वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षीच पडलेली विकेट.. अंजलीसाठी वेडा झाला होता सचिन तेंडुलकर, पहा त्यांचे जुने फोटोज…

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा भारतरत्न सचिन तेंडुलकर सारखा दुसरा खेळाडून अजूनपर्यंत झालेला नाही. सचिन तेंडुलकरने एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. आज आपण सचिन तेंडुलकरच्या कुटुंबाशी संबंधित काही माहिती जाणून घेणार आहोत.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी मुंबईच्या दादरमध्ये रमेश आणि रजनी तेंडुलकरच्या घरी झाला होता. त्याचे वडील स्वर्गीय रमेश तेंडुलकर एक मराठी कादंबरीकार आणि कवी होते.

त्याची आई रजनी तेंडुलकर एक विमा कंपनीमध्ये काम करत होती आणि रमेश तेंडुलकरची दुसरी पत्नी होती. सचिनचे नाव रमेश तेंडुलकर यांनी त्यांच्या आवडत्या संगीतकार सचिन देव बर्मन यांच्यावरून ठेवले होते.

रमेश तेंडुलकर कीर्ती कॉलेज, प्रभादेवीमध्ये एक प्रोफेसर देखील होते. विशेष म्हणजे सचिन तेंडुलकरची आई रजनी तेंडुलकरने 2013 माध्ये वानखेडेमध्ये झालेल्या फेअरवेल मॅचपर्यंत सचिनला कधीही लाइव्ह पाहिले नव्हते.

आपल्या पहिल्या दौऱ्यावरून परतताना सचिनने अंजलीला पहिल्यांदा मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाहिले होते. 17 वर्षाच्या सचिनसाठी हे पहिल्या नजरेमधील प्रेम होते. 24 मे 1995 रोजी पाच वर्षे डेट केल्यानंतर सचिन तेंडुलकर आणि अंजलीने लग्न केले होते.

Leave a Comment