स्वामींच्या प्रकट दिनाची महती.. इतिहास कथा आणि नियम…

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… स्वामी समर्थ महाराज कधी आले, कोठून आले, ते कोण होते या बद्दल कोणालाच काही माहिती नाही पण स्वामीसुत नावाचे त्यांचे एक आतिशय महान भक्त होऊन गेले. त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे त्यांच्या तर त्यांच्या आनुभावावरून आपल्याला समजेलच कि स्वामी कसे प्रकटले. तर स्वामींच्या प्रकटण्याची हकीकत आशी.

शेकडो वर्षापूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापुर पासून १२ कोस (जवळपास २४ कि. मी. अंतरावर) छेली खेडा नावचा गाव होता. त्याठिकाणी विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ आणि भावजय बरोबर राहायचा. तो मुलगा कोणाही बरोबर मिसळायचा नाही तर तिथून थोड्याश्या अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या आश्या जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता त्यात एक छोटीशी दिवळी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती, तर तो विजयसिंग खुप खिशात गोट्या भरून तिथे जायचा आणि त्या गणपती बरोबर खेळायचा पण तो मुलगा गणपती ला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतः वरच घेऊन खेळायचा असेच एक दिवस जात होते आणि त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजयसिंग ला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला. तर तो दिवस होता चित्र शुद्ध द्वितीया. आणि विजयसिंग रोजच्या आपल्या पद्धतीने या हि दिवशी तिथे गेला गणपती बरोबर पण आज अचानक त्याच्या मनात आले कि रोज आपणच खेळतोय आणि आज याने पण खेळायचे आणि तरव सर्व गोट्या त्या मूर्तीच्या समोर टाकल्या व ते बोलले ”बाप्पा रोज मीच तुझा डाव खेळतोय पण आज नाही, आज तूच खेळायचं” बस इतके त्यांच्या तोंडातून शब्द निघतच धरणी कंपित होऊ लागली सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कळेना कि काय होतंय पण काय करणार ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाची हि सूचना होती. आणि ज्याठिकाणी गणेश मूर्ती होती त्याठिकाणी धरणी दुभंगून एक ८ वर्षाची आतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रकटली आणि तेच दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज. आणि तो विजयसिंग गोट्या खेळताना तेव्हा स्वामींकढून हरला आणि बालरूप स्वामिनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे देऊन वचन तिथून ते गुप्त झाले.

थोडक्यात स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापुर पासून १२ कोस (जवळपास २४ कि. मी. अंतरावर) छेली खेडा नावच्या गावात वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीच्या शेजारी शेजारी झाला. आता शंका हि उपस्थित होईल कि हि गोष्ट कशी काय कळली. पण यागोष्टीचा उलगडा आस झाला. कोकणातील हरिभाऊ (स्वमिसुत) हे अक्कलकोटला आले होते आपल्या ऐहिक इच्छापुरती साठी तेव्हा ते तिथे काही दिवस वास्तव्यला होते. आणि एक दिवस स्वामिनी त्यांना जवळ बोलावले मांडीवर घेतले सांगितले कि आजपासून तू माझा सुत झालास सर्व घरदार सोडून दे आणि दर्याकिनारी माझी ध्वजा उभी कर हे ऐकून हरीभाऊना रडू कोसळले कारण ते इथे ऐहिक इच्छापूर्ती साठी आले होते आणि महाराज तर सर्व सोडायला सांगता आहेत हे पाहून त्यांना थोड रडू कोसळलं तेव्हा स्वामी त्याला म्हणाले कि “रडतोयस काय माझे पोट बघ किती मोठे आहे त्याच्यावर हात फिरव बघू.” आणि ज्यावेळी हरीभाऊनी तसे केले त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले आणि त्यातील त्यांना एक आपलाच जन्म आठवला विजयसिंग म्हणजे दुसर तिसर कोणी नाही तर तो स्वमिसुतांचाच पूर्व अवतार होता.आणि त्यानंतर या सर्व गोष्टींचा उलगडा झाला. आणि या गोष्टीला स्वतः स्वामिनी मान्यता दिली आहे ती पुढील प्रमाणे.

स्वामी प्रकटदिनाचा उत्सव स्वमिसुत महाराजांनी सुरु केला आहे. ज्यावेळी स्वमिसुत महाराज हा उत्सव अक्कलकोट मधे करत होते तेव्हा भुजंगा सारख्या भक्तांनी स्वामिना प्रश्न विचारला स्वमिसुत हे काय करत आहेत तेव्हा स्वामींचे उततर आसे होते”माझा बळ मी सदेह ज्या प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव करत आहे.” नाना रेखी नावाचे अहमदनगर चे स्वामीभक्त होते ते स्वमिसुतांच्या सांगण्यावरून अक्कलकोट ला आले होते तर ते पिंगला जोतिष्य विद्येत पारंगत होते. स्वामिनी त्यांना आज्ञा केली कि माझी कुंडली बनव तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेचच कुंडली बनवण्याचं काम सुरु केल. आणि काही दिवसातच कुंडली बनली आणि त्यातील स्वामी प्रकटण्याचा मजकूर वर प्रमाणे होता, तर ते ती कुंडली घेऊन स्वामींपाशी आले तेव्हा तिथे भजनाचा कार्यक्रम सुरु होता. तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्ताला सांगून माळ्यावर टाकायला सांगितली आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि परत स्वामिनी कुंडली आणण्याची आज्ञा केली तेव्हा त्या कुंडलीवर हळद, कुंकू, अक्षता, तुळस, फुले वैगेरे वाहून सर्व दैवतानि त्या कुंडलीची पूजा केली होती. आणि कुंडली पाहून स्वामींनी खूप खुश आणि नानांचा उजवा हात हातात घेऊन त्यांनी आपला हात हातात त्याच्या ठेवला आणि त्याच्या हातावर विष्णुपद उमटले स्वामींचे आत्मलिंग आणि ते त्यांच्या हयाती पर्यंत होते त्यांच्या हातावर. याचाच आर्थ स्वामिनी वरील कुंडलीला म्हणजे प्रत्यक्ष रित्या स्वामीसुतानी मांडलेल्या स्वामींच्या प्रकटन्यालाच मान्यता दिली आणि त्याचा प्रसाद म्हणून नाना रेखींच्या हातावर विष्णुपद उमटले. आणि आजही हि स्वामींची कुंडली स्वामींच्या अहमदनगर च्या मठात आहे. स्वामी समर्थ महाराज कार्द्लीवनात योग्यांना मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी ते जगात वेगवेगळ्या ठिकाणी स्वताचे खरे नाव, ओळख लपवून चंचलभारती, दिगंबर बुवा आशा नावाने सुद्धा कार्यरत होते.

स्वामी समर्थ प्रकटदिन आपल्या सर्वांसाठी खुप मोठी महापर्वणी आजच्याच दिवशी हा ‘अक्कलकोटस्थ परब्रह्म’ आपल्या सर्वांच्या पुर्वपुण्याईने आपल्याला प्राप्त झाला होता. या भूतलावर अवतीर्ण होऊन सर्व जगतावर अंनत उपकार करणाऱ्या परब्रह्माचा आज प्रकट दिन वा जयंती महोत्सव आहे. हा महोत्सव कोट्यावधी स्वामी भक्तांना नव ऊर्जा, ध्येर्य, दिलासा आणि अगाध करुणा प्रदान करणारा आहे. सूर्याला तेज पुरविणारा आणि मातेच्या ऱ्हदयात ममता निर्माण करणारा, तेजरुपी मायासागराचा धनी असलेला, आपला ‘श्री स्वामी देव’ याच चैत्र शुध्द द्वितिया शके १०७१ (इ. स. ११४९) मध्ये छेली या खेडे गावी प्रकट झाला होता. आपल्या परब्रह्माचा जन्म जेवढा आश्चर्यकारक आहे, त्यापेक्षा लाख पटीने जास्त आश्चर्यकारक त्यांचे जीवन चरित्र आहे. हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. इ. स. ११४९ ते १८७८ हा स्वामींचा अवतार काळ मानला जातो. परंतु ११४९ पुर्वी आणि १८७८ नंतर ही दृश्यादृश्य स्वरूपात स्वामींची लीला चालूच होती व आजही चालूच आहे. तेव्हा स्वामींच्या चरित्राचा शोध घेणे हे सूर्याला गवसणी घालण्यासारखे महाकठिण कार्य आहे. तरी सुध्दा दया सागर स्वामींनाच शरण जावून आपण स्वामींचा प्रकट दिन सोहळा श्री स्वामी सुत महाराजांच्या पुढिल अभंगातून पाहू या

दिला आहे.

स्वामींच्या हातातील गोटी विषयी असाच एक प्रसंग शुरसेनानी २०१५ मध्ये आला आहे. तो पुढील प्रमाणे, श्री स्वामी समर्थ हातातील गोटीविषयी म्हणाले, ‘असे सख्या तुला पाहायचे आहे का ते काय आहे?’ असे म्हणून स्वामींनी ती गोटी खाली टाकली. तत्क्षणी गोटी ब्रह्मांडरूप होऊन तिचा स्फोट झाला. ब्रह्मांडाचे अधिक व्यापक दर्शन त्यात होऊ लागले. सहजलीलेने श्री स्वामीं देवांनी ते ब्रह्मांड आपल्या बोटात ओढून घेतले. तेव्हा ती पुन्हा गोटीच दिसू लागली. तेव्हा ती परब्रह्ममूर्ती पुढे म्हणाली, ‘आम्ही हे धरून आहोत तोपर्यंत आहे. आम्ही सोडले की सारे संपले.’ हा रोमांचकारी प्रसंग श्री स्वामी महाराज व परमपुज्य मामासाहेब देशपांडे यांच्या मधील असून, श्रीपाद सेवा मंडळ, पुणे या संस्थेचे अध्वर्यु शिरीषदादा कवडे यांच्या बरोबरील चर्चेवेळी समजला. (संदर्भ: शुरसेनानी २०१५ दिवाळी अंक)

स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांनी प्रकट होऊन आपली पहिली लीला ही मुलांना दाखविली. यावरून स्वामींना बालकांविषयी असलेली ममता व स्नेह याची जाणीव होती. भक्त प्रल्हाद, ध्रुव बाळ, उपमन्यू बाळ यानांही परमेश्वर भेटला मात्र यासाठी त्यांना कठोर परिश्रम व दिर्घ स्वरुपाची साधना करावी लागली होती. येथे मात्र विजयसिंगाला अगदि सहजतेने आणि ते ही स्वत:प्रमाणेच बालक स्वरुपात प्रत्यक्ष परब्रह्म भेटला, त्याच्यांशी खेळला. यावरून परब्रह्माचे अथांग करूणा स्वरूप प्रकट होते. त्याची निर्मळ आणि निस्वार्थ भक्तांप्रती असणारी ओढ लक्षात येते. तेव्हा आपण ही आपले मन निर्मळ आणि निस्वार्थ ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करावा, म्हणजे आपल्याला ही स्वामी महाराज आपलेसे करतील. हीच शिकवण देणारा आजचा अभंग आहे.

अभंगावरील विवेचन झाल्यानंतर पुढे आपण आता स्वामींचे ओझरते चरित्र पाहण्याचा प्रयत्न करू या!

स्वामी महाराजांनी या मुलांचा उध्दार केल्यानंतर मग छेली या गावातील लोकांचा उध्दार केला. येथिल ग्रामस्थांना अनेक लीला दाखवल्या. स्वामींच्या आगमणाने छेली गाव हे गोकुळ बनले. जे भाग्य गोकुळ वासिंयाना भगवान श्रीकृष्णामुळे प्राप्त झाले, तेच भाग्य छेली वासियांना स्वामी कृपेने मिळाले. स्वामींच्या नाना लीला, असंख्य खेळ याचे साक्षिदार होण्याचे महत्भाग मिळाल्यामुळे छेली वासिय लोकांचे भाग्य विलक्षणच बनले. पंचक्रोशितील ग्रामस्थांचे तीर्थक्षेत्र बनलेल्या छेली गावचे दैवत ‘श्री स्वामी देव’ मात्र आपला मुक्काम अन्यत्र हलवण्याचा निर्णय घेते झाले. तेव्हा मग येथिल ग्रामस्थांचे कल्याण करून व त्यांना सत्य बोध करून स्वामी महाराज आपल्या पुढिल भ्रमंतीला निघाले. तेव्हा छेली ग्रामस्थांच्या दु:खाला पार उरला नाही. जी अवस्था श्री कृष्णांच्या गोकुळ सोडण्याच्या वेळी गोकुळ वासियांची झाली होती, त्याहून ही बिकट अवस्था छेली ग्रामस्थांची झाली होती. पण काहीही झाले तरी परब्रह्म आता मागे परत फिरणार नव्हते. त्यामुळे जड अंत:करणाने सर्वजण आपल्या घरी परतून स्वामी विरह दु:खात आकंठ बुडाले. इकडे स्वामी महाराज छेली गावातून निघून थेट हरिद्वारास गेले. पुढे ऋषिकेश येथे जावून तेथिल पुरोहितांमधील हरीहर भेद नाहीसा केला. हरी वेगळा आणि हर म्हणजे शिव वेगळा नसून हे दोन्ही एकच आहेत. याचा दाखला देऊन तेथिल काही भक्तांना आपले विश्वरूप दाखविले. यानंतर मग हिमालय पर्वतावर काही काळ निवास करून तेथून पुढे मग रुद्र प्रयाग, देवप्रयागला गेले. त्यानंतर मग काशी क्षेत्री स्वामींनी काही काळ निवास केला. त्यानंतर मग ब्रदिनाथ व केदारनाथ येथे भ्रमंती करून स्वामी पुढे सोमप्रयाग, नरनारायण स्थान येथून पुढे मग मानसरोवर येथे गेले. येथे काही काळ वास्तव्य करून मग स्वामी तेथून पुढे चीन आणि तिबेट या प्रदेशात गेले. येथून पुढे मग नेपाळ येथिल पशुपतीनाथ येथे काही काळ निवास केला. पुढे नंतर जगन्नाथपुरी, द्वारका, गिरणार पर्वत, कलकत्ता, रामेश्वर, हैद्राबाद, मुंबई, अंबेजोगाई, राजूर, पंढरपूर, हुमणाबाद, मोहोळ, मंगळवेढा, सोलापूर अशी भ्रमंती करत करत शेवटी अक्कलकोटी आले व येथेच स्थिर झाले. स्वामी महाराज अक्कलकोटी आल्यानंतर त्यांनी केलेल्या लीला व तेथिल चरित्र हे बऱ्यापैकी उपलब्ध असल्यामुळे याबाबत जास्त काही लिहिण्याची आज आवश्यकता नाही. पण *स्वामी महाराजांच्या छेली गावापासून ते अक्कलकोटी येईपर्यंतच्या प्रवासासंबधी व चरित्रासंबंधी खात्रीशिर आणि सुत्रबध्द माहिती उपलब्ध नसल्यामुळे याबाबतीत नेहमीच मत मतांतरे होत असतात. परंतु अक्कलकोटमध्ये स्वामींचे जवळपास २३ वर्षे वास्तव्य होते. आणि या काळात स्वामींनी दाखवलेल्या लीला, आपले सामर्थ्य, आपला सर्वेश्वराधिकार यागोष्टी पाहता, स्वामी महाराज हे पुर्ण परब्रह्म स्वरुप होते. या बाबतीत मात्र सर्वच चरित्रकारात एकमत आहे. आपण ही स्वामींच्या स्वरुपाबद्दल व शक्ती सामर्थ्याबद्दल स्वामी वैभव दर्शन भाग ०१ मध्ये सविस्तर माहिती घेतल्यामुळे ईतर मत मतांतरे यात न गुतंता स्वामींच्या सर्वेश्वर आणि पुर्ण परब्रह्म स्वरुपावर दृढ श्रध्दा आणि निष्ठा ठेवून, आपली पुढिल आध्यात्मिक वाटचाल करावी. स्वामी महाराजांना पुर्णपणे शरण जावे.

मार्गदर्शन केले. भेटेल त्याला आपल्या लीलेने आगळ्यावेगळ्या पद्धतींनी दुःखमुक्त करून कार्यरत केले.

अक्कलकोट प्रवेश
इसवी सन १८५६ मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला व तिथल्या बावीस वर्षांच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले. येथे त्यांनी जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले.

अवतार कार्य समाप्ती – इसवी सन १८७८ मध्ये स्वामींनी अनेकांना कार्यरत करून त्यांचा एक आविष्कार संपविला असे भासवले. प्रत्यक्षात स्वामी महाराज आजदेखील भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करून कार्यरत करीत आहेत व अनंतकाळपर्यंत करीत राहतील अशी त्यांंच्या भक्तांंची श्रद्धा व धारणा आहे.

स्वामी समर्थ पुण्यतिथी – श्री स्वामी समर्थ महाराज यांनी रविवार दि. ३० एप्रिल १८७८ रोजी (चैत्र वद्य त्रयोदशी, शके १८००, बहुधान्य नाम संवत्सर) अक्कलकोट येथे वटवृक्ष समाधी मठ स्थानी माध्याह्नकाली आपल्या अवतारकार्याची समाप्ती केली. नंतर श्री स्वामी समर्थ यांना श्री स्वामींचे परम शिष्य चोळप्पा यांच्या निवासस्थानाजवळ समाधिस्थ करण्यात आले.

पूर्णब्रह्मस्वरुप अवतार – श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहेत असे मानले जाते. भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे. कोणाला श्री विठूमाऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले तर कुणाला श्री भगवान विष्णूच्या स्वरूपात तर कुणाला भगवती देवीच्या रूपात. महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखविल्या आहेत अशीही भक्तांंची धारणा आहे.

श्री स्वामी जयघोष – अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.

अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थांचे वरील जयघोष जसे प्रभावी आहेत. त्याच प्रमाणे महाराजांचे स्वामी समर्थ तारक मंत्र हा सुद्धा फार प्रभावी आहे

श्री स्वामी समर्थ प्रकट दिन पोथी – “श्री स्वामी समर्थ प्रकटदिन पोथी” या ग्रंथरूपाने श्री स्वामी समर्थांनी कृपावंत होऊन हा ज्ञानामृताचा घट समस्त भक्तांसाठी उपलब्ध करून दिला आहे. श्री स्वामीस्वरूप सदगुरू प. पू. श्री शरदजी ब. लाठकर काका यांच्या अमृतवाणीद्वारे जी प्रबोधने आविष्कृत झाली आहेत त्याचे ओवीबद्ध रुपांतर म्हणजेच ही पोथी होय. श्री स्वामी समर्थांनी कृपावंत होऊन हा ज्ञानामृताच कलश भक्तांसमोर प्रस्तुत केला आहे. या दयाघन कृपावंत सदगुरूंचे ऋण फिटणे केवळ अशक्य! सदगुरूंनी आम्हांस सदैव त्यांच्या कृपा छत्राखाली असु द्यावे ही स्वामींच्या चरणी विनम्र प्रार्थना आहे.

श्री स्वामी समर्थांच्या चरित्रावर बहुविधी ग्रंथ आज उपलब्ध आहेत. श्री स्वामींचे निस्सीम भक्त श्री वामनरावजी वैद्य वांबोरीकर लिखित “श्रीगुरूलीलामृत” ग्रंथासह इतर सर्वग्रंथामध्ये शके १६८० ते १८०० या काळातील वर्णन केले आहे. परंतू श्री स्वामींच्या प्रकटीकरणाचा वृत्तांत ध्यानी घेतल्यास असे लक्षात येते की शके १०७१ मध्ये स्वामींचे अवतरण छेले खेडेग्रामी झाले आहे. या संबंधीची कथा अशी आहे की नगरचे स्वामीभक्त पिंगळा ज्योतिषी श्री. नाना रेखी यांनी स्वामींच्या आज्ञेवरून त्यांची जन्मकुंडली मांडली. त्याप्रमाणे शके १०७१ मध्ये छेले खेडेग्रामी धरणी दुभंग होऊन सप्तवर्षीय बालकाचे अवतरण झाले. या कुंडलीस श्री स्वामींनी अनुमोदन दिले व आशीर्वादार्थ श्री. नाना रेखी यांच्या तळहातावर आपले आत्मलिंग प्रदान केले. ते तथ्य लक्षात घेता शके १०७१ ते १८०० पर्यंतचा ७२९ वर्षांचा प्रदीर्घ काळात एकाच मानवी देहातून कार्य घडणे आपल्या तर्काच्या पलीकडे आहे. स्वामीस्वरूप प. पू. श्री शरदजी लाठकर काका यांच्या प्रबोधनातून याचा खुलासा झाला आहे की, स्वामी समर्थांचे चरित्र म्हणजे अजन्मा अमर तत्वाचे म्हणजेच परब्रह्म परमेश्वराच्या लीला विग्रहाचे वर्णन होय. शके १०७१ ते १२४२ या दरम्यानच्या १७१ वर्षांच्या कालावधीतील स्वामी लीलांचे वर्णन प्रस्तुत पोथीमध्ये आहे. हा कथाभाग आजपर्यंत अज्ञात होता परंतु भक्तांच्या महद भाग्यवशे दिव्य प्रबोधनांच्या निमित्ताने हे ज्ञानामृत स्वामीभक्तांपर्यंत पोथीच्या स्वरूपात पोचले आहे. ही सर्वांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे. प्रस्तुत प्रबोधनांतील मजकूर ओवीबद्ध करून भक्तांना उपलब्ध करून देण्याचे श्रेय पुणे येथील स्वामीभक्त डॉ. श्री. माधवराव चिंतामणी दिक्षित (एम. कॉम. पिएच. डी.) यांचे आहे.

