्याकडून कोणतीही गैरवर्तणूक होऊ नये. आणि ज्या वेळेस मी कामातून मोकळा होईल त्यावेळेस स्वामीराया तुमचे गोड नाव माझ्या मुखात येऊ द्या.
एवढी प्रार्थना केल्यानंतर तुम्ही बघा स्वामीच्या कृपेने तुमच्या जीवनात किती चमत्कार होतील. आणि तुम्हाला खूप सुंदर असे अनुभव येतील. आणि त्यानंतर तुम्ही ऑफिस वरून घरी येत असता त्यावेळी तुम्हाला जाणवेल की तुमचा दिवसभराचा प्रवास, दिवसभराचे क्षण किती आनंदात आणि मस्त गेले आहेत.
त्यामुळे तुम्हाला काय होईल तर सुख-समृद्धी शांती तुम्हाला भेटून जाईल. यामुळे तुमच्या घरात लक्ष्मी माताची भरभराटी होईल. तुम्ही संध्याकाळी झोपताना स्वामींना एक विनंती करा. हे स्वामी राया तू आजचा माझा दिवस खूप छान घालवलास.
हे स्वामी राया तुमचा आशीर्वाद माझ्या सोबत होता म्हणून माझ्याकडून कोणते अमंगल कार्य झाले नाही. तरी तुझा आशीर्वाद सदैव असाच माझ्या बरोबर राहू दे. अशी प्रार्थना तुम्ही जर रोज नित्य नियमाने केली उत्तर बघा कि स्वामी तुमचे जीवन कसे बदलून टाकतील.
टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.
मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!