मित्रांनोनमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, तुळशीसारखी चमत्कारी वनस्पती शोधुन सापडणार नाही. तुळस पूजनीय तर आहेच त्याचबरोबर गुणकारी देखील आहे. अशा या तुळशीचा रस सुध्दा खोकल्यासाठी असरदार असतो. आपल्या शरीरातील अनेक आजार यामुळे बरे होतात.
तुळशीच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. विशेषत: श्वसनाच्या आजारांमध्ये तुळशीची पाने खाण्याचा सल्ला दिला जातो, परंतु ती चाऊन खाण्याची पद्धत योग्य नाही. त्यामुळे कोणती हानी पोहचू शकते ते बघुया.
तुळशीचे रोप हे मुळ ते खोड म्हणजेच पर्यायाने संपूर्ण तुळसच लाभदायक आहे.तुळशीची पाने खाल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
असे म्हटले जाते की तुळशीची पाने कधीही चावून खाऊ नयेत. बऱ्याचदा लोकांना असे वाटते की यामागे काही धार्मिक कारण असेल, परंतु हे धार्मिक नसून ते तुमच्या आरोग्याशी संबंधित आहे. आता जाणून घ्या ते चावून खाणे योग्य का नाही
दातांवर परिणाम वास्तविक, तुळशीच्या पानांमध्ये mercury (पारा) याचे गुणधर्म काही प्रमाणात असतात. जेव्हा तुम्ही तुळशीची पाने चावतात तेव्हा ते घटक बाहेर येतात आणि ते तुमच्या दातांना हानी पोहोचवतात.
तुळशीची पाने आम्लधर्मी असतात आणि जर तुम्ही ती रोज जास्त प्रमाणात चावलीत तर दातांच्या आवरणावर परिणाम होतो. त्यामूळे तुमचे दात कमजोर होतात.
तुळशीच्या पानांना खाण्याची योग्य शास्त्रीय पद्धत –
तुळशीची पाने चावण्याऐवजी ती चघळून खाणे योग्य आहे. अनेक औषधांमध्ये तुळशीचा अर्क असतो, पण ही औषधे लगेच गिळली जात असल्याने ती दातांना इजा करत नाही.
तुळशीच्या पानांचा काढा किंवा चहा –
तुळशीच्या पानांचे सेवन करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्या पानांचा पाण्यात टाकून काढा करून किंवा चहा बनवून प्यावे. यासाठी तुळशीची पाने पाण्यात टाकून मंद आचेवर 15 मिनिटे उकळा. यानंतर त्यात मध आणि लिंबू मिसळून प्या.
आपण आपल्या आवडीनुसार त्यात इतर औषधी वनस्पती देखील टाकु शकता. या चहाचे वैशिष्ट्य म्हणजे कॅफीनमुक्त चहा. या चहाचा ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनाही फायदा होईल.
मित्रांनो, या लाभदायक तुळशीच्या पानांचे अशा प्रकारे सेवन केले तर आपणास नक्कीच फायदा होईल आणि आपले आरोग्य सुधारेल.
टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.
मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!