तुमच्या स्वयंपाक घरातील या 5 वस्तु कधीही संपू देऊ नका. अन्यथा भोगावे लागतील प’रिणाम..!!

घरातील स्वयंपाकघराला वास्तुशा’स्त्रात खूप महत्वं दिलेलं आहे. स्वयंपाकघर कधीही घराच्या दक्षिण-पूर्व दिशेलाच बांधलेले पाहिजे, हे आपण ऐकून असालच पण याच वास्तुशा’स्त्रात हे देखील नमूद केले आहे की स्वयंपाक घरातल्या काही वस्तु किंवा शिधा कधीही पू्र्णत: संपायला नकोत.

या वस्तु संपल्यावर आपल्याला काही वास्तू सं’बंधित दो’षांचा सामना करावा लागू शकतो. आज आपण याच विषयावर विश्लेषण करणार आहोत. चला तर मग त्या वस्तु कोणत्या तसेच त्या पूर्णतः संपून गेल्यात तर कोणत्या अ’डचणी तथा वास्तु दो’ष उत्पन्न होतात ते पाहू. अशा वस्तुंविषयी आज आपण जाणून घेऊयात.

घरातील स्वयपांक घर हे समृद्धीचे तसेच दानशूर वृत्तीचेही प्रतीक आहे. कारण याच ठिकाणाहून सगळयांचे मन व आत्मा व पोटाची भूक तृप्त करण्याचे कार्य होते, वास्तुशा’स्त्रनुसार स्वयंपाकघरातील शिधा किंवा जेवणासाठी वापरात येणाऱ्या सर्व वस्तू या योग्य प्रमाणात भरलेल्या असणे खूप गरजेचं आहे. यातील काही महत्त्वाच्या वस्तुंविषयी आपण चर्चा करणार आहोत.

तर आपल्या घरात नेहमी भरभराटी राहावी, बरकती रहावी, आपलं घर नेहमी भरलेले रहावं, यासाठी आपल्या स्वयंपाकघरातील काही वस्तू कधीच संपू देऊ नये, त्या थोड्याश्या शिल्लक असतात, तत्पूर्वीच या वस्तू घरात आणून ठेवायला हव्यात.

तर या वस्तू कोणकोणत्या आहेत, हे आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत, चला तर पाहूयात त्या वस्तूंची नावं ज्या घरातून पूर्णतः संपू द्यायच्या नाहीयेत. घरात नेहमी त्या भरलेल्या किंवा हातचं राखून ठेवण्यात आलेल्या असाव्यात.

त्या वस्तुं मध्ये सर्वात पहिली आणि महत्वाची वस्तु म्हणजे मीठ, मित्रांनो घरातले मीठ कधीही संपून जायला नको, तसेच आपल्याला एक सवय असते कुणी शेजारीण आली रिकामी वाटी घेऊन काही घ्यायला तर आपण लगेच देऊन टाकतो. असं शेजारीपाजारी असलेलं कुणी आलं आणि मीठ मागितलं तर मीठ कदापि देऊ नये, स्वयंपाकघरातील मीठ संपलं तर घरावर करणी तंत्र-मंत्र होऊ शकतात.

चुकूनही आपण जर शेजारी पाजारी मीठ दिलं तर एखादी वाईट बातमी कानावर येऊ शकते, तसेच मीठ देतांना कुणाच्या तळहातावर मीठ देऊ नये, घरात जर भाजीत मीठ कमी असेल,आणि कुणी मीठ मागितलं तर कधीही प्रत्यक्ष हातात मीठ देऊ नये, तळहातावर मीठ दिल्यास किंवा कुणी घेतल्यास वाईट बातमी ऐकावयास येऊ शकते .

असंही म्हणतात कि घरातील मीठ संपलं आणि अचानक कुणी पाहुणे आले तर वेळ प्रसंगी त्यांना काय बनवून द्याल..?? म्हणून घरात जर मीठ असेल तर आपण पटकन काहीही बनवून त्यांना खायला देऊ शकतो, असं ग्रामीण भागातील ज्येष्ठ सांगतात.

दुसरी वस्तु, हळद – घरातील कोणत्याही शुभकार्यात सर्वप्रथम हळदीचा वापर हा हमखास होत असतो. आपल्याकडे लग्नातही नवरदेव नवरीला हळद लावली जाते, देवाला सुद्धा व हळद मग कुंकू लावले जाते, तर हळदीचे आपल्या जीवनात किती महत्त्व आहे, हे आपल्या लक्षात आलेच असेल.

म्हणूनच किचन मधील हळद जर संपली तर याचा अर्थ असा होतो,की कोणतीही शुभ वार्ता कानावर येणार नाही. कारण हळद म्हणजे शुभ जर तुम्हाला वाटत असेल शुभ वार्ता आपल्याला नेहमी ऐकायला मिळायला हव्यात, तर स्वयंपाकघरात असलेल्या डब्यातली हळद शिल्लक असेल त्यापूर्वीच हळदीचे दुसरे पाकीट घरात आणून ठेवायला हवे.

तिसरी वस्तु दुध – असे म्हटले जाते की घरामध्ये दुधाच्या भांड्यात दूध नेहमी शिल्लक असायला हवेच, दुधाचं भांड कधीही मोकळं ठेवू नये, मग आपलं घर म्हणजे भरल्या गोकुळासारखं आनंदी राहतं. कितीही व्यक्ती घरात पाहुणे म्हणून आल्यात की, दुध घ्यायला दुकानावर जावं लागणार, तर असे होऊ नये कारण आपली संस्कृती अशी आहे की, “अतिथी देवो भवं”.

येणाऱ्या पाहुण्यांना आपण साक्षात परमेश्वराचं रूप मानतो, म्हणून जर घरात अचानक पाहुणे आलेत तर त्यांना चहा, कॉफी साठी दूध हे असायलाच हवं. नसेल, तर तो देवाचा निरादर केल्यासारखं होईल. म्हणूनच आपण देवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी घरातील दूध कधीही संपू देऊ नये, त्याशिवाय दूधाचं भांड कधीही उघडे ठेवू नये, फ्रीजमध्ये ठेवलेले दूध सुद्धा नेहमी झाकून ठेवावे, नाहीतर प’रिणामी घरात वास्तुदोष निर्माण होतात, म्हणूनच मित्रांनो घरातील दूध कधीही संपू देऊ नका दूध संपण्यापूर्वीच घरात दूध आणून ठेवा.

चौथी वस्तू म्हणजे गव्हाचं पीठ – घरातील पीठही कधीच संपायला नको, थोडंसं पीठ शिल्लक असतानाच नविन दळणासाठी गहू काढून तशी सोय करावी, घरातले पीठ संपून जाणे म्हणजे आपल्या अपमानाची ती सुरुवात होते.

यामुळे आपल्याच घरात किंवा समाजात आपल्याला अपमानित व्हावे लागते, तसेच घरातील गहू संपल्यास आपणास मानसिक ताण तणावाचा सामना करावा लागू शकतो.

पाचवी वस्तु म्हणजे तांदूळ – घरातील तांदूळही कधीच संपूर्ण संपू देऊ नयेत, एखादी वाटी तांदूळ शिल्लक असतानाच, तांदुळाचं एखादं पॅकेट, केव्हा गोण घरात आणून ठेवावी, घरात तांदूळाचा एकही दाना शिल्लक न राहणे याचा अर्थ असा होतो. कि घरातील सुख तथा संपदा आता ल’यास जाणार, तुम्हाला घरात जर सुख व समाधान हवं असेल तर स्वयंपाक घरातील तांदूळाचा डब्बा नेहमी भारलेला असु द्यावा.

तर मित्रांनो या होत्या त्या पाच वस्तु ज्या कायम एका स्वयंपाकघरात कायम असायलाच हव्यात, या वस्तु आपल्या घरातून कधीही संपूर्ण संपू देऊ नयेत, त्या संपण्या पूर्वीच त्या पुरेशा साठवून ठेवाव्यात.

टीप : वर लेखातून दिलेली माहिती धा’र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कुठलीही अं’ध श्रद्धा पसरविण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा मानस नाहीये. त्यामुळे कुणीही तसा गै’रसमज करून घेऊ नये.

Leave a Comment