Tuesday, March 19, 2024
Homeअध्यात्मतिरुपती बालजीच्या दर्शनानंतर ..कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन का घेतात.?

तिरुपती बालजीच्या दर्शनानंतर ..कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन का घेतात.?

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर…. मित्रांनो दररोज कोल्हापूर मध्ये एक खास ट्रेन आंध्र प्रदेश मधून येत असते या ट्रेन मधून येणारे भाविक महालक्ष्मी मंदिरात महालक्ष्मीच्या दर्शनाला जातात तिरुपतीला जाणारे महालक्ष्मीच्या दर्शनाला आवर्जून का येतात तर तिरुपती बालाजी तोपर्यंत प्रसन्न होत नाही जोपर्यंत त्यांची अर्धांगिनी महालक्ष्मी प्रसन्न होत नाही अशी भाविकांची मान्यता आहे. कहानी अशी की एकदा भृगु ऋषी विष्णूकडे आले तेव्हा भगवान विष्णू निद्रा घेत होते तर त्यांची पत्नी लक्ष्मी त्यांचे पाय चेपीत होती भगवान विष्णूंनी आपले स्वागत केले नाही याचा

राग येऊन भृगु ऋषींनी भगवान विष्णू यांच्या छातीवर जोराने लाथ मारली भृगु ऋषींचा क्रोध शांत करण्यासाठी भगवान विष्णूंनी त्यांची क्षमा मागितली आणि त्यांचे पाय चेपण्यास सुरुवात केली. याद्वारे त्यांना भगवान भृगुंच्या प्रति आदर भावना व्यक्त करावयाची होती भगवान विष्णूंचे हे वागणे पाहून देवी लक्ष्मींना क्रोध अनावर झाला या रागापायी त्यांनी वैकुंठ सोडले आणि देवी कोल्हापूर येथे येऊन राहिली. देवी लक्ष्मी वैकुंठामध्ये कधीही परत ली नसून आजही कोल्हापूरच्या भव्य निवासस्थानामध्ये त्यांचा वास आहे अशी आख्यायिका आहे परंतु याचा कोणत्याही धार्मिक ग्रंथांमध्ये स्पष्ट उल्लेख सापडला नसल्याने हे कितपत खरे आहे हे सांगता येणार नाही पण..

महालक्ष्मीचे देवस्थान हे आदिशक्तीचे देवस्थान असल्याचे लक्षात येते तसेच हे आदिशक्तीच्या 108 पिठांपैकी एक मानले जाते हे देवस्थान पार्वतीला समर्पित असून अंबाबाईच्या रूपामध्ये असलेल्या पार्वतीचे पूजन होते.अजून एका आख्यायिकेनुसार येथील रयतेचे कोल्हापूर नामक दानवापासून रक्षण करण्यासाठी देवी कोल्हापूर येथे अंबाबाईच्या रुपात अवतरली असे म्हणतात देवीने कोल्हासुराचा वध केला हे ठिकाण त्याच्या नावाने ओळखले जावे असा वर देवीला मागितल्याने त्यास कोल्हापूर असे नाव देण्यात आले अशी एक आख्यायिका आहे तसेच हे देवस्थान आदिशक्तीला समर्पित असून यात भगवान शिवाचे गुप्त देवस्थान आहे असे म्हटले जाते शक्ती संतुलित राहावी

यासाठी शिवही तेथे आहे असे म्हटले जाते पण शिवाच्या देवस्थानामध्ये भाविकांना जाण्यास बंदी आहे तिरुपती च्या देवस्थानाचे महालक्ष्मीच्या देवस्थानाशी नाते सांगणारे कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नसली तरीही कोल्हापूरचे देवस्थान कधी निर्माण केले गेले याबद्दल माहिती उपलब्ध आहेहे देवस्थान सहाव्या शतकाच्या चालुक्य वंशाच्या कर्णदेव राजाने बनवले पण ह्या देवस्थानाला खरी प्रसिद्धी मिळाली ती 1182 साली

जेव्हा शिलाहार राजवंशाने कोल्हापूर आपली राजधानी म्हणून घोषित केली 14 व्या शतकामध्ये परप्रांतीयांचे आक्रमणे सुरू झाल्यानंतर त्यांनी देवस्थाने लुटण्याचा चंग बांधला त्यावेळी मुख्य देवस्थानातून देवीची मूर्ती हलवण्यात येऊन तिची स्थापना मंदिराच्या एका पुजाऱ्याच्या घरी करण्यात आली तिथे देवी 17 व्या शतकापर्यंत राहिली. त्यानंतर छत्रपती राजे संभाजी यांनी मूळ देवस्थानामध्ये देवीची पुनश्च प्रतिष्ठापना केली तेव्हा त्यांनी गोव्याहून तयार करून आणलेली एक भली मोठी घंटा देवस्थानाला दिली विशेष गोष्ट अशी की या घंटेवर कोरलेली अद्याक्षरे लॅटिन भाषेतील आहे महाराणी ताराबाईंचा महाल मंदिरा जवळ बांधला गेला

त्यावेळी ताराबाईंनी मंदिरात अनेक दुरुस्त्या आणि नवीन बांधकामे करविले. दरवर्षी वर्षातून दोन वेळा साजरा होणा रा किरणोत्सव हा सोहळा या मंदिराचे वैशिष्ट्य आहे दरवर्षी 31 मार्च आणि 9 नोव्हेंबर रोजी हा सोहळा साजरा केला जातो उगवत्या सूर्याची किरणे महालक्ष्मी च्या पायाशी पडतात हा सोहळा अनुभवण्यासाठी हजारो भाविक कोल्हापूरमध्ये येत असतात तर मित्रांनो ही होती कोल्हापूरची महालक्ष्मी आणि तिरुपती देवस्थानचे कने क्शन याबद्दलची इत्यंभूत माहिती.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स