स्वामींना असा भक्त आवडतो.!! भक्त असा असावा व भक्ती करावी तर अशी..!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, एकदा मठात सर्वश्रेष्ठ भक्त कोण यासाठी घोषणा झाली, जो सर्वश्रेष्ठ भक्त ठरेल त्याला या महिन्याचा स्वामींना नैवेद्य दाखवण्याचा मान हा द्यायचा असे सामूहिक रित्या ठरले. सर्व भक्त ही बातमी ऐकून प्रयत्न यासाठी करू लागले की आपण कसे स्वामींचे श्रेष्ठ भक्त आहोत हे स्वामींना दाखवण्यासाठी, हे सिद्ध करण्यासाठी, काय काय करावे लागेल याचा विचार करू लागले.

या गोष्टीमध्ये एक श्रीमंत सावकार आहे, दुसरा एक हलवाई ज्याचं मोठं दुकान आहे, तिसरा जो व्यक्ती असतो तो गरीब छोटीशी जमीन असणारा शेतकरी, नैवेद्याचा मान मिळावा म्हणून सावकार जो असतो तो स्वामींची मार्बल संगमरवराची सफेद मस्त सुंदर सुबक मूर्ती बनवून घेतो, त्याच्यासाठी छानस चंदनाचे लाकूड कोरीव काम केलेल्या वगैरे असा मस्त देव्हारा बनवून घेतो.

जो हलवाई असतो तो एकदम छान असे लाडू बनवतो, त्यात खूप दूध तुप सगळ्या छान क्वालिटीचे उत्तम उत्तम सगळे सामान वापरून छान लाडू बनवायला लागतो. अशी तयारी चाललेली असते. पण या दोघांच्या मनात प्रश्न येतो की शेतकरी काय करतोय बघूया?

तसा पण हा गरिब आता काय स्वामींना देणार आणि त्याच्यामुळे काय मान मिळणार, आपल्या दोघात श्रेष्ठ भक्त कोण हेच ठरणार हे त्यांचं त्यांनीच ठरवलं. ते शेतकऱ्याकडे गेले, शेतकरी फक्त शेतात कष्ट करत असतो आणि तो दुसरे काही प्रयत्न करत नसतो हे पाहून हे दोघं खुश होतात, की चला म्हणजे शेतकरी काहीएक प्रयत्न करत नाहीये, हा या स्पर्धेतून बाहेर आहे.

हा श्रेष्ठ भक्त ठरत नाही. आता उरलो आपण दोघंच म्हणजे आपल्या दोघांपैकी काय तो श्रेष्ठ भक्त ठरणार आणि आपल्यालाच नैवेद्य दाखवण्याचा मान हा मिळणार. शेवटी निर्णयाचा दिवस येतो. सगळ्यात पहिले स्वामी सावकाराकडे जातात, सावकाराची बनवून घेतलेली की मुर्ती देव्हारा पाहून त्याचं कौतुक वगैरे करतात.

पुढे स्वामी हलवाईकडे जातात, त्याने जे काही मस्त चविष्ट उत्तम सामग्री वापरून बनवलेले लाडू असतात ते स्वामी खाऊन बघतात, त्याचीही स्तुती करतात. आता सावकार आणि हलवाई हे दोघं वाट बघू लागतात, स्वामींना विचारतात की कोण आहे श्रेष्ठ भक्त? स्वामी त्यांना म्हणतात की थांबा, तोवर शेतकरी येतो व त्याला विचारतात की तू काय केला प्रयत्न? तर शेतकऱ्याच्या मागून दोन तीन अशी कुटुंब येतात.

शेतकरी सांगतो की स्वामी हे जे लोक आहेत यांनाही स्वामी तुमच्या भक्तिमार्गात यायचं आहे, यांनाही तुम्ही त्यांचे गुरू म्हणून हवे आहात, तुम्हाला त्यांचे गुरू करून घ्यायचे आहे, तुमचे शिष्य म्हणून यांना पुढच आयुष्य व्यतीत करायचा आहे, ती लोक सांगू लागतात की स्वामी हे जे शेतकरी आहेत, रोज रोज येऊन तुमच्या लीला, तुमचा संदेश सांगायचे, आम्हालाही ते पटलं आणि आम्हालाही आमचं आयुष्य तुमच्या छायेखाली तुमच्या कृपाछत्राखाली घालवावे म्हणून स्वामी आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत.

आम्हाला स्वीकारा अशी विनवणी करतात.स्वामी यावेळी बोलतात की बघा शेतकरी जो आहे हा माझा खरा सर्व श्रेष्ठ भक्त आहे. याच कारण म्हणजे सावकाराने मूर्ती आणि नुसता देव्हारा बनवला खरी मनापासून त्याच्या मनात स्वामी भक्ती नव्हती, फक्त देखावा केला, हलवाई ने देखील देखावा केला, पण शेतकरी जो होता त्याने मनापासून स्वामींचे काही नियम स्वामींची शिकवण स्वतः आचरणात आणली.

इतकेच नव्हे तर इतरांना देखील आपल्या त्या भक्तिमय वातावरणात घेऊन आला, जो स्वतः आणि इतरांच्या आयुष्याचं सुद्धा कल्याण करतो, तो खरा स्वामींचा भक्त, स्वामी मार्गाने चालून स्वामींनी सांगितलेले नियम तसे वागायचा. आयुष्याचे कल्याण करायच असेल तर स्वामी भक्ती स्वतः देखील करावी व इतरांना देखील सामील करून घ्यावे असाच असतो स्वामी भक्त.

येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोक विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सामान्य जनहित लक्षात घेऊन ते येथे सादर करण्यात आले आहे.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

Leave a Comment