स्वतःची किंमत वाढवा : भरपूर पैसा कमवा : फक्त करा ‘या’ तीनच गोष्टी.!!!

मित्रांनो या जगात आपली किंमत कोणत्या आधारावर ठरते? जर तुम्हाला जास्त पैसे कमवायचे असतील तर तुमची मार्केटमध्ये किंमत जास्त असली पाहिजे. का काही लोकांकडे कमी काम करून सुद्धा भरपूर पैसे येतात, पण काही लोक बारा-बारा तास काम करून सुद्धा त्यांना हवे तेवढे पैसे मिळत नाहीत.

अर्थशास्त्राचे नियम –

1)ज्या गोष्टीची मागणी वाढते त्या गोष्टीची किंमत वाढते, ज्या गोष्टीची मागणी कमी होते त्या गोष्टीची किंमतही कमी होते किंवा ज्या गोष्टीचा पुरवठा कमी होतो तेव्हा गोष्टीची किंमत वाढते. तुम्ही पाहिले असेल ज्यावेळेस कांद्याचा पुरवठा कमी होतो त्या वेळी कांद्याचा भाव शंभर रुपये किलो, दीडशे रुपये किलो असे होतात. पण एकदा त्याचा पुरवठा झाला की त्याचे भाव कमी व्हायला लागतात.

जर एखाद्या क्षेत्रात खूप लोक असतील पण त्याची मागणी मर्यादित आहे असं असेल तर निश्चितच तुम्हाला त्याचा मोबदला हवा तसा मिळणार नाही. आता असे नाही की मागणी कमी आहे म्हणून तुम्ही तुमचे क्षेत्र बदला किंवा फिल्ड बदला प्रत्येक क्षेत्र खूप मोठे असते तेव्हा तुमच्या क्षेत्रात अशा जागा शोधून काढा जिथे मागणी जास्त आहे पण पुरवठा कमी आहे. मग त्या गोष्टीचा ज्ञान संपादन करा, मेहनत घ्या आणि स्वतःची किंमत वाढवा.

2) अजून एक उदाहरण म्हणजे, समजा तुमच्याकडे एक मोकळी जागा आहे. जी खूप घाण झाली आहे त्या जागी दगड, विटा, कचरा पडला आहे. आता तुम्हाला ही जागा साफ करायची आहे. तुम्ही एका कामगाराला सांगता कि हि जागा व्यवस्थित साफ करायची आहे.

तो कामगार म्हणतो ही जागा साफ करण्यासाठी मला आधी खणावी लागेल. म्हणजे व्यवस्थित कचरा निघेल आणि नंतर माती टाकून सपाट करावे लागेल. खणायचे 500 रुपये आणि माती टाकून सपाट करायचे पाचशे रुपये. असे टोटल हजार रुपये होतील. तुम्ही तयार होता.

आता समजा तुमचा दात खूप दुखतोय, त्याला कीड लागली आहे, तुम्ही डेंटिस्टकडे जाता, डेंटिस्ट म्हणतो तुम्हाला रूट कॅनल काम करावे लागेल आणि त्या कॅप बसवावी लागेल. मित्रांनो रूट कॅनल म्हणजे दातातील लागलेली सगळी कीड काढून खड्डा करतात आणि नंतर त्यामध्ये सीमेंट भरून वरून कॅप लावतात.

डॉक्टर म्हणतात रूट कॅनल चे चार हजार रुपये होतील आणि कॅप लावायचे चार हजार रुपये होतील. म्हणजे टोटल आठ हजार रुपये. मित्रांनो या उदाहरणांवरून तुम्ही पाहिला असेल की कामगाराचे आणि डेंटिस्ट चे काम तसे सारखेच आहे. पण डेंटिस्ट आठ पट जास्त घेतो.

आणि मला वाटतं कामगार डेंटिस्ट पेक्षा जरा जास्तच मेहनत देत असेल. पण डेंटिस्ट तुमचा जीव कासावीस होण्यापासून वाचवतो. तुम्हाला असंय वेदनांपासून वाचवतो. म्हणजे तो तुमच्या जीवनात जास्त व्हॅल्यू addition करतो. म्हणून त्याची किंमत तेवढी आहे.

तसेच तुम्ही जे काम करता किंवा व्यवसाय करता ते समोरच्याचे किती मोठी समस्या सोडवते त्याच्यावरून तुमचे किंमत ठरते. जेवढी मोठी तुम्ही समस्या सोडवता तेवढी तुमची किंमत वाढते. आता इथे असं नाही हे तुमची किंमत वाढवण्यासाठी तुम्ही डॉक्टर किंवा डेंटिस्ट झाले पाहिजे.

ज्या क्षेत्रात तुम्ही आहात त्या क्षेत्रात अशा जागा शोधून काढा की जेथे समस्या जास्त आहेत. मग त्या समस्यांचे सोल्युशन तुम्ही द्यायला लागले की तुमची किंमत आपोआप वाढेल.

3) अजून एक उदाहरण म्हणजे, एका कंपनीमध्ये लेटेस्ट डिझाईनची एक मशीन असते मशीन कंपनी साठी खूप महत्त्वाचे असते. पण एक दिवस ती बंद पडते. सगळे एक्सपोर्ट्स प्रयत्न करतात पण ती मशीन काही चालू होत नाही. मग बाहेरून एका एक्सपर्ट मेकॅनिकला बोलवतात,

तो मेकॅनिक व्यवस्थित की मशीन बघतो आणि हातोड्याने एका ठिकाणी जोरात मारतो आणि म्हणतो बटन चालू करा, बटन चालू केल्याबरोबर मशीन चालू होते. कंपनीचा मालक विचारतो किती पैसे झाले तो माणूस म्हणतो रु.5000.

तो मालक म्हणतो एक हातोडा मारायचे पाच हजार रुपये एवढे कसे काय तो मेकॅनिक म्हणतो शंभर रुपये हातोडा मारायचे आणि चार हजार 900 रुपये कुठे हातोडा मारायचा याचे. मित्रांनो मला या गोष्टीवरून हे सांगायचं आहे की तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील किती ज्ञान आहे यावरून सुद्धा तुमची किंमत ठरते.

तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील नवीन गोष्टींचे ज्ञान नसेल तर तुमची किंमत कमी होऊ शकते. जी लोकं नवीन गोष्टींना म्हणजे बदल करून घ्यायला नकार देतात त्यांची प्रगती थांबते. म्हणजे कॅमेरा क्षेत्रात एक नंबर ला असलेली कंपनी कोडक रसातळात गेली कारण नवीन बदलांना त्यांनी स्वीकारले नाही.

80 टक्के मार्केट शेअर असलेली कंपनी नोकिया पार डबघाईला गेले कारण मार्केट मधील नवीन बदल स्वीकारले नाहीत. तसेच तुम्ही तुमच्या क्षेत्रातील नवीन गोष्टी शिकत नसाल तर तुम्ही अधोगतीला चालले आहात असे समजावे. म्हणून सतत नवीन गोष्टी शिकत राहा आणि स्वतःची किंमत वाढवत राहा.

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. अशाच प्रकारच्या अधिक माहितीसाठी आताच आमच्या पेजला लाईक करा व शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment