तांब्याच्या भांड्यातून चूकूनही खाऊ नका हे 5 पदार्थ..अन्यथा होईल अनर्थ..

तांब्याच्या भांड्यात ठेवललं पाणी पिण्याचे फायदे तर सर्वांनाच माहित असेल. तांब या धातूचे अनेक फायदे आपल्याला माहीतच असतील. पण तुम्हाला हे माहित आहे का, की काही असे पदार्थही आहे जे तांब्याच्या भांड्यात अन्न घेऊन खाल्लं तर आपल्याला विषबाधा होऊ शकते.

खरं तर ही भांडी तांब या धातूची असल्याने हे ठराविक अन्न पदार्थांबरोबर मिसळून रिएक्ट होऊन विषबाधा(फूड प्वाइजनिंग) होण्याची शक्यता असते. तर चला पाहुयात असे कोणते पदार्थ आहेत ज्याचा सेवन आपण तांब्याच्या भांड्यात ठेवला असेल तर करू नये

१. दूध
चुकूनही तांब्याच्या भांड्यात दूध कधी ठेऊ नये. तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं दूध हे विषारी बनते. जर तुम्ही हे दूध पिलं तर तुम्हाला अन्न विषबाधा (फूड प्वाइजनिंग) होण्याची दाट शक्यता असते.

२. दही
दही शरीरासाठी एक उत्तम पदार्थ म्हणून ओळखला जातो. पण हेच दही जर तांब्याच्या भांड्यात ठेवलं असेल तर तं विषारी बनतं. तांब्याच्या भांड्यात असणारे घटक आणि दह्यात असणारे घटक यांच्यात रासायनिक प्रक्रिया होते. आणि जर हे दही आपण खाल्लं तर अन्न विषबाधा (फूड प्वाइजनिंग) होण्याची शक्यता असते.

३. लोणचे
लोणचं चुकूनही तांब्याच्या भांड्यात ठेऊ नये. लोणच्यात सिरकाचा प्रमाण असतो आणि हे तांब्याच्या भांड्यातील मेटल सोबत मिसळतं. म्हणून या भांड्यात ठेवलेलं लोणचं आरोग्यास हानिकारक असतं.

४. साइट्रस फळ (आंबट फळ)
तांब्याच्या भांड्यात आंबट फळे ठेऊ नये आणि त्याचे सेवनही करू नये. यामुळे तुमचं पोट तर बिघडतंच पण त्याच सोबत उल्टी, चक्कर येण्यासारखे प्रकारही होऊ शकतात.

५. लिंबूचा रस
लिंबूचा रस तांब्याच्या भांड्यात ठेवल्याने त्यातील ऍसिडची तांब्याच्या भांड्यासोबत रासायनिक प्रक्रिया होते. अशा लिंबाच्या रसाचं सेवन केल्यास पोट दुखणे आणि ऑसिडिटी सारखे प्रकार उदभवू शकतात.

Leave a Comment