स्वामी समर्थ या नामाची महती.. या नामाचा गूढ अर्थ ज्याला समजला, त्याचेच जीवन धन्य होते.!!


आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे… स्वा- मी, स- मर्थ, स्वास म्हणजेच श्वास प्रत्येक श्वास घेताना सोडताना तेच असतात पण आपल्याला कधी ते जाणवलेच नाही, मी पणाचा त्याग केल्यावर खर जिवनाचा अर्थ कळतो.

सोहम ध्यान करताना सुद्धा तसेच अनुभव येईल. श्वास घेताना सो आणि सोडताना हम असा आवाज येतो तेव्हाही देव तेच सांगत असतो तो मी आहे.

सोहं म्हणजे ‘अहम् ब्रम्हास्मि ‘अर्थात ‘मी ब्रम्ह आहे’. मी ब्रम्ह आहे म्हणजे, मी निर्माता आहे. मीच प्रत्येक गोष्टीला जन्माला घालतो.

माझ्या आनंदी जीवनाचा शिल्पकार मीच आहे आणि माझ्या दु:खी किंवा पिडीत जीवनाला देखील जबाबदार मीच आहे.

तुम्ही जसे विचार करता, तसेच तुमचे भाग्य जन्माला येते. तुमच्या भविष्यात जे काही घडणार आहे ते तुमच्या वर्तमानात केलेल्या विचारांनुसारच. तुमच्या मनातील भावनांनुसारच.

त्यामुळे तुमचे सकारात्मक विचार आणि नकारात्मक विचार, तसेच सदभावना व दुर्भावनाच तुमच्या जीवनाला प्रभावी करीत असतात.

परंतु हे सर्व तुम्हीच घडवलेले असते, कारण तुम्हीच तुमच्या जीवनाचे ब्रम्ह असता.

आजही वर्तमानात काळात जर तुम्हाला सुख, शांती आणि स्वास्थ्य प्राप्त झालेले असेल, तर ते तुमच्याच मुळेच आणि जर तुम्ही दु:खी असाल, कष्टी असाल, रोगी किंवा आजारी असाल तर ते तुमच्याच मुळे.

म्हणून स्वतःला ओळखणे अतिशय गरजेचे आहे. तुमच्या नशिबाला किंवा भाग्याला कोणताच देवदूत बनवत नाही, देव घडवत नाही, किंवा नशीब घडवत नाही. तुम्हीच घडवत असता. म्हणून स्वतःची ओळख करून घेणे गरजेचे असते.

“मी ब्रम्ह आहे” ही ओळख झाली म्हणजे तुम्ही नशिबावर अवलंबून न राहता स्वतः आपले चांगले जीवन घडवण्याची सुरवात करता.मग तुम्ही सकारात्मक विचारांना,सदभावनांना जन्माला घालता आणि तुमच्या चांगल्या भवितव्याची निर्मिती करता.

ज्यावेळी तुम्ही असे वारंवार करू लागता त्यावेळी तुमच्या बुद्धीचे सकारात्मक विचार आणि मनाच्या सदभावना तुमच्या चित्तामध्ये अंकित होऊ लागतात आणि तुमचे चित्त सकारात्मकतेने भरू लागते व ओथंबून वाहू लागते.

असे झाल्यास तुमच्या चित्तात सकारात्मक नाद निर्माण होतो, त्यालाच म्हणतात ब्रम्ह नाद!

त्यालाच म्हणतात सोहम ! त्यावेळी तुमचे चित्त सकारात्मक प्रवाहाने भरून वाहत लागते आणि तुमच्या दैनंदिन जीवनातल्या सर्व गोष्टी सकारात्मकतेने घडू लागतात.

म्हणून तुम्ही सर्व संजीवनी साधकांनी जाणीवपूर्वक सकारात्मक विचार करण्याचा व सद्भावना जन्माला घालण्याचा आटोकाट प्रयत्न करीत राहावा.

असे झाल्यास तुम्ही आपोआपच “सोहम ” अनुभव आजीवन घेऊ शकाल व तुमचे जीवन सफल बनवू शकाल.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात.

आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच,

आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!