तिजोरीत या वस्तु बरोबर ठेवा फक्त १ चांदीचं नाणं, कधीही आर्थिक चणचण भासणार नाही..!!

धनप्राप्ती साठी कित्येकदा आपण चुकीच्या मार्गाने जात असतो. पण त्या मुळे फायदे कमी आणि नुकसानच जास्त होतं. किंवा आपली फसवणूक सुद्धा होते.

म्हणून आज आम्ही तुमच्या साठी एक सोप्पा उपाय घेऊन आलो आहोत. तर आपल्याला करायचं काय आहे.. एक रुपयाचं चांदीचं नाणं घेऊन या वस्तू ला त्या चांदीच्या नाण्या बरोबर एका सुती कपड्यात गुंडाळून ते गुंडाळून ठेवलेलं साहित्य फक्त तुमच्या तिजोरीत ठेवायचं आहे.

मित्रांनो.. या वस्तू चा फक्त हा एकच फायदा नसून असे बरेच फायदे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आधी आपण त्या वस्तू बद्दल माहिती करुन घेऊयात.

तर त्या वस्तू चं नावं आहे काळी हळद…

या वनस्पतीची लागवड बंगालमध्ये होते. याचे ताजे गठ्ठे फिक्कट पिवळे असतात. मुख्य गठ्ठ्याचे बाजूचे गठ्ठे आल्यासारखे दिसतात. बाजारांत मिळणारे गठ्ठे काळसर करडे असून त्यांवर गोल कडीं असतात. आंतून करडा काळा रंग, फारच कठीण व शिंगासारखे, ह्याच्या पातळ चकत्या करड्या नारिंगी रंगाच्या; वास व रुची कापरासारखी. बंगालमधे ताजे गठ्ठे हळदीसारखे वापरतात.

तसे हळदीचे बरेच प्रकार आहेत त्यात काळी हळद हा एक प्रकार असा आहे जो आहे. जो की वशीकरण, कोर्ट केसेस मध्ये विजय, राजकारण मध्ये विजय, भूत बाधेपासून सुटका करून घेण्यासाठी तसेच धन प्राप्ती साठी उपयोगात आणली जाते. काळ्या हळदीचे रोप हे कण्हेरीच्या झाडासारखे असते परंतु फरक हा असतो की काळ्या हळदीच्या पानावर मध्यभागी काळ्या रंगाची रेष असते. काळी हळद सहजा सहजी मिळत नाही. सर्वात उत्तम प्रतीची काळी हळद अमरकंटक, मध्यप्रदेश येथे मिळते तसेच कामाख्या मंदिराच्या आसपास मीळते. काळी हळद ओळखता आली पाहिजे नाहीतर काळी हळद सांगून आंबेहळद पण दिली जाते.

एकूण हळदीचे ७ प्रकार आहेत त्यातला एक प्रकार काळी हळद म्हणून प्रचलित आहे.

काळ्या हळदीचा उपयोग कसा करून घ्यावा…

पिवळ्या हळदीच्या गुणांविषयी सर्वांनाच माहिती आहे. पण काळ्या हळदी बद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. या हळदीचा वापर ज्योतिषीय उपयांमध्येही उपयोग केला जातो. काळ्या हळदीला धन आणि बुध्दिचे कारक मानले जाते. काळी हळद अनेक प्रकारचे वाईट प्रभाव कमी करते, यासाठी पहिले हळद सिध्द करावी लागते.

विधी…१
कोणत्याही पक्षातील (शुक्ल किंवा कृष्ण) अष्टमी तिथीला सकाळी सूर्योदयापुर्वी उठून स्नान करुन पवित्र व्हावे. यानंतर स्वच्छ कपडे घालून पूर्व दिशेला मुख करुन बसा. ज्या ठिकाणाहून सूर्यदर्शन होईल अशा ठिकाणी बसावे. यानंतर काळ्या हळदीची धूप-दीपने पूजा करा. यानंतर काळ्या हळदीचा नमस्कार करुन सूर्यदेवाचा मंत्र ओम ह्रीं सूर्याय नम: चा १०८ वेळा चंदनच्या माळेने जाप करा. हा प्रयोग पुढच्या अष्टमी तिथीपर्यंत रोज करावा. या अष्टमीला उपवास ठेवा आणि ब्राम्हणांना जेवू घाला. अशा प्रकारे काळे हळकुंड सिद्ध होते. याचा उपयोग विविध ज्योतिषीय उपायांमध्ये करतात.

