Thursday, December 7, 2023
Homeजरा हटकेTeenager Father बाप होण्याची क्षमता कोणत्या वयात येते.? 11 वर्षांचा शॉन स्टीवर्ट...

Teenager Father बाप होण्याची क्षमता कोणत्या वयात येते.? 11 वर्षांचा शॉन स्टीवर्ट बनला सर्वात कमी वय असलेला बाप..

Teenager Father बाप होण्याची क्षमता कोणत्या वयात येते.? 11 वर्षांचा शॉन स्टीवर्ट बनला सर्वात कमी वय असलेला बाप..

(Teenager Father) नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.. केवळ 11 व्या वर्षी वडील बनण्याचा रेकॉर्ड ब्रिटेनच्या शॉन स्टीवर्टच्या नावे आहे. यावरून अनेकदा प्रश्न पडतो की, साधारण कितव्या वर्षी मुलांमध्ये वडील बनण्याचे हार्माेन्स तयार होतात. याबाबत अभ्यासारून देण्यात आलेली माहिती.

ब्रिटेनमधील शॉन स्टीवर्ट 11व्या वर्षीच बाप झाला, तर न्यूझीलंडमधील ऑकलंडमध्ये एका 12 वर्षाच्या मुलाबाबतही बाप होण्याची केस समोर आली होती. अशा अनेक केसेस आहेत, जिथे कमी वयातच मुलं स्वतः बाप बनली आहेत. पण इतक्या कमी (Teenager Father) वयात मुलं वडील नक्की कशी होऊ शकतात. विज्ञानानुसार, पुरूषांचे बायोलॉजिकल क्लॉक नक्की कशा पद्धतीने काम करते हे जामून घेणे महत्त्वाचे आहे.

तसंच पिता होण्याचे नक्की वय काय असावे आणि वडील होण्याचे हार्मोन्स मुलांमध्ये नक्की कधी तयार होतात याचीही माहिती या लेखातून आम्ही तुम्हाला देत आहोत. NCBI ने दिलेल्या अहवालानुसार आणि विज्ञानानुसार, एक मुलगा तेव्हाच बाप होऊ शकतो जेव्हा त्याच्या Semen मध्ये स्पर्म्सचे उत्पादन सुरू होते. साधारण 11 ते 14 या वयामध्ये ही प्रक्रिया घडते. याचाच अर्थ तारूण्य जोपर्यंत मुलांमध्ये येत नाही तोपर्यंत महिलांना गरोदर करणे कोणत्याही मुलांना शक्य नाही.

विज्ञानात केलेल्या अभ्यानुसार, अधिकतम ठिकाणी सांगण्यात आले आहे की, साधारण 12 वयानंतरच वडील होण्याची क्षमता मुलांमध्ये येते. तर 13 वर्षाच्या मुली आई होऊ शकतात. (Teenager Father) मेडिकल संकेतस्थळ असणाऱ्या Medicine Net मध्ये देण्यात आल्यानुसार, डॉ. मेलिसा कोनार्डने सांगितल्याप्रमाणे मुलगा आणि मुलगी लवकर वयातही आई-वडील होऊ शकतात. मुलांमध्ये 12 व्या वर्षीपासून तर मुलींमध्ये हे वय 10 ते 12 असू शकते.

मुलांमध्ये कधी होते हार्मोन्स विकसित.? Cleveland Clinic ने केलेल्या अभ्यासानुसार, कोणत्याही मुलामध्ये साधारण 12 व्या वर्षीपर्यंत हार्मोन्स विकसित होतात, याआधी शरीरात स्पर्म्स तयार होत नाहीत. तुम्ही जर विकीपीडियाच्या पेज लिस्ट ऑफ यंगेस्ट फादर्स वर क्लिक केले तर काही अशा केसेस समोर आल्या आहेत.

हे सुद्धा पहा : 50 दिवसांपर्यंत पुरुषांनी वीर्य संचय करुन ठेवल्यास शरिरावर त्याचे काय परिणाम होतात.?

खलीज टाइम्सच्या 27 मार्च, 2007 च्या प्रकाशित केलेल्या एका रिपोर्टनुसार, भारतातील केरळमधी एर्नाकुलम मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये 16 वर्षाच्या मुलीने मुलाला जन्म दिला मात्र त्याचा पिता त्यावेळी 12 वर्षांचा होता. DNA Test मधून याबाबत पुष्टी देण्यात आली होती.

वडील होण्याचे योग्य वय.? अनेकांना वाटते की पिता होण्यासाठी योग्य वय वगैरे असं काहीही नसतं. हे केवळ महिलांसाठी लागू असते. (Teenager Father) मात्र असं अजिबात नाही. डॉक्टर्सच्या सांगण्यानुसार, पुरूषांमध्ये वयानुसार शुक्रांणूची संख्या आणि गुणवत्ता कमीजास्त होत असते.

तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, पुरूषांचे वडील बनण्यासाठी योग्य वय 20 ते 30 हे असू शकते. वास्तविक पुरूषांसाठी वयाच्या 50 व्या वर्षापर्यंत वा त्यापेक्षा अधिक वयातही पुरूष पिता होऊ शकतात. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार, 92 व्या वर्षी मुलाला जन्म देणारा पिता झाला आहे. मात्र शोधानुसार 40 व्या वर्षानंतर पुरूषांमध्ये ही क्षमता कमी होताना दिसते.

Sperm चे प्रॉडक्शन कधी बंद होते.? पुरुषांमध्ये स्पर्मने उत्पादन बंद होत नाही. पण याचा अर्थ असा नाही की त्यांच्याकडे महिलांप्रमाणे जैविक घड्याळ नाही. जसजसे वय वाढते तसे स्पर्ममध्ये जेनेटिक म्युटेशन होते. यामुळे Sperms मध्ये DNA खराब होण्याची शक्यता असते शिवाय मुलांवरही याचा वाईट परिणाम होऊ शकतो.

मुलांच्या जन्मावर परिणाम – अभ्यासानुसार, Advanced Paternal Age असणाऱ्या वडिलांमध्ये न्युरोडेव्हलपमेंटल डिसॉर्डर असणारी मुलं जन्माला येण्याची शक्यता असते. 2010 मध्ये करण्यात आलेल्या अभ्यासात आढळले आहे की, 40 व्या वर्षापेक्षा (Teenager Father) अधिक वय असणाऱ्या पुरुषांच्या मुलांमध्ये सामान्य मुलांच्या तुलनेत ऑटिजम स्पेक्ट्रम डिसॉर्डर विकसित होण्याचा धोका पाचपट अधिक असतो.

प्रेग्नन्सीची संभावना अधिक कधी.? WHO ने दिलेल्या सीमेन पॅरामीटर्सच्या आधारे, स्पर्म काऊंट, आकृती विज्ञान आणि गतीशीलत यामध्ये समाविष्ट आहे. पुरूषांमध्ये 35 वर्षापासून सीमेन पॅरामीटर्स उतरू लागते. आरोग्यानुसार हे अवलंबून असते, जे प्रजनन क्षमतेला प्रभावित करते. पुरूषांमध्ये वडील होण्याची क्षमता सर्वाधिक 22 ते 25 या वयात असते असंही अभ्यासात सांगण्यात आलं आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स