स्वतःला एक सच्चा लाईफ पार्टनर म्हणून सिद्ध करतात या राशींच्या मुली..!!

आपलं मन नेहमीच एका सच्च्या जीवनसाथीच्या शोधात असते. जो आपल्याला मनापासून समजून घेऊ शकेल असा सच्चा साथी आपल्याला हवा असतो. तसेच आपल्या पेक्षाही जास्त प्रेम त्याने आपल्यावर उधळावं, जास्त जीव आपल्याला लावावा अशी आपली रास्त अपेक्षा असते.

तसं तर असेही म्हटले जाते की लग्नाच्या जोड्या या मुळातच स्वर्गातच बनतात, आणि देव स्वत: वरुन त्या जोड्या बनवून पाठवत असतो. परंतु आम्ही मात्र आमची जोडी शोधण्याचा प्रयत्न करत असतो.

कधी कधी असंही होतं की आपण एखाद्या चुकीच्या राशीच्या लोकांच्या प्रेमात पडतो, आपण चुकीच्या राशीच्या लोकांच्या प्रेमात पडल्याने आपलं प्रेम यशस्वी होत नाही.

मित्रांनो, प्रेमाच्या बाबतीत महिलांचा दृष्टीकोन फार वेगळा असतो. त्या नेहमी पुरुषांपेक्षा अगदी भिन्न विचार करत असतात, समजा जर आपण एखाद्या मुलीला पाहिल्यानंतर तिच्याकडे आकर्षित झालोच तर सर्वात आधी तिचं आपल्याबद्दल काय मत आहे..?? तिला तुम्ही आवडतात का..?? याबद्दल तिचे विचार आधी जाणून घ्या.

आता आपण राशिचक्रानुसार स्त्रियांचे प्रेमाबद्दल काय मत असते, त्या नक्की कय विचार करतात ते बघणार आहोत. आणि प्रेमाच्या बाबतीत कोणत्या राशीची मुलगी कशी असते हे सुद्धा पाहणार आहोत.

मेष रास –
मेष रास असलेल्या मुली अशा प्रेमाच्या शोधात असतात जे शेवटपर्यंत त्यांच्याप्रति संपूर्णपणे एकनिष्ठ राहू शकेल. आणि त्यांना असा विश्वास दाखवून देईल की ती मुलगी त्यांच्या साठी आयुष्यातील फर्स्ट प्रायोरिटी असेल.

वृषभ रास –
या राशीच्या मुली जेव्हा पण कधी रागावतात तेव्हा या मुलींना सावरणं खुप अवघड होऊन बसतं. कुणीही त्यांना आवरु शकत नाही. पण जेव्हा प्रेमाची वेळ येते, तेव्हा त्या खऱ्या निष्ठेने प्रेम निभावतात. मग त्यांचं प्रेम म्हणजे एक निस्सीम भक्ति बनून जाते.

मिथुन रास –
मिथुन राशीच्या मुली खूप रोमँटिक असतात, तसेच या स्त्रिया खूपच चंचल असतात, बहुतेक लोक मिथुन राशीच्या स्त्रियांच्या अपेक्षेनुसार खरे उतरत नसतात. म्हणूनच या राशीच्या स्त्रियांसाठी खरं प्रेम मिळविणे फार कठीण फार होऊन बसते.

कर्क रास –
या राशीच्या मुलींचा इतरांवर लवकर विश्वास विश्वास बसत नही, त्यासाठी त्यांना बराच वेळ जाऊ द्यावा लागतो. कर्क राशीची स्त्री प्रेमामध्ये थोड्या लाजाळू असतात. परंतु त्या एकनिष्ठ आणि विश्वासार्ह प्रेमीका असल्याचे म्हटले जाते.

सिंह रास –
सिंह राशीच्या मुली अगदी सहजच प्रेमात पडत असतात, पण तेव्हाच जेव्हा योग्य प्रेमी त्यांच्या कल्पना विश्वात घेऊन जातो तेव्हाच हे घडते. आणि सिंह राशीच्या मुली त्यांच्या प्रेमाच्या बाबतीत खूपच गंभीर असतात.

कन्या रास –
खरं तर कन्या राशीच्या मुली खूप भावनिक आणि प्रखर असतात, त्यांना आपल्या प्रियकरामध्ये कोणत्याही प्रकारची कमजोरी असलेलं आवडत नाही. म्हणूनच अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी त्यांचं नातं टिकवणं फारचं अवघड होऊन बसतं.

तुळ रास –
तुळ राशीच्या मुलींना प्रेमात योग्य तो ताळमेळ आणि संतुलन हवे असते. प्रेमात त्या एका चिकित्सक व्यक्तीची भूमिका बजावत असतात. तुळ राशीच्या स्त्रिया हे आधी बघतात की त्यांनी निवडलेला जीवनसाथी संपूर्णपणे त्यांच्या प्रती समर्पित आहे किंवा नाही.

वृश्चिक –
वृश्चिक राशीच्या मुली नेहमीच त्यांच्या प्रियकरासाठी एका प्रकारचं रहस्यं असू शकतात. त्यांच्या वास्तविक भावना आणि हेतू कधीकधी सं-शयास्पद असू शकतात.

धनु-
धनु राशीच्या मुलींना एक असा जीवनसाथी हवा असतो जो त्यांच्याशी मानसिक आणि शारीरिक पातळीवर मिळता जुळता असावा, आणि अशी एखादी व्यक्ती जी त्यांना संपूर्णपणे समजून घेऊन त्यांच्यावर प्रेम करू शकेल.

मकर –
मकर राशीच्या मुली तर पहिल्याच नजरेत प्रेमात पडतात, त्यांना त्याबाबतीत वेळ घालवलेला चालत नाही. त्या प्रेमावर विश्वास ठेवतात, परंतु सहसा त्याचा नशिबाशी काहीही संबंध नसतो.

कुंभ –
कुंभ राशीच्या मुलींना कुणावरही अति विश्वास दाखविण्याची सवय असते. पण एखाद्यावर प्रेम करायला आणि त्याला समजून घेण्यासाठी त्यांना बराच वेळ जाऊ द्यावा लागतो. यामुळे, त्यांचं प्रेमाचं गोड नातं तयार होण्यासाठी बऱ्याच अडचणी येतात.

मीन-
मीन राशीच्या मुलींना प्रेमात पडल्यानंतर त्या प्रेमात आकंठ बुडायला आवडते, एकदा त्या प्रेमात पडल्या की त्यांच्या प्रेमाच्या सुंदर स्वप्नांमध्ये त्या हरवून जातात. आणि रात्रंदिवस त्यांच्या जीवनसाथी बद्दल विचार करत बसतात.

टीप- येथे दिलेली सर्व माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा,शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment