लाल गुलाबाचा हा अचूक उपाय दूर करेल प्रेम विवाहातील अडथळे.!!

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, गुलाब हे प्रेमाचे प्रति मानले जाते. प्रेमाच्या उत्सवात म्हणजेच व्हॅलेंटाईन विकला गुलाबाला खूपच विशेष स्थान दिले गेलेले आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये एका गुलाबाने आपण आपले आयुष्य बदलू शकतो असे सांगण्यात आलेले आहे. म्हणजेच लाल गुलाबाचा उपाय प्रेमविवाहातील अडथळे दूर करण्यासाठी तसेच धनलाभासाठी देखील होतो.

आपण गुलाब हे अनेक देवतांना देखील अर्पण करीत असतो. तर मित्रांनो गुलाबाचे असे काही उपाय आहेत हे उपाय जर तुम्ही केले तर तुम्हाला प्रेमविवाहातील अडचणी दूर होतात आणि तुम्हाला धनलाभ देखील होऊ शकतो. तर हे गुलाबाचे नेमके उपाय कोणते आहे चला तर मग जाणून घेऊया.

तर शास्त्रानुसार मंगळवारी हनुमानजी यांना जर अकरा गुलाब अर्पण केले तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. तसेच प्रेमी विवाहात जर अडथळे येत असतील तर मंगळवारी एका कागदावर आपल्या जोडीदाराचं नाव लिहून हनुमानजीची प्रार्थना करायची आहे आणि नंतर गुलाब अर्पण करायचे आहे आणि जो कागद आहे हा कागद आपल्याजवळ ठेवायचा आहे. यामुळे प्रेमविवाहातील सर्व अडथळे दूर होतात.

तसेच सोमवारी किंवा प्रदोष व्रत दिवशी भगवान शंकरांना लाल गुलाबाचा अत्तर अर्पण करावे. यामुळे आपल्या वैवाहिक जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. तसेच पितृदोष असल्यामुळे जर वैवाहिक जीवनात बाधा येत असेल तर तेव्हा तुम्ही ज्येष्ठांचा तसेच महिलांचा कधीही अपमान करू नका.

त्याचबरोबर जर तुम्हाला इच्छा असणाऱ्या व्यक्तीशी लग्न करायचे असेल तर गुलाबाच्या फुलात कापूर टाकून संध्याकाळी जाळावे आणि देवी दुर्गाला प्रार्थना करायची आहे. हा उपाय आठवडाभर तुम्ही दररोज करायचा आहे. यामुळे तुम्हाला जो जोडीदार हवा आहे तो योग्य जोडीदार मिळेल.

जर पती-पत्नीच्या नात्यांमध्ये गोडवा हवा असेल तर शास्त्रांमध्ये सांगितलेला हा उपाय फायदेशीर ठरतो. तर घरामध्ये रोज एका काचेच्या भांड्यात ताज्या आणि सुवासिक गुलाबाच्या पाकळ्या घालाव्यात. यामुळे पती-पत्नीच्या नात्यांमध्ये गोडवा निर्माण होतो. जे लोक अविवाहित आहेत आणि ते लोक पार्टनर शोधत आहे त्यांनी शिवलिंगावर गुलाबाचे फुल अर्पण करावे आणि ते गुलाब नेहमी आपल्याजवळ ठेवायचे आहे. या उपायामुळे तुमचे खरे प्रेम लवकरच तुम्हाला मिळते.

जर तुमची आर्थिक स्थिती कमकुवत असेल तर कोणत्याही शुक्रवारी संध्याकाळी गुलाबाच्या फुलात कापराचा तुकडा जाळून टाका आणि कापूर जाळल्यानंतर ते फुल देवी लक्ष्मीला अर्पण करायचे आहे. यामुळे धनप्राप्ती होईल आणि लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील

जर तुम्हाला तुमची तिजोरी नेहमी धनधान्याने भरलेली असावी असे जर वाटत असेल तर मंगळवारी लाल चंदन, लाल गुलाब आणि रोळी घेऊन या सर्व वस्तू लाल कपड्यात बांधून ठेवा. हनुमानजींच्या समोर मंदिरात किंवा घरातील हनुमानजींच्या मूर्ती समोर एक आठवडा ठेवा आणि एक आठवड्यानंतर ही पोटली आपल्या घराच्या किंवा दुकानाच्या तिजोरी मध्ये ठेवा.

असे केल्यामुळे तुम्हाला तुमची तिजोरी नेहमी पैशांनी भरलेली राहील. कुंडलीतील मंगल दोष दूर तिचा असेल तर मंगळवारी शिवलिंगावर अकरा गुलाब अर्पण करावे. यामुळे भगवान शिवाची कृपा होऊन मंगल दोष नक्कीच दूर होईल. तर तुमच्या मनात एखादी मोठी इच्छा असेल आणि ती पूर्ण व्हावी असे जर वाटत असेल तर मंगळवारी हनुमानजींना 11 ताजी गुलाबाची फुले अर्पण करा. हा उपाय सलग 11 मंगळवार केल्यास तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण होईल.

वरील सांगितल्याप्रमाणे हे काही गुलाबाचे उपाय जर तुम्ही केले तर तुमच्या सर्व अडचणी दूर होतील आणि तुमची मनातील इच्छा पूर्ण होईल. तसेच तुम्हाला योग्य जोडीदार देखील भेटेल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Leave a Comment