मित्रांनो आपल्या घरातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे स्वयंपाक घर. कारण इथेच आपण सर्वांसाठी स्वयंपाक तयार करतो. व त्यातूनच आपल्याला ऊर्जा व शक्ती निर्माण होते. आपण जसे अन्न खातो त्याप्रमाणे आपले मन होते.
म्हणून स्वयंपाक करताना मन प्रसन्न असायलाच हवे. व स्वयंपाक घर ही साफ, स्वच्छ व सकारात्मक ऊर्जेने भरलेले असायला हवे. जर स्वयंपाक घर अस्वच्छ असेल, त्यात नकारात्मक ऊर्जा भरलेली असेल, तर गृहिणीला तिथे स्वयंपाक करण्याची इच्छा सुद्धा होत नाही.
घरातील स्त्री स्वयंपाक करत असताना आजूबाजूचे वातावरण जर नकारात्मक असेल तर त्या स्वयंपाकावर सुद्धा तोच परिणाम पडतो. व तो स्वयंपाक ज्या व्यक्ती खातात त्यांचे मन ही नकारात्मक ऊर्जेने भरून जाते.
स्वयंपाक घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाऊन तेथे सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावे म्हणून तुम्ही या दोन वस्तू किचन मध्ये ठेवा. त्यातील पहिली वस्तू आहे बुका.
तो आपण श्रीकृष्णाला किंवा पांडुरंगाला लावण्यासाठी वापरतो तो बुका. हा आपल्याला कोठेही पूजा सामग्री च्या दुकानात आरामात मिळेल. कितीतरी तंत्र मंत्र साधने मध्ये या काळया बुक्याचा वापर केला जातो.
त्यामध्ये इतकी प्रचंड शक्ती असते की वातावरणातील संपूर्ण नकारात्मकता हे आपल्याकडे आकर्षित करते. ते एका काचेच्या बाउल मध्ये किंवा वाटीमध्ये टाकून कोणाचाही हात लागणार नाही. व कोणालाही दिसणार नाही. अशा ठिकाणी ठेवून द्यावा.
एकदा ठेवल्या नंतर त्या वाटीकडे कोणीही लक्ष देऊ नये. दर दोन महिन्याने ती वाटी काढून त्यातील बुक्का टाकून द्यावा. व वाटी घासून, पुसून स्वच्छ करून पुन्हा दुसरा बुक्का त्यात भरून ठेवावा.
त्यामध्ये दुसरी वस्तू म्हणजे कांदा. या कांद्याचे दोन भाग करून तो कांदा सोलून घ्यावा. व त्या वाटी शेजारी दुसऱ्या वाटीत कांदा ठेवावा. कांदा दर आठवड्याला बदलावा.
कांद्यामुळे किचन मधील सगळे जीवजंतू, किटानु, बॅक्टेरिया यांचा नाश होतो. कांद्यात इतकी पावर आहे, की साथीच्या रोगांमध्ये प्रत्येक खोलीत एक एक कांदा कापून ठेवला.
व दुसऱ्या दिवशी त्याची तपासणी केली तर रोगाची कारणे असणारे सर्व बॅक्टेरिया, किटाणू आपल्याला त्या कांद्यावर आपल्याला दिसतात म्हणून जास्त वेळ चिरून ठेवलेला कांदा ही स्वयंपाकात वापरू नये.
किंवा कच्चा कांदा, सलाद असेल तरच खावे. कांदा व बुक्का हे दोन वस्तूमुळे तुमच्या किचन मधील सर्व नकारात्मकता निघून जाईल. व तुमची किचन सकारात्मक ऊर्जेने भरून जाईल.
वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद!