तुळशीच्या मुळांशी लपवून ठेवा ही 1 वस्तु.. माता लक्ष्मींना तुमच्या घरी यावंच लागेल..!!! धनलाभासाठी करावयाचा अचूक उपाय..!!

मित्रांनो.., आजच्या आपल्या या विशेष लेखात आम्ही तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहोत तो उपाय तुम्ही नक्कीच करून पाहायला हवा. या उपायामुळे तुम्हाला जास्तीत जास्त फायदा मिळेल. लक्ष्मी मातेचा वरदहस्त तुमच्यावर कायम राहील. त्यांना तुमच्या घरी यावंच लागेल असा हा खास उपाय आहे.

जो केल्याने घरात बरकत येऊ लागेल. घरात धनधान्याची सुबत्ता सुद्धा येईल. मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीत सर्वांच्याच घराच्या बाहेर एक तरी तुळशीवृंदावन नक्कीच असते. आपला आजचा उपाय सुद्धा तुळशी वृंदावनाच्या संदर्भातील आहे.

म्हणूनच हा उपाय तुम्हाला तुळशी मातेच्या आशिर्वादासह करायचा आहे. तुम्हाला घ्यायचा आहे फक्त एक रुपयाचा एक सिक्का आणि तो तुळशीमध्ये टाकायचा आहे पण कधी आणि कसा कोणत्या विधी विधानांनुसार..??

या बाबतीत सविस्तर माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.. हा एक रुपयाचा सिक्का तुम्हाला तुळशीमध्ये टाकायचा आहे. पण हा एक रुपयाचा ‘लक वाला सिक्का’ तुमच्याकडे असायलाच हवा.

राहीली गोष्ट तुळशीच्या रोपाची ते तर प्रत्येकाच्या घरात उपलब्ध असतेच.आता जाणून घेऊ हा उपाय तुम्हाला आठवड्यात कोणत्या दिवशी करायचा आहे. तर मित्रांनो, हा उपाय तुम्ही आठवड्यातील कुठल्याही दिवशी सकाळी सकाळीच करायचा आहे सकाळी 6 ते 12 या वेळेत तुम्ही हा उपाय करू शकतात.

चला तर आता आपण या उपायाचा विधी जाणून घेऊ –

मित्रांनो, तुम्हाला फक्त आपल्या घरातील देवघरासमोर बसून हा विधी करावयाचा आहे. एक 1रुपयाचा सिक्का घेऊन तुम्ही आपल्या देवघरात ठेवायचा आहे. त्याची हळदी, कुंकू, अक्षता वाहून पूजा करायची आहे. रोजच्या तुमच्या पूजेप्रमाणेच ही पूजा तुम्हाला करायची आहे. पूजेनंतर तुम्ही तो सिक्का घेऊन तुळशी वृंदावनाकडे जायचं आहे.

तुळशी च्या आसपासच्या मातीमध्ये तो सिक्का खोलवर गाढून द्यायचा आहे. जेणेकरून कुणालाही तो सिक्का दिसणार नाही. आणि तो तेथे खालीच राहू द्यायचा आहे त्याला कधीही बाहेर काढायचं नाही. नंतर रोज तिथे घरातील देवपूजेनंतर देवांच्या अंघोळीचे उरलेले पाणी घालायचं, तुळशीची पूजा करायची आहे, आणि दिवाही लावायचा आहे.

आपल्या भारतीय परंपरेनुसार तुळशी मातेला साक्षात लक्ष्मीचे स्वरुप मानले गेले आहे. आणि तुळशीच्या आसपासच्या मातीमध्ये हा जो एक रुपयाचा सिक्का आपण ठेवलेला असतो त्यामुळे आपल्या घरात बरकत येते, पैसाही येतो. तसेच या 1 रुपयाचा सिक्क्यामुळे तुमच्या घरामध्ये कुठलीही अडचण प्रवेश करू शकणार नाही. कुठलीही वाईट शक्ती किंवा नकारात्मक शक्ती तुमचं वाईट करु शकणार नाही.

धनाची देवता लक्ष्मी यांना तुमच्या घरात आगमन करावंच लागेल. घरात सुबत्ता येऊ लागेल. तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य दूर होईल, गरिबी दूर होईल. व गरीबी तुमच्या घरात पुन्हा प्रवेशही करणार नाही.

तुम्ही तुमच्या तुळशी वृंदावनमध्ये एक रुपयाचा सिक्का वर दिल्या प्रमाणे नक्की पेरुन द्या.आपल्या घरामध्ये बरकती येईल, तुळशी मातेच्या कृपेने पैसे येत राहतील. माता लक्ष्मीचे घरातील वास्तव्य दिर्घकाळासाठी वाढेल.

टिप – वरील माहिती ही सामाजिक, धार्मिक तसेच ज्योतिष मान्यते वर आधारित एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या समस्या तसेच अडचणींवर उपायांसाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा. आणि इतरहि वेगळ्या प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमच्या पेजला सातत्याने भेट देत राहा.

Leave a Comment