स्वामींच्या लीला अगाध आहेत, स्वामी भक्तांचा हा अनुभव नक्कीच वाचावा असा आहे..!!

नमस्कार, मित्रांनो.. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जीवन बदलवून टाकणाऱ्या दिव्य लीला सर्वांनाच परिचित आहेत. असेच मुंबईचे ठाकुरदास बुवा हे स्वामींचे अनन्य भक्त होऊन गेलेत, ठाकुरदास बुआ यांच्या पत्नी राधाबाई या सुद्धा स्वामींची मनोभावे सेवा करत होत्या. या उभयतांना एक सात वर्षांची मुलगी देखील होती. या उभयतांना मुलगा व्हावा अशी त्यांची खूप मनापासून इच्छा होती.

एका दिवशी ते स्वामी दर्शनासाठी अक्कलकोट येथे आले असता, राधाबाईंनी मुलगा व्हावा म्हणून स्वामींकडे प्रार्थना केली. त्यांनी अशा प्रकारे प्रार्थना करताच स्वामींनी राधाबाईंकडे बघितले आणि म्हणाले की जो मनोभावे माझ्या दरबारात येतो त्याची झोळी मी कधीही रिकामी ठेवत नाही.

याच भावमुद्रेमध्येच स्वामींनी आपल्या डोक्यावरील टोपी काढली आणि ती राधाबाईंच्या ओटिमध्ये टाकली. स्वामींनी ओटिमध्ये टोपी टाकताच राधाबाई यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. स्वामींनी आपल्याला प्रसाद दिला,आशीर्वाद दिला आहे असा विश्वास त्यांच्यामध्ये जागृत झाला. त्यानंतर पुढे बारा महिन्यांनी त्यांना पून्हा स्वामी कृपेची प्रचिती आली. राधाबाईंना एक गोंडस मुलगा झाला. त्यांनी त्या मुलाचे नाव गुरुनाथ असे ठेवले.

इतकेच नव्हे तर राधाबाईंनी स्वामींच्या हुकुमाप्रमाणे गुरूनाथचा गठबंधन अक्कलकोट येथे स्वामींच्या सहवासातच करण्यात आले. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण स्वामींना अनन्य भावाने जर शरण गेलात तर श्री स्वामी समर्थ त्यांची झोळी कधीही रिकामी ठेवत नाहीत ही प्रचिती सर्वांनाच आली असणार.

मग सर्वांनी एकाच घोषात स्वामींच्या नामाचा जयजयकार केला. आजची लीला खरोखर खूप प्रेरणादायी आहे. आपल्या लीलेत स्वामींनी स्वतःच्या डोक्यातील टोपी राधाबाईच्या ओटीत टाकण्याची लीला केली होती. या अशा स्वामी लिलांतूनच तुम्हाला आम्हाला सर्वांनाच असंख्य बोध भेटत असतात.

जो कोणी स्वामींना अनन्य भावनेने शरण जातो त्या भक्ताची झोळी स्वामी कधीही रिकामी ठेवत नाहीत. स्वामींच्या दरबारातून तो भक्त कधीही रिकाम्या हाताने माघारी परतत नाही. हा खूपच छान असा प्रेरणादायी बोध आपणास सांगितला.

म्हणून आज जर आपले काही ध्येय असतील,समस्या असतील तर स्वतःच्या स्वामी भक्तीवर, स्वामी सेवेवर विश्वास ठेवावा आणि ज्याप्रमाणे आजच्या लिलेत स्वामींनी स्वतःच्या डोक्यातील टोपी राधाबाई यांच्या ओटीत टाकण्याची लीला केली अगदी तसेच आपली सुध्दा झोळी स्वामी रिकामी पाठवणार नाहीत.

विश्वास ठेवा आणि आपले वर्तमान कर्म प्रामाणिकपणे करत रहा. आणि बघा तुम्हालाही नक्कीच अनुभव येईल स्वामींच्या लिलेचा. आज आपण सर्वांनी स्वामींना प्रार्थना करूया, अहो समर्थ तुमच्या दरबारात जोही येतो तो कधीही रिकाम्या हाताने माघारी परतला नाही आणि हीच तुमची महती आहे.

हे स्वामी आई आज आम्हा बालकांना बोध दिला, त्यासाठी अनेक धन्यवाद. हे गुरुराया आम्हा भक्तांना तुम्ही अशीच प्रेरणा देत रहा,असेच मार्गदर्शन करत रहा. कारण तुम्हाला सोडून आम्हाला कोणीच नाही. आमचे सारे चित्त तुमच्या ठायी आहे.

तर मित्रांनो, या लेखातून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश मुळीच नाही. केवळ भारतीय मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कुठल्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेत मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Comment