तरुणाईला टिकटॉक च्या माध्यमातून मोटिवेट करणाऱ्या समीर गायकवाड चा शेवटचा व्हिडिओ झाला व्हायरल

टिकटॉक स्टार समीर गायकवाड याने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. समीर पुण्यातील वाघोली येथे राहत होता. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

तसेच दुसर्‍या एका टिक टॉकस्टारने पुन्हा एकदा आत्महत्या केली आहे. हे प्रकरण पुण्यातील वाघोली परिसराशी संबंधित आहे. येथे 22 वर्षीय प्रसिद्ध टिक टॉकस्टार समीर गायकवाडने आत्महत्या केली आहे. ही घटना रविवारी संध्याकाळी पाच वाजताची आहे.

समीर गायकवाड यांच्या मृत्यूच्या वेळी पोलिसांना कोणतीही सुसाइड नोट मिळालेली नाही. अशा परिस्थितीत पोलिस सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत. समीर गायकवाडच्या आधी अमेरिकेची प्रसिद्ध टिक-टॉक-स्टार देझरिया शेफरने यापूर्वी आत्महत्या केली होती.

सोशल मीडियावर बीक्सबीगिरल्डी आणि डी नावाच्या प्रसिद्ध देझरियाने अवघ्या 18 वर्षांच्या वयात तिचे आयुष्य संपवले.

हजारो फॉलोअर्स असलेला टिकटॉक स्टार समीर गायकवाडने रविवारी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती. समीरने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने त्याचा चाहत्यांना धक्का बसला आहे. दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी समीर गायकवाडने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमधून त्याने चाहत्यांना आवाहन केले आहे. हा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये समीर गायकवाड म्हणाला की, समोरच्यानं चहाचं दुकान टाकलं म्हणजे आपण ते नाही टाकायचं. तू दुधाचं टाक, त्याल्या दे. दोघे मिळून पुढे जा. पण नाही. आपल्याला तेच टाकायचं आहे. म्हणजे तो भिकारी आणि आपण कर्जबाजारी. अरे सुधरा खेकड्यांनो, असे त्याने आपल्या शेवटच्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

समीर मनीष गायकवाड (वय २२, रा. निकासा सोसायटी, केसनंद रोड, वाघोली) याने राहत्या घरी पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ही घटना रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. समीर याचा भाऊ प्रफुल्ल रोहिदास गायकवाड यांनी याची माहिती लोणीकंद पोलिसांना दिली. समीर याने गळफास घेतल्याचे समजल्यावर त्याला खाली उतरून लाईफ लाईन हॉस्पिटलला तातडीने नेण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यु झाल्याचे सांगितले. त्याच्या आत्महत्येमागील नेमके कारण समोर आले नाही. आत्महत्येपूर्वी त्याने कोणतीही चिठ्ठी लिहिल्याचे घरात आढळून आले नाही. म्युझिक व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून समीर तरुणांच्या गळ्यातील ताईत बनला होता. तो पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता.

समीरच्या मृत्यूनंतर त्याच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या अनेक पोस्ट तरुणाईने सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.

Leave a Comment