जो भक्त श्रद्धायुक्त अंतःकरणाने या पोथीचे नित्य वाचन व सप्ताह पारायण करील त्याला मोक्षाचा मार्ग निश्चित लाभेल हे सदगुरू श्री स्वामी समर्थांचे अभिवचन आहे, याचे निरंतर स्मरण ठेवावे. प्रस्तुत पारायण पोथीचा रोज एक अध्याय वाचावा तसेच स्वामी प्रकटदिन सप्ताहात अवश्य पारायण करावे.प्रस्तुत ग्रंथाची निर्मिती कथा समस्त स्वामीभक्तांपुढे मांडणे अगत्याचे आहे. प्रत्येक मानवाने सदगुरू मुखातून निजज्ञान प्राप्त करावे व मानवजन्म सार्थकी लावावा यासाठी कृपासागर श्री स्वामी समर्थ सदगुरू या कलियुगी आजही कार्यरत असून विविध भक्तांच्या माध्यमातून भक्तांचा उद्धार करण्याचे कार्य निरंतर करीत आहेत व “हम गया नही जिंदा है” याची यथार्थता सिद्ध करीत आहेत. स्वामिकृपांकित स्वामीस्वरूप प. पू. श्री लाठकर काका यांच्याद्वारे नेमके हेच कार्य गत काही वर्षांपासून अव्याहतपणे चालू आहे. नित्य नेमाने आसनस्थ झाल्यावर दररोज संध्याकाळी विशिष्ट कालावधीमध्ये प. पू. श्री लाठकर काकांच्या दिव्य वाणीद्वारे श्री स्वामी संचार प्रबोधने प्रस्तुत होत असतात. ही प्रबोधने श्रवण करताना स्वामींच्या आविष्काराचा अनुभव सर्व सश्रद्ध भक्तांना येतो.प्रस्तुत प्रबोधने ही मानवनिर्मित नसून सदगुरू तत्वाने ओतप्रोत भरलेल्या व सदगुरू तत्वाशी एकस्वरूप पावलेल्या मानवी देहाच्या माध्यमातून प्रकट झालेली असल्याने त्या दिव्य वाणीद्वारे श्री स्वामी समर्थांच्या आविष्काराचा प्रत्यय येत असतो.ज्या देहात श्री स्वामी समर्थांचा आविष्कार होतो, तो देह त्या गुरुतत्वाशी एकरूप झालेला असतो व त्यांच्या वाणीद्वारे ज्ञानगंगेचा दिव्य प्रवाह, भक्तांच्या कल्याणार्थ वाहू लागतो.

सप्ताह पारायण विधी – पारायण प्रारंभ करण्यापूर्वी रोज प्रातःकाळी निश्चित वेळेला उठून स्नानसंध्या झाल्यावर “श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ” या सिद्ध मंत्राची एक माळ करावी व ध्यानधारणा करावी, वाचनास आरंभ करण्यापूर्वी कुलदैवत, माता-पिता व गुरु यांना वंदन करून आशीर्वाद मागावेत. नंतर संकल्प करून श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेची व पोथीची पूजा करावी. देवासमोर सात दिवस अखंड दीप ठेवणे. पोथीचे संपूर्ण वाचन होईपर्यंत पूर्ण सप्ताह दीप कायम ठेवावा. शक्यतो देवघरातच आसन करावे तसे शक्य नसेल तर घरात पावित्र्य राहील अशा ठिकाणी आसन मांडावे. नित्य सोवळ्यात राहून पाठ करावा. रोजचे वाचन संपे पर्यंत मधेच आसन सोडू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये. स्वतःला ऐकू येईल एवढ्या आवाजात वाचन करावे. श्रद्धा भक्ती युक्त अंतःकरणाने प्रेमपूर्वक एकाग्र चित्ताने सावकाश वाचन करावे. त्यामधील तत्वरहस्य जाणून घ्यावे व बोध घ्यावा हे महत्वाचे आहे. रोजचे पाठ वाचून झाल्यावरही उत्तरांग पूजन करणे. दैनंदिन रोजचे पाठ झाल्यावर दिवसभर “श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ” या सिद्ध मंत्राने स्वामींचे अनुसंधान करावे. मानसिक व शारीरिक ब्रह्मचर्य पाळावे. दैनंदिन जीवनात सदाचार ठेवावा. पारायणाच्या सात दिवसांत पचनास हलके भोजन घ्यावे. भोजनात कांदा, लसूण वर्ज्य करावा. समारोपाच्या दिवशी पोथीचा पाठ पूर्ण झाल्यावर महानैवेद्य दाखवून आरती करावी. सांगतेप्रीत्यर्थ यथाशक्ती ब्राह्मण-सुवासिनी संतर्पण करणे.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्टड रहा, धन्यवाद.!!

Leave a Comment