Monday, December 4, 2023
Homeजरा हटकेतुमची ही 4 गुपिते हुकूमाच्या एक्क्या सारखी गुप्त ठेवा, कुणा जवळही नका...

तुमची ही 4 गुपिते हुकूमाच्या एक्क्या सारखी गुप्त ठेवा, कुणा जवळही नका बोलू.. नाहीतर..,

मित्रांनो, गप्पांच्या ओघात, भावनेच्या आहारी जाऊन कधी कधी आपण नको त्या गोष्टी, नको त्या लोकांसमोर जाहीर करुन बसतो. आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. म्हणूनच आपण नेहमी इतरांशी बोलतांना काही गोष्टींचं भान ठेवायला हवे.

चाणक्य नितीचे उपदेशक महान विद्वान आचार्य चाणक्यांनी आपल्या चाणक्य नितीमध्ये जीवनातील अगणित अनुभव सांगितलेले आहेत. त्यात त्यांनी नमूद केल्याप्रमाणे आपल्याला जगण्यासाठी आवश्यक असलेल्या कितीतरी गोष्टी किंवा दैनंदिन आयुष्यात पाळावे लागतात असे नियम उकल करुन सांगितलेले आहेत. आणि म्हणूनच मित्रांनो, आचार्य चाणक्य यांना आपल्या भारताच्या इतिहासातील महान विद्वानांपैकीच एका मोठ्या विद्वानाचे श्रेय दिले गेले आहे.

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नितीमध्ये सांगितल्या नियमा प्रमाणे आपल्या बद्दल च्या या 4 गोष्टी आपण चुकूनही कुणालाच सांगयला नकोत. मित्रांनो, चला तर मग जाणून घेऊया की त्या चार गोष्टी वजा नियम कोणते आहेत..

त्यातला पहिला नियम म्हणजे – आपला झालेला अपमान..!! मित्रांनो, जर एखाद्या व्यक्तीकडून आपला अपमान झालेला असेल तर ही गोष्ट आपण चुकूनही कुणाला सांगायला नको, त्याचे मुख्य कारण म्हणजे काही लोकांना अशी सवय असते की, समोरच्याच्या दुःखाला ऐकून घ्यायचे अगदी आपलं सांत्वनही कारायचे व त्यानंतर आपली पाठ वळली की इतरांसमोर तो आपला झालेला अ’पमान तिखट मीठ लावून तसेच वरतून हसून सांगून दाखवायचा.

आपल्या आयुष्यात कळत नकळत अशा घटना घडत असतात की त्यात आपला अपमान हा होतोच, पण ती गोष्ट आपण गुप्त ठेवायला हवी. जर आपण आपला झालेला अपमान इतरांना सांगितला तर आपल्या अपमानाचं भांडवल करुन, आपली चेष्टा मांडून बसायला सुद्धा काही लोक टपलेले असतात, मग इतर लोकही आपल्यावर हसतील, म्हणून एक लक्षात घ्या की आपल्या मान – अपमानाचा लोकांना काधीही फरक पडत नसतो. म्हणूनच हा झाला आपला पहिला धडा..

मित्रांनो या जगात सर्वात जास्त लोक एकमेकांचा हेवा, आणि इर्ष्या करत असतात. त्यांना आपल्या आयुष्यात काय घडत आहे याच्याशी काहीही देणंघेणं नसतं म्हणून आपला झालेला अपमान त्यांना सांगून आपण आपलीच किंमत कमी नाही करुन घ्यायची.

आपला झालेला अपमान नेहमीच गुप्त ठेवायचा, इतर कुणाशीही त्या घटने बद्दल वाच्यता करायची नाही. परंतु मित्रांनो आपल्या आयुष्यात घडलेल्या आनंदी व चांगल्या घटना तुम्ही इतरांना सांगू शकतात. पण त्या सुद्धा एका मर्यादेपर्यंत.. कारण तुमच्या सुखाला नजर लावणारे पण आहेतच की.. म्हणून आपल्या झालेल्या अपमानाला एक वाईट स्वप्न समजून आपण विसरून जायला हवे.

दुसरा आणि अतिशय महत्त्वाचा नियम म्हणजे – आपल्या परिवारात घडणाऱ्या काही बाबी इतरांना चुकूनही सांगू नये. बहुतांश घरामध्ये भांडण तंटे हे होतच राहतात. त्या भांडणाला आपण दुसऱ्या दिवशी विसरुनही जाऊ.. बाहेरच्या एखाद्या व्यक्तीला घरातील भांडणाची कुणकुण लागते आणि मग ते आपल्या पोटातून काही महत्त्वाच्या गोष्टी काढून पुन्हा घरात भांडणे लावतात.

याचाच अर्थ असा की आपण आपल्या घरातील लहान सहान गोष्टी जेव्हा बाहेरच्या एखाद्या व्यक्तीला सांगतो तरच त्यांना आपल्या घरातील सर्व गुपिते माहीती होत असतात, त्याचाच ते फायदा उचलतात आणि आपल्या घरामध्ये भांडणं लावण्याचं काम करत असतात.

म्हणूनच मित्रांनो, चुकूनही घराबाहेरील व्यक्तीला आपल्या घरातील सर्व गुपिते सांगू नये. विशेष म्हणजे घरातील गृहिणीच्या चारित्र्या बद्दल बाहेरच्या व्यक्ती बरोबर कधीही चर्चा करू नये. यामुळे तिचा अपमान होतो व आपल्या घरातील स्त्रीचा अपमान म्हणजेच पर्यायाने कुटुंबाचाही अपमान होतो. म्हणून आपल्या घरातील गृहिणी कशीही असली तरी तिच्याविषयी बाहेर बोलण्याचे जाणिवपूर्वक टाळावे. या महत्वाच्या नियमामुळे तुम्ही अशा बऱ्याच अडचणींपासून लांब राहू शकतात.

तिसरा नियम – आपल्या मनातील दुःख चुकूनही इतरांना सांगायला नको. बऱ्याच लोकांना ही सवय असते की आपले छोटेसे प्रॉब्लेम सुद्धा इतरांना सांगत बसतात. त्यांचा असा समज असतो की त्यामुळे त्यांचे मन मोकळे होणार, पण आपण आपलं दुःख,त्रास व अडचणी इतरांना सांगून आपण आपलेच मोठे नुकसान करुन घेतो. हा आपला समज असतो की ते तुमच्या दुःखाला समजून मनापासून घेतील.

पण होतं असं की काही लोक तुमच्या समोर तुम्हाला सहानुभूती दाखवत असतात पण तुमची पाठ फिरली की तुमच्यावरच कमेंट पास केल्या जातात, म्हणून कुणासमोर सुद्धा आपल्या दुःखांचा बाजार मांडू नका.शक्यतो तुमचं मन अशाच व्यक्तीजवळ हलके करा ज्यांच्यावर तुम्हाला पूर्णपणे विश्वास असेल.

जेव्हा तेव्हा नातेवाईकांसमोर एखाद्या मित्रांसमोर आपलं रडगाणं गात बसू नका. त्याच्याने तुमचं दुःख कमी व्हायच्या ऐवजी जास्त होईल. एक गोष्ट लक्षात असु द्या मित्रांना सांगून दुःख कधीही कमी होत नसते. दुःखाचे कारण स्वतःच शोधा आणि ते दूर करण्याचा प्रयत्न देखील करा. त्यावर पर्याय शोधा म्हणजे तुम्ही दुःखातुन स्वतःला सावरु शकाल.

पुढचा आणि शेवटचा नियम म्हणजे – तुमचे एखादे झालेले आ’र्थिक किंवा व्यवसायिक नुकसान.. आपल्या आयुष्यात असे कितीतरी प्रसंग येतात ज्यानंतर आपल्या हातात पैसाच शिल्लक राहीलेला नसतो, घरामध्ये अनेक आर्थिक अडचणी येतात, पैसा बजूला पडत नाही.

आपण अक्षरशः कंगाल होतो. अशातच आपली ही आर्थिक अडचण बाहेरील इतर कुणालाही सांगू नये. अशाने इतर लोक तुम्हाला मदत तर करण्याचं सोडाच पण ते तुम्हाला कमी लेखण्यास सुरुवात करतील. आणि तसेही हल्ली ज्याच्याकडे नगद नारायण आहे त्यालाच समाजात प्रतिष