स्वामी म्हणतात.. गुरुवारी नक्की करावी ही तीन कामे.. उत्तरोत्तर प्रगती होईल.. माता लक्ष्मींची कृपा होईल…

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर…

गुरुवार हा दिवस स्वामी महाराजांचा दिवस आपण म्हणून मानतो. त्यादिवशी आपण केंद्रामध्ये जाऊन स्वामींचे दर्शन घेतो पूजा करतो अभिषेक करतो. स्वामींचे चरणी नतमस्तक होतो. झाल्या गेल्या चुकांना माफ करून स्वामीनी आपल्यावर आशीर्वाद ठेवावा अशी मनोभावे प्रार्थना करतो. या गुरुवारच्या दिवशी या तीन गोष्टी केल्याने तुम्हाला नक्कीच लाभ होईल, त्या कोणत्या गोष्टी आहेत ते बघू.

तुम्ही गुरुवारी सकाळी तुमचे काम आटोपल्यानंतर केंद्रामध्ये जाऊन स्वामींचे दर्शन घ्या. स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी जप करा. जप करताना किंवा दहा मिनिटे तरी एका ठिकाणी बसून जप करा. यामुळे तुमचं मन शांत होईल. तसेच तुमचे मन शांत झाल्यामुळे तुमच्या मनातील वाईट विचार थांबतील व तुम्हाला ताजेतवाने वाटू लागेल.

यानंतर तुम्ही गुरुचरित्रा मधील एखादा अध्याय वाचा. जर तुम्ही गुरु दत्तात्रयांच्या दत्त मंदिरात जात असाल तर त्या ठिकाणी गुरुचरित्राच्या चौदाव्या व 18 व्या अध्यायाचे वाचन करा. या अध्यायांच्या वाचनाची सुरुवात गुरुवारी केल्याने खूप लाभ होतो. तसेच गुरु दत्तात्रयांची कृपा आपल्यावर होते.

यानंतर ही गुरु सेवा झाल्यानंतर ज्यावेळी तुम्ही बाहेर पडाल त्यावेळी, मंदिराच्या बाहेर बसणाऱ्या गरीब लोकांना मदत करा. ती आर्थिक स्वरूपात न करता अन्नदान स्वरूपात करा. कारण अन्नदान श्रेष्ठदान समजले जाते. तुम्हाला ज्या प्रकारे अन्नदान करावे वाटेल तशा पद्धतीने तुम्ही अनुदान करू शकता किंवा केळी किंवा इतर कोणतीही फळे त्यांना तुम्ही देऊ शकता.

असे केल्याने त्यांचा चांगला आशीर्वाद तुम्हाला मिळेल व तुम्हाला पुण्य मिळेल. मित्रांनो या तुम्हाला तीन गोष्टी सांगितल्या या साध्या सहज सोप्या वाटत असल्या तरी खूप परिणामकारक आहेत. कारण गुरूंची सेवा करणे हे आपले नशिबात असावे लागते आणि ते आपण केल्याने आपल्याला लाभ नक्कीच होतो.

तसेच आपण अन्नदान केल्याने आपल्याला आयुष्यात येणाऱ्या अडचणी असतील किंवा आपल्या तक्रारी असतील त्या दूर होतात. कारण तुम्ही ज्यावेळी अन्नदान करता त्यावेळी, ती व्यक्ती तुम्हाला तोंडभरून आशीर्वाद देत असते.

आणि आयुष्यात नकारात्मकता संपुष्टात आणण्यासाठी हा आशीर्वाद खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे जितका होईल तितका आशीर्वाद तुम्ही मिळवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे या तीन गोष्टी जर गुरुवारी तुम्ही केल्या तर तुम्हाला नक्कीच लाभ होईल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Leave a Comment