स्वामी सांगतात..‌ घरावरील अरिष्ट दूर ठेवण्यासाठी कुटुंबातील स्त्रीने हे उपाय रोज करावेत..

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… प्रत्येकांनी आपल्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहावी, या करिता घरातील कुटुंबतील सर्व व्यक्ती व लक्ष्मी म्हणजे घरातील सौभाग्यवती स्त्री हिचे महत्वाचे योगदान असते, त्यासाठी खलील काही उपाय रोज करावे.

दररोज सकाळी लवकर सूर्योदयापूर्वी उठून घर झाडून पुसून स्वछ करून घ्यावे. घरातील फारशी रोज पुसावी, आणि घरातील फरशी पुसायच्या पाण्यात थोडे खडे मीठ एकत्र करून घ्यावे.

घरातील प्रत्येक खोलीत कोपऱ्यात एका वाटीत थोडे खडे मीठ घालून ठेवावे. मिठाला पाणी सुटल्यास ते वाहत्या पाण्यात सोडून द्यावे आणि मीठ बदलावे.

रोज सकाळी घराचा उंबरठा पुसून स्वछ करून घ्यावा व दारापुढे सुंदर रांगोळी काढावी आणि दारात लक्ष्मीची पावले, स्वस्तिक किंवा जय श्री राम लिहून सुंदर जमेलतशी रांगोळी काढावी.

दर 15 दिवसाला घरातील जाळे जळमट स्वछ करावे. घरातील सगळ्या बेडशीट किमान दर आठवड्याला धुवून स्वच्छ करुन बदलाव्यात. घरातील सगळे पडदे दर महिन्याला धुवून घ्यावेत.

घरामध्ये मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश येऊ द्यावा , घर सतत बंदिस्त ठेवू नये.

संध्याकाळी रात्री दिवे लागणीला घरातील सर्व दारे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात आणि मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावावी. घरातील देवाला गाईच्या तुपाचा दिवा आणि पंचगवय धूप लावावी. रोज किमान 1 माळी कुलदेवतेचा आणि गुरूंच्या नामस्मरणाचा जप करावा.

देवघरातील देवीला लक्ष्मी म्हणून हळद आणि कुंकू लावावे आणि स्वतःला हि लावून घ्यावे. भीमसेनी कपूर जाळावा. देवापाशी दिवा लावल्यानंतर किमान 15 मिनिटे घरातील प्रत्येक भाग प्रकाशमान राहील ह्याची काळजी घ्या. तसेच सगळ्यात शेवटी देवाने तुम्हाला दिलेल्या सर्व चांगल्या गोष्टींसाठी आभार मानून सर्व चांगलाच व्हावं ह्यासाठी प्रार्थना करावी.

संध्याकाळी, रात्री दिवे लागणीला तुळशीपाशी दिवा आणि धूप लावावी, तुळशीला हळदी कुंकू लावून शुभंकरोती म्हणावे, तसेच आपल्या घराला आणि घरातील व्यक्तींना सुखरूप ठेवण्यासाठी प्रार्थना करावी.

संध्याकाळी, रात्री दिवे लागणीची वेळ असताना घरात देव्हाऱ्यासमोर शुभमकरोती करून श्रद्धेने उपासना करावी, नंतर सहकुटुंब जेवण आनंदात करावे, त्यानंतर झोपणे, घरात रात्री आपसात भांडणे, नकारात्मक बोलणे, अपशब्द बोलणे किंवा TV, मोबाईलवर वर नकारात्मक गोष्टी बघणे टाळावे.

घरामधे कुठेही कचरा, धूळ राहू देऊ नये. तसेच खरकटे अन्न कधीही ठेवू नये. रात्रीच्या वेळी खरकट्या भांड्यांचे टोपले घराबाहेर ठेवावे, घरात नाही. घरात प्रसन्न वातावरण करून रात्री झोपावे.

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोहळा असा टांगून ठेवावा कि घरात प्रवेश करणारी प्रत्येक व्यक्ती त्या कोहळ्याच्या खालून प्रवेश करेल. कोहळ्यामध्ये नकारात्मक शक्ती कमी करण्याचे गुणधर्म असतात.

घराच्या सभोवती मन प्रसन्न करणारी फुलझाडे जरूर लावावीत, तसेच मुख्य प्रवेशद्वाराशी एक तुळशीचे रोप लाऊन रोज दिवाअगरबत्ती लावून पाया पडावे.

आपल्या घरात येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस कधीही नाराज करून किंवा अपमानित करून पाठवू नये. शक्य असल्यास चहापाणी, अल्पोपहार, इत्यादी देऊन आणि त्यांना काही मदत अपेक्षित असल्यास आणि तुम्हाला शक्य असल्यास ती जरूर करावी. पण मदत शक्य नसेल तर योग्य शब्दात आदरयुक्त सांगून विनंतीपूर्वक सांगून निरोप घ्यावा.

घराच्या बाहेर अंगणात पक्षी आणि प्राण्यांसाठी अन्न पाण्याची सोय करावी. रात्री काही अन्न उरल्यास ते जमल्यास पाळीव प्राण्यांना खाऊ घालावे.

दर महिन्याला पगार जमा झाल्यानंतर किंवा एखादी व्यासाईक रक्कम मिळाल्यावर ती आधी देवासमोर ठेवून हळदी कुंकू वाहावे. त्यातील एक 100 रुपये देव्हाऱ्यात किंवा देवाजवळीलच एका डब्यात जमा करावी.

6 महिन्यांनी ह्या रकमेचे गरिबांना अन्नदान करावे. दर महिन्याला जमा झालेला पगार घरी आणताना घरातील सर्व व्यक्तींना आवडेल असे काही तरी जरूर घेऊन यावे उदा. मिठाई. घरातील सर्व सदस्य आनंदी राहतील ह्याची काळजी घ्यावी.

घर हे नेहमी धान्याने भरलेले असावे. घरामध्ये लागणाऱ्या वस्तू, किराणा, धान्य हे किमान 7 दिवसाचे, 15 दिवसाचे किंवा 1 महिन्याचे भरून ठेवावे. आज आणायचे, आज बनवायचे आणि आज खायचे असे करू नये.

घरामध्ये तुटलेले फर्निचर, चपला, बंद पडलेले घड्याळ, भंग पावलेल्या मूर्ती, रद्दी सामान ठेवू नये. घराचे प्रवेशद्वार नेहमी मोकळे आणि स्वछ ठेवावे.

घरामध्ये कुठेही कचरा किंवा घरगुती वस्तू यांचा पसारा किंवा अडगळ ठेवू नये. अगदी कोणीही कधीही अचानक पाहुणे जरी आले तरी तारांबळ उडू नये असे असावे.

घरातील सर्वात जास्त नकारात्मकता निर्माण करणारी ठिकाणे “शौचालय , बेसिन आणि किचन ओट्याचे सिंक रोज अंघोळीच्या आधी स्वछ करून घ्यावे. घरातील स्वच्चतागृहासाठी वेगळी चप्पल ठेवावी. दरवेळी स्वचछतागृहाचा वापर केल्यानंतर पायावर पाणी घेऊन बाहेर यावे आणि स्वच्चतागृहाचे दार वापर केल्यानंतर तसेच उघडे न ठेवता कटाक्षाने लावून बंद करून घ्यावे.

घरातील काही व्यक्तींमध्ये समजा काही कारणाने वाद जरी असतील तरी घरात कोणालाही जाणून बुजून त्रास देणे, उपाशी ठेवणे असे प्रकार किमान स्वतःच्या बाजूने तरी टाळावेत. शांतपणे आपली जबाबदारी आपण पार पाडत राहावी. काही समस्या ह्या येणारा काळ सोडवतो. त्यामुळे सतत कुटुंबात वाद होणार नाहीत हे समजूतदारपणे घ्यावे अशी ही काळजीदेखील कुटुंबात घ्यावी.

घरामध्ये सगळे सण वार प्रथेप्रमाणे एकत्र कुटुंबासमवेत साजरे करावेत, कुलधर्म कुलाचार करत राहावा…

सर्वप्रथम आपण व आपल्या कुटुंबाच्या जीवनाची व आरोग्याची काळजी घ्या. सरकारी सुचनांचे, नियमांचे व कायद्याचे पालन करा.!!

एकमेकांना अडचणीत आणु नका, त्यापेक्षा मदत करा, जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा, नकोत्या उठाठेवी करू नका.!!

खोट्या राजकारणी व स्वार्थी, मतलबी लोकांपासुन दूर रहा, अफवानवर विश्वास ठेवण्या आधी खात्री करा, नेहमी सुखी, समाधानी व आनंदी राहा. नेहमी सावध रहा, सुरक्षित रहा व सतर्क रहा.!!

प्रत्येकाचे जीवन, आयुष्य फार सुंदर आहे ते आनंदात जगा व दुसऱ्यांलाही आनंदी जगु द्या. स्वार्थ व अहंकार कधीही मनात ठेऊन वागू नका, वाईट, कठीण व अडचणीच्या प्रसंगाची वेळ कधी कुणावर येईल हे सांगू शकत नाही हे ही लक्षात ठेवा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Leave a Comment