तव्यावर ही 1 वस्तू कधीच ठेवू नये.!! नाहीतर भयंकर गरिबी येऊ शकते.!!

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार आपल्या स्वयंपाक घरातील स्वयंपाक करण्याची भांडी म्हणजे कढई आणि तवा हे राहूचे प्रतीक मानले जातात. तवा ही स्वयंपाक घरातील एक अत्यंत महत्वाची वस्तू आहे. कारण तव्याशिवाय आपण चपात्या किंवा भाकरी भाजू शकत नाही, थोडक्यात तव्याशिवाय किचन हे परिपुर्ण बनत नाही.

प्रत्येक किचनमध्ये तवा हा असतोच. तव्याचे वास्तुशास्त्रात मोठे महत्व आहे. त्यामुळे वास्तुशास्त्रामध्ये या तवा विषयक काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे, तव्या संबंधी वास्तुशास्त्र सांगते की, तवा हा कधीच पालथा घालू नये.

कारण शास्त्रानुसार,जेव्हा आपल्या घरात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, त्यावेळी घरात अन्न शिजत नसल्यामुळे, त्यावेळी तवा उलटा घालण्याची प्रथा आहे. कारण तव्याचा वापर वर्ज असतो, जेव्हा आपल्या घरात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो.

त्यामुळे आपल्या घरातील सर्व गोष्टी चांगल्या सुरू असताना, जर आपण वारंवार अशा प्रकारे तवा पालथा घातल्यास, आपल्या घरात अशुध्द तसेच नकारात्मक वातावरण निर्माण होण्यास सुरुवात होते. त्यामुळे ही चुक घरातील गृहिणी करू नये, याशिवाय दुसरी गोष्ट म्हणजे, अनेक घरांमध्ये खूप जुना तवा वापरला जातो, गंज चढलेला तवा वापरला जातो.

त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने, अशा तव्याचा वापर केल्यामुळे, या गंजचा अंश आपल्या पोटात जाऊन, आपल्या शरीरात अनेक व्याधी उत्पन्न होऊ शकतात,परीणामी घरातील लोक वारंवार आजारी पडू लागतात.

तसेच गरम तव्यावर ती पाणी शिंपडल्यास, आपल्या घरात विनाकारण वाद विवाद निर्माण होत असतात, कारण याच्या आवाजाने घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. त्यामुळे घरात कटकटी वाढत असतात, तसेच आजारपण कमी होत नाही, त्यामुळे कायम थंड तवा असतांना, त्यावर पाणी शिंपडणे योग्य होय.

याशिवाय ज्या घरात खूप जुना तवा वापरला जातो, त्या ठिकाणचे लोक कधीच धनवान किंवा श्रीमंत होत नाहीत, याउलट ते हळूहळू त्या घरात अलक्ष्मीचा निवास वाढल्यामुळे गरिबी आणि दैन्यावस्था वाटू लागते.

याशिवाय तिसरी गोष्ट म्हणजे, वास्तुशास्त्रानुसार तवा किंवा कढई किचनमध्ये खरकट्या कधीच ठेवू नये. कारण या दोन्ही गोष्टी वारंवार खरकट्या ठेवल्यास, किंवा रात्रभर तशाच ठेवल्यास, त्यामुळे घरात आजारपणा आणि दारिद्र्य पसरु शकते. तसेच जर तवा कायम स्वच्छ ठेवल्यास, तुमच्या पैशांमध्ये सातत्याने वाढ होईल, तसेच आपल्याला समाजामध्ये योग्य तो मानसन्मान प्राप्त होण्यास सुरुवात होईल.

त्यामुळे, जर आपल्या तव्यावर भाजणारी पहिले चपाती किंवा भाकरी मनोभावे गोमातेला खाऊ घातले पाहिजे.कारण गोमाता मध्ये 33 कोटी देवी-देवताचा वास असतो. ही पहिली भाकरी किंवा रोटी खाऊ घातल्याने, अन्नपूर्णा देवी प्रसन्न होते.

आणि आपल्या घरात नेहमी अन्नधान्यची भरभराट राहते. याशिवाय सर्व देवीदेवतांच्या कृपाशीर्वाद लागतो, वास्तुशास्त्र से संबंधित या नियमांचं पालन नक्की करावे.

वरील माहिती विविध स्रोतांची आधारे एकत्रित केलेली आहे याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

Leave a Comment