विधी… २
आता काळी हळदीचा अजून एक उपाय म्हणजे..
ज्याने दुर्भाग्य दूर होतं. धन संचय होत नसल्यास किंवा पैसा पाण्यासारखा वाहून जात असल्यास एका चांदीच्या डबीत काळी हळद, नागकेशर आणि कुंकू ठेवून त्याला देवी लक्ष्मीच्या पायांच्या स्पर्श करवावा. नंतर धन ठेवत असलेल्या जागेवर ठेवून द्यावं. आपण चांदीच्या डबीऐवजी इतर चांगल्या धातूची डबी देखील वापरू शकता.

किंवा एखाद्या शुभ मुर्हतावर एका पिवळ्या रंगाच्या कपड्यात काळी हळद, चांदी का शिक्का ठेवून त्याला पिवळ्या दोर्‍याने बांधावे. तिजोरी किंवा लॉकरमध्ये ठेवावे.

एक उपाय असा देखील आहे की एखाद्या शुभ मुहूर्तात काळी हळद कुंकू एका जागी ठेवून त्याची पूजा करावी नंतर ही सामुग्री एक-दोन शिक्क्यांसह लाल रंगाच्या कपड्यात बांधून लॉकर मध्ये ठेवावी. याने धन संबंधी समस्या दूर होतात.

व्यवसाय किंवा नोकरीत समस्या येत असल्यास गुरुवार पिवळ्या रंगाच्या कपड्यात काळी हळद, ११ वेळा अभिमंत्रित गोमती चक्र, ११ वेळा अभिमंत्रित धनदायक कोड्या बांधून १०८ वेळा विष्णू मंत्र जपत धन ठेवत असलेल्या ठिकाणी ठेवावे. याने नोकरी किंवा व्यवसायात निश्चित प्रगती होईल.

काळ्या हळदीचे इतर काही उपाय आणि फायदे..

१. काळ्या हळदीचे रोप असलेली कुंडी तुमच्या ऑफिस मध्ये किंवा दुकानाच्या दरवाजा बाहेर ठेवली असता व्यवसायात कमालीची वाढ होते.
२. घराच्या बागेत ह्याची रोपे लावल्याने घरात समृद्धी येते. काळ्या हळदीच्या पानाचा रस प्यायल्याने ३ दिवस पर्यंत तहान भूक लागत नाही. त्यामुळे साधू इत्यादी त्याचा उपयोग करताना आढळतात.
३. काळ्या किंवा इतर हळदीचा जरासा नखाएवढा तुकडा तोंडात ठेऊन तुम्ही ज्याच्याशी बोलता तो तुमच्यावर मोहित होतो आणि तुमची शासकीय किंवा इतर काही कामे सहजपणे होऊ शकतात. तसेच पैशाची कामे किंवा कोणाला कर्जाऊ दिलेली रक्कम सहजपणे परत मिळू शकते.
४. रोज काळ्या हळदीचे किंवा इतर त्याच प्रकारातील हळदीचे सेवन केल्याने माणसाच्या बोलण्यात एक प्रकारची वाचा शक्ती निर्माण होते.
५. रोज काळ्या हळदीचे किंवा इतर त्याच प्रकारातील हळदीचे सेवन केल्याने माणसाच्या बोलण्यात एक प्रकारची वाचा शक्ती निर्माण होते.
६. हळदीचे पान असनाखाली ठेऊन ध्यान केले असता ते पटकन लागते कारण ह्या प्रकारच्या झाडांमध्ये विचार संक्रमाणाची आणि विचार ग्रहणाची जबरदस्त शक्ती असते. ज्या प्रमाणे व्याघ्रसनावर बसून माणसाचे सहज ध्यान केंद्रीत होते त्याच प्रमाणे ह्याच्या पानांचा उपयोग असनाखाली केला असता सहज योग प्राप्त होऊ शकतो.
७. रोज ह्या प्रकारच्या हळदीची मनोभावे पूजा करून तिला तुळशी प्रमाणेच धूप दीप दाखवल्याने आपल्या मनोकामना ६ महिने ते १ वर्षांत पूर्ण झाल्याचे कित्येक लोकांचे अनुभव आहेत.
८. काळ्या हळदीचे किंवा त्याच प्रकारच्या इतर हळदीचे लहान तुकडे किंवा छोटी रोपे घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात परंतु दक्षिण दिशा सोडून लावले असता त्या त्या दिशेचा वास्तुदोष जातो. जसे नैऋत्य कोपऱ्यात लावले असता घरात एकोपा निर्माण होतो व घरातलयांशी संबंध सुधारतात. दारासमोर लावले असता अशुभ शक्ती घरामध्ये प्रवेश करत नाहीत.

टिप -तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि अश्याच पोस्टसाठी खालील ला’ईकचे बटन दाबून आपल्या पेजला लाईक करायला विसरू नका धन्यवाद..!!

Leave a Comment