तुमची तिजोरी राहणार नेहमी भरलेली, फक्त तिजोरीत ठेवा या चमत्कारिक वस्तू..!!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.. फक्त तिजोरीत ठेवा ह्या चमत्कारिक वस्तू तिजोरी राहणार कायमस्वरुपी भरलेली.. मित्रांनो, धनवान बनणे माणसाच्या आयुष्यातील एक खूप मोठे स्वप्न असते.अमाप संपत्ती, वैभव प्राप्त करण्यासाठी आवश्यक आहे अथक परिश्रम आणि मेहनत.

ज्यांच्याकडे वडिलोपार्जित संपत्ती असते त्यांना तिचा अजून विस्तार करावा वाटतो. याचा अर्थ असा आहे की पैश्याची भुक कधीच मिटत नाही. प्रत्येक व्यक्तीला आपली आर्थिक स्थिती मजबूत असावी असे वाटते.

त्या जागेला खूप महत्त्व असते. आपली तिजोरीत पैसा ठेवण्याची जी पद्धत असते तिचा परीणाम हा संपत्ती येणे, ती टिकवणे आणि ती खर्च होणे, तसेच तिच्यात वृद्धि होणे ह्या सर्व प्रकारच्या गोष्टींवर होतो. तुमच्या तिजोरीत ठेवलेले पैसे का वाढत नाहीत किंवा ते लवकर खर्च होऊन जातात.

तिजोरी रिकामी का असते आज आम्ही तुम्हाला या सर्व गोष्टींशी संबंधित वास्तुशास्त्राचे काही उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमच्या तिजोरीतून पैसे ओसंडून वाहतील. साक्षात माता लक्ष्मी तुमच्या तिजोरीत यायला हवी असेल तर जाणून घ्या हे चमत्कारी उपाय.

1) काही पितळ आणि तांब्याच्या नाण्यांसह तिजोरीत 10-10 च्या नवीन कोऱ्या नोटांचा बंडल ठेवा. तुम्ही तिजोरीत पिवळी नाणी देखील ठेवू शकता. यातील काही नाणी तुमच्या पर्समध्ये किंवा खिशातही ठेवा.

2) तिजोरी बसवल्यानंतर, लक्षात ठेवा की त्यात कोणतेही दावे, कागदपत्रे, पैसे आणि दागिने एकत्र ठेवू नयेत. हे सर्व एकत्र ठेवल्याने तिजोरीत पैशांचे नुकसान होते.

3) तिजोरीत लाल रंगाचे कापड टाकणे शुभ मानले जाते. रोज सकाळी संध्याकाळी तिजोरीवरून उदबत्ती ओवाळून मनोभावे माता लक्ष्मीची पुजा करावी.

4) श्री यंत्र, व्यापार वृद्धी यंत्र, महालक्ष्मी यंत्र, बिसा यंत्र किंवा हठ जोडी या लाल रंगाच्या कपड्यात किंवा चांदीच्या ताटात शुभ साधनांची स्थापना केल्याने शुभता कायम राहते. तुम्ही त्यांना दररोज धूप दाखवत राहिले पाहिजे.

5) पिंपळाचे पान घ्या. त्यावर देसी तूप आणि लाल सिंदूर मिसळून ‘ओम’ लिहा आणि तुमच्या तिजोरीत किंवा तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवा. किमान सलग पाच शनिवार हे करा. या युक्तीने पैशाशी संबंधित समस्या दूर होतील.

6) पुष्य नक्षत्राच्या दिवशी संध्याकाळी लक्ष्मीची पूजा करा. पूजेमध्ये जुनी चांदीची नाणी, रोख रक्कम आणि पाच कौड्या ठेवा आणि त्यांची केशर आणि हळदीने पूजा करा. पूजेनंतर या सर्व वस्तू तिजोरीत ठेवा. तुमची तिजोरी नेहमी पैशांनी भरलेली असेल.

7) मोराचे पंख घ्या आणि त्याला चांगले गुलाबाचे अत्तर लावा. त्यानंतर या मोराचे पंख स्वच्छ पांढऱ्या रेशमी कपड्यात बांधून/गुंडाळून ते तिजोरीत ठेवा, हा उपाय केल्याने तिजोरी कधीही रिकामी होत नाही.

8) असे मानले जाते की दक्षिणावर्ती शंख देवघरात किंवा तिजोरीत ठेवल्याने रंकाचाही राजा होतो. या शंखात देवी लक्ष्मीला आकर्षित करण्याची क्षमता आहे. सोम-पुष्य योग असताना हा उपाय केल्याने घरात आनंद आणि समृद्धी राहील.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment