मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर, आज आपण स्वामी समर्थ महाराजांचा फोटो स्त्री रूपात का असतो काय आहे यामागील रहस्य आजच्या लेखाद्वारे आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊयात स्वामी समर्थ महाराजांनी स्त्री वेश का धारण केले होते.
मित्रांनो, आपल्यापैकी बहुतांश लोकांना प्रश्न पडला असेल की श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक फोटो स्त्री रूपात आपल्याला पहायला मिळतो. तर स्वामी समर्थांचा हा फोटो स्त्री रूपात का असतो..?? काय आहे यामागील सत्यता..?
असे बरेच प्रश्न स्वामींच्या अनेक भक्तांना पडलेले असतात त्यामुळे आम्ही आज तुमच्या त्याच अनेक पश्नांचं निवारण करणार आहोथ. मित्रांनो यामागे एक कथा आहे आणि ती कथा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
स्वामींचा स्त्री रूपातील फोटो कशामुळे असतो –
तर मित्रांनो, अनेक वर्षांपूर्वी एक स्वामी समर्थ महाराजांचे एक भक्त होऊन गेलेत. ते भक्त स्वामींचा सर्वश्रेष्ठ भक्तांपैकी एक होते. ते भक्त नित्यनेमाने स्वामींच्या दर्शनासाठी यायचेत. दिवसभर ते स्वामींचे नामस्मरण करायचेत. या कारणामुळे ते स्वामींना अत्यंत प्रिय भक्त होते.
एके दिवशी ते भक्त आणि त्यांचे मित्र महालक्ष्मी मातेचे दर्शन घेण्यासाठी निघाले होते. कारण त्यांचा मित्राला महालक्ष्मीचे दर्शन घायचे होते. ते भक्त त्या मित्राला म्हणालेत की आधी आपण स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घ्यायला जाऊयात. यावार ते मित्र म्हणले की अरे मित्रा महालक्ष्मीचे मंदिर येथून खूप लांब आहे.
त्यामुळे आधी आपण तिकडे जाऊयात कारण आता तिकडे नाही गेलो तर खूप उशीर होऊन जाईल कारण तिकडे जाण्यासाठी एकच बसची सोय आहे आणि आपल्याला उशीर झाला तर ती पण बस सुद्धा सुटेल त्यामुळे आपण आधी इकडे जाऊन येऊ, म्हणजे आपल्याला उशीरही होणार नाही.
ते भक्त त्या मित्रास म्हणले बस सुटली तर सुटू द्या; माझ्या स्वामींमध्येच सर्व देव सामावलेले आहेत. त्यांचे दर्शन झाले म्हणजे आईच दर्शन होईल असे समजून घ्या. असे म्हणत ते भक्त पुढे मित्राला म्हणाले की तुम्ही फक्त एकाच वेळेस माझ्या सोबत चल माझी जशी स्वामींवर श्रद्धा आहे तशी तुमचीही श्रद्धा माझ्या स्वामींवर नक्कीच बसेल. आणि हा माझा दृढ विश्वास आहे.
हे ऐकून त्या भक्तांचे मित्र त्यांच्यासोबत स्वामी समर्थ महाराजांकडे जाण्यास निघाले. मित्रांनो, स्वामी तर साक्षात देवाचे रूप त्यांना त्या दोघांचा मनात काय चालू आहे हे लगेच समजून गेलं. जेव्हा ते दोघे दर्शन घेण्यासाठी मंदीराच्या गाभऱ्यात जातात तेंव्हा श्री स्वामी समर्थ त्यांना साक्षात देवीच्या रूपात दर्शन देतात.
आणि त्या भक्तांच्या मित्राला बोलतात की कारे तुझा विश्वास बसत नाही का सगळीकडे मीच आहे असे..?? म्हणून स्वामी त्याच वेळी महालक्ष्मीचे रूप धारण करतात आणि त्या भक्तला दर्शन देवीच्या रूपात देतात.
तर मित्रांनो अशाप्रकारे आपल्या भक्तांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता स्वामी समर्थ प्रत्येक वेळी त्यांच्या लिलांची प्रचती देत असतात. त्यामुळे प्रत्येक भक्तांची स्वामीवर अगाध श्रद्धा असायला हवी. त्यामुळे तुमच्यावर किती ही मोठं संकट आलं तरीहि तुम्ही स्वामींना विसरून जाऊ नका.
मित्रांनो, फक्त मनामध्ये श्री स्वामी समर्थांच्या नामाचा जप करत रहा. कारण भक्ति हिच खरी श्रेष्ठ शक्ति असते. भक्तांनी नेहमीच श्रद्धेच्या सागरात कसे न्हाऊन निघायला हवे.
टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.
मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!