नमस्ते मित्रांनो,
आजच्या आपल्या या लेखामध्ये आपण बघणार आहोत की कोणते उपाय केल्याने आपल्या घरामध्ये धन लाभ होतो. मित्रांनो असा कोणता मार्ग किंवा उपाय आहे ज्याच्यामुळे आपल्याला अचानक धन लाभ होण्याची शक्यता असते.
ज्याची चमत्काराची तुम्ही कधी स्वप्नातही अपेक्षा केलेली नसणार अशा प्रकारे धनसंपत्ती पैसाअडका तुमच्याकडे अचानक आकर्षित होऊ लागेल. या उपायाने तुम्हाला अक्षय अखंड लक्ष्मीचा वर मिळेल.
मित्रांनो,हा उपाय स्त्री-पुरुष दोघांपैकी कुणीही करू शकतात. अट फक्त एकच आहे की हा उपाय करताना तो गुप्त पद्धतीने करावा. या उपाया बद्दल कुठेही वाच्यता करू नये.थोडक्यात आपल्या जवळच्या कुणालाही, घरातील व्यक्तींनाही तुम्ही या उपायाबद्दल काही कळू द्यायचं नाहीये.
या पद्धतीने करावा हा उपाय –
मित्रांनो, वर सांगितल्याप्रमाणे उपाय करण्यासाठी आपण एक शुभ मुहूर्त पाहून शुक्रवारचा दिवस निवडायचा आहे. त्याला कारण असे की हा उपाय करण्यासाठी शुक्रवार हा दिवस उत्तम मानला जातो.
तर आपण जो पण शुक्रवार निवडला आहे त्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच गुरुवारच्या रात्री झोपण्यापूर्वी आपण आपल्या उशाला एका कागदाच्या पुडीमध्ये फुटाणे आणि थोडी खडीसाखर ठेवायची आहे.
किंवा तुम्ही एखादी छोटीशी डबी घेतली तरिही चालेल. एक लक्षात घ्या महत्वाची गोष्ट म्हणजे अनेकजण या उपाययोजना करुन बसतात पण योग्य त्या नियमांचे पालन करत नसल्याने त्यांना या उपायाचे फळ मिळत नाहीत.
या उपायांसाठी पाळवायचे काही नियम खालीलप्रमाणे –
मित्रांनो, या उपायाचा अवलंब करताना तुम्ही मां-साहार करायचा नाहीये. चुकूनही कुणाची ही निंदा, नालस्ती करायची नाहीये. विशेष म्हणजे एखाद्या महिलेचा अपमान करायचा नाहीये. कारण असे केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते. आपल्यावर त्यांची कृपादृष्टी राहत नाही.
आपल्यावर जर लक्ष्मींची कृपादृष्टी होणार असेल आणि त्यांना आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी वास्तव्यास ठेवायचे असेल तर कधीही आपण महिलांचा घरात अपमान करायचा नाहीये.
याचबरोबर शुक्रवारच्या दिवशी कोणतेही देवांना अप्रिय असे कार्य करायचं नाहीये. ज्या दिवशी आपण उ’पाय करत आहात तो शुक्रवारचा दिवस व त्यापूर्वीचे दोन दिवस तसेच शुक्रवारच्या नंतरचे दोन दिवस कोणत्याही प्रकारचं व्यसन करायचं नाहीये.
या सर्व नियमांचे पालन केल्यास तुम्हाला याउपायाचे योग्य ते फळ अवश्य मिळेल.
हा उपाय करतांना उशी खाली ती वस्तु कशी ठेवावी तसेच कोणत्या दिशेला झोपावे..??
मित्रांनो, ज्या शुक्रवारी तुम्ही हा उपाय करणार आहात त्याच्या पहिल्याच दिवशी कागदाच्या पुडीत खडीसाखर आणि फुटाणे घ्या, ते त्या पुडीत बांधून ठेवा. खडीसाखर आणि फुटाण्यांचा हा प्रसाद माता लक्ष्मींना अतिशय प्रिय आहे.
माता लक्ष्मी या धनाच्या देवता आहेत. म्हणूनच आपल्याला लक्ष्मींचा हा प्रिय प्रसाद झोपतांना आपल्या उशाशी ठेवायचा आहे. मित्रांनो, आता राहीला प्रश्न आपण कोणत्या दिशेने डोकं करुन झोपायचे..?? तर मित्रांनो हा उपाय करताना आपले पाय उत्तरेकडे आणि आपले डोके दक्षिणेकडे असायला हवे.
त्याचबरोबर आपण दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर म्हणजे च शुक्रवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून, आन्हिकं आवरुन स्वच्छ आंघोळ करावी व त्यानंतर घरातील देवघरात देवपूजा करावी.
तुम्ही देवपूजा करताना रात्री उशाला घेतलेल्या त्या पुडीतील खडीसाखर आणि फुटाणे देवासमोर ठेवून नैवेद्य दाखवून घ्यावा, मनोभावे प्रार्थना करावी की, माता लक्ष्मीं आमच्या सर्व आर्थिक अडचणी दूर करा. मला माझ्या नोकरीमध्ये तसेच व्यवसायात भरभराटी येऊ देत.
माता लक्ष्मी तुमचे वास्तव्य नेहमीच आमच्या घरात टिकवून राहू देत. आमच्या मुला-बाळांना, घरातील समस्त सदस्यांना कायम सुखी-समाधानात ठेवा. अशी मनोभावेने प्रार्थना करावयाची आहे.
त्याचबरोबर घरातील सर्व सदस्यांना, व शेजारी पाजारी राहत असणाऱ्या लोकांना हा फुटाण्यांचा प्रसाद वाटून द्यावा. तुम्हाला शक्य असल्यास जवळच्या एखाद्या मंदिरात जाऊन तेथे येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांना खडीसाखर आणि फुटण्याचा प्रसाद वाटून द्यावा.
मित्रांनो हा छोटासा पण साधा उपाय जर तुम्ही थोडे शुक्रवार अखंडपणे केला तर नक्कीच आपल्याला या उपायाने धनलाभ होईल. तसेच धनलाभाचे नवनवीन योग जुळून येतील. असे काही नव नवीन मार्ग ज्यातून तुम्हाला धनलाभ होऊ शकेल अशा संधी तुमच्याकडे आपणहून चालून येतील.
तसेच आपल्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतील व आपल्याला माता लक्ष्मींचा आशिर्वाद तथा वरदान मिळेल. तुमच्याकडे धनसंपत्ती पैसाअडका सर्वकाही आपोआपच येऊ लागेल. अक्षय्य अखंड धनलक्ष्मी तुमच्या घरात विराजमान होतील.
टीप- येथे दिलेली सर्व माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.
मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा,शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा.