तुळशीच्या मूळांचा करा अशा प्रकारे वापर, सोबत करा या मंत्राचा जाप.. लागतील धन धान्यांच्या राशी..!!

नमस्कार मित्रांनो, रॉयल कारभार वर तुमचं स्वागत आहे. आपल्या हिंदू संस्कृतीत तुळस या वनस्पतीला फार महत्व दिले जाते. मित्रांनो, या वनस्पतीचे जितके धार्मिक, अध्यात्मिक महत्व आहे, तितकेच इतर गुणधर्म देखील आहेत. तसेच तुळशीचे औषधी फायदे सुद्धा आहेत. म्हणूनच आपल्या प्रत्येकाच्या दारात एकतरी तुळस असतेच.

मित्रांनो, पुराणात या तुळशीचे अनेक उपाय सांगितलेले आहेत. तुळस या वनस्पतीच्या योग्य वापरामुळे आपण कितीतरी आ-जारांपासून आपली सुटका करुन घेऊ शकतो. त्याचप्रमाणे कितीतरी बाधा, अडचणींसाठी या तळशीचा वापर करता येऊ शकतो.

ज्या ठिकाणी तुळस असते त्या ठिकाणी एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा आपोआपच तयार होत असते. जो कुणीही नियमितपणे व मनोभावे तुळसपूजन करत असतो त्या व्यक्तीला या सकारात्मक ऊर्जेचे अस्तित्व नक्कीच जाणवते. केवळ दररोज सकाळी आपले स्नान झाल्यानंतर एक तांब्याभर पाणी तुळशीला अर्पण करावे. तेवढं केल्याने देखील अनेक अडचणींवर मात करता येते.

ज्या प्रमाणे देवतांचे पूजन करतांना मंत्र, श्लोक आदिंचे पठन करुन देवतांना प्रसन्न केले जाते, त्याचप्रमाणे तुळशी मातेला.. ” ॐ नमो भगवते वासुदेवाय” या मंत्राचा अखंड जाप करत 5, 7, 11, 21, 108 अशा आपल्या कडून जितक्या होऊ शकतील तितक्या प्रदिक्षणा घालाव्यात. यामुळे तुळशीतुन निघणारी सकारात्मक ऊर्जा आपोआपच आपल्याला मिळते.

जुनी माणसं असे म्हणतात की घरात काही अनिष्ट घटना घडणार असेल तर दारातील तुळस ते संकट स्वतःवर घेत असते. म्हणून आपण खूप देखभाल करूनही जर तुळस कोमेजून जात असेल तर समजून जायचं कि आपल्यावर किंवा आपल्या कुटुंबातील एखाद्या सदस्यावर एखादं संकट येणार आहे. त्याचमुळे दारातील तुळस वेळोवेळी कोमेजून जात असते. जर दारातील तुळस कोमेजून गेली तर अशा वेळी ती वृंदावनातून काढून घ्यावी आणि तिचे वाहत्या पाण्यात विसर्जन करावे. नंतर वृंदावनात दुसरी तुळस आणून लावावी.

पुराणात तुळशी पत्रांचे पानांचे फार महत्व आहे. तुळशी या वनस्पतीची फक्त चारच पानं रात्री झोपताना आपल्या उशीच्याखाली ठेवून झोपावं किंवा जवळ तरी घेऊन झोपावं. हा उपाय सलग 43 दिवस केल्याने त्याचं उचित ते फळ मिळतं. जर एखाद्या व्यक्तीला रात्री शांत झोप लागत नसेल तर तुळशीच्या पानांमधून निघणाऱ्या सकारात्मक ऊर्जेमुळे आपल्याला शांत झोप लागते. कोणत्याही प्रकारचे वाईट स्वप्न पडत नाहीत. जर कुणाला भीती वाटत असेल, एखाद्या गोष्टीचे अचानक पणे दडपण असेल. तर ती भीती आणि दडपण देखील दूर होईल. त्याचप्रमाणे आपले दुर्दैव हे सुदैवात बदलून जाणार.

मित्रांनो, आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये, व्यवसायात यश हवं असेल तर तुळशीच्या मुळाचा देखील एक उपाय आपण करू शकतात. त्यासाठी तुम्हाला तुळशीच्या मुळाला निमंत्रण देऊन घरी आणायचे आहे. तुळशीचं ते मूळ घरी आणून गंगाजलाने व्यवस्थित स्वच्छ करायचे आहे. नंतर ते मुळ एका पिवळ्या कापड्यात बांधायचे आणि पिवळ्याच दोऱ्याला आपल्या उजव्या हातात गुरुवारच्या दिवशी बांधून घ्यायचे आहे. हे मुळ अभिमंत्रित करताना सुद्धा, “ओम नमो भगवते वासुदेवाय” या दिव्य मंत्राचा जाप आपण करायचा आहे.

हा उपाय केल्याने आपल्या जीवनातील सर्व आर्थिक व भौतिक समस्या ज्या आहेत असतील त्या दूर होतील. सर्व कामे सुरळीत तथा विना अडथळ्याची पार पडतील. परिवारातील एखाद्या सदस्याला दृष्ट लागली असेल, तब्येत बरी नसेल, किंवा कुणाचा व्यवसायात जम बसत नसेल, किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल तर त्यासाठी घरातील कोणत्याही एका सदस्याला 7 काळी मिरी, आणि 7 तुळशीची पानं घेऊन ती आपल्या अंगावरून 7 वेळा उतरवायला सांगावी. आणि हा उपाय करतांना ॐ या नावाचा अखंड जाप सुरु ठेवावा.

नंतर ते काळीमिरीचे दाणे चावून त्यांच्या चोथा करावा आणि बाहेर फेकून द्यावेत. तुळशीची पाने फेकायची नाहीयेत, ती खाऊन घ्यायची. नंतर एक स्वच्छ कापड घेऊन झोपून तळ पायावरून त्या कपडाने 7 वेळा उतारा करुन घ्यावा. मित्रांनो, हा उपाय केल्याने आपल्यावर कुणी करणी वैगेरे केलेली असेल, आपल्यावर जर तंत्र मंत्रांचा प्रभाव टाकला असेल, तर त्या सर्व शक्तींचा नाश होईल व आपल्या आयुष्यात सकारात्मकता येईल.

तसेच मुख्य द्वाराच्या दोन्ही बाजूस जर तुळस असेल तर त्याचाही आपल्या आयुष्यावर सकारात्मक असा प्रभाव पडत असतो. त्यामुळे घरातील धन धान्यात देखील वाढ होत असते. पैशांत बरकत येत असते. घराच्या बागेत दोन्ही बाजूंना तुळस लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम राहतो. नकारात्मक ऊर्जेला प्रवेश करण्यासाठी जागा देखील उरत नाही.

मित्रांनो, सकाळी व संध्याकाळी तुळशीजवळ गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा जरूर लावावा. असे केल्याने आपल्यावर देवी लक्ष्मींची कृपादृष्टी होते. मुले जास्त हट्टीपणा करत असतील किंवा घरातील कुणाचेही ऐकत नसतील तर, रविवारचा दिवस सोडून इतर सर्व दिवशी मुलांना पूर्वेकडे असलेल्या तुळशीची चार पाने खायला घालावीत. यामुळे मुलांमधील हट्टीपणा दूर होऊन मुलं आपलं म्हणणं ऐकायला लागतात.

एखाद्या घरात जर मुलीचे लग्न जमत नसेल तर अग्नेय दिशेला तुळशीची कुंडी ठेवावी. आणि त्या मुलीला दररोज एक तांब्याभर पाणी तुळशीला अर्पण करायला सांगावे. असे केल्याने लवकरच मुलीला योग्य असा वर मिळणार.

जर एखाद्या घरात नेहमीच भांडण, वादविवाद होत असतील तर आपल्या स्वयंपाकघराच्या खिडकी मध्ये तुळशीची कुंडी ठेवावी. असे केल्याने घरात नेहमी प्रेम आणि जिव्हाळा टिकून राहील.

तुळशीच्या मण्यांची माळ दररोज जपल्यास आपल्यावर कोणत्याही प्रकारचे संकट येत नाही. म्हणून दररोज पाच मिनिटे का होईना घरातील सदस्यांनी तुळशीसमोर उभे राहावे. तिचे पूजन व नामस्मरण करावे. लहान मुलांना दररोज तुळशीची पाने खायला दिल्याने त्यांची बुद्धिमत्ता तीव्र होते. तसेच पोटाच्या संबंधीत काही वि’कार असतील तर ते देखील न’ष्ट होतात. मुलांना जर तुळशीच्या आसपास अभ्यासाला बसवले तर त्यांची ग्रास्पिंग पावर वाढण्यासाठी मदत होते. त्यामुळे कोणतीही गोष्ट मुलांच्या लवकर लक्षात राहते. त्याबरोबर स्वास्थ्याच्या सं’बंधीत अनेक फायदे होतात.

त्याच बरोबर देवी देवतांची कृपा देखील आपल्यावर तसेच आपल्या कुटुंबातील सदस्यांवर होते. आपण गळ्यात तुळशी माळ घातली तर आपल्या आरोग्याच्या सं’बंधीत सर्व अडचणी देखील दूर होतात. देवी देवतांची कृपा सदैव आपल्या सोबत कायम राहते. आपल्यावर कोणाची वाईट नजर पडत नाही. मित्रानो, हे सर्व उपाय करून आपण आपल्या जीवनातील सर्व नकारात्मक ऊर्जा कायमची नाहीशी करू शकतात. व आपले दुर्दैव सुदैवात बदलू शकतात.

टीप- येथे दिलेली सर्व माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा,शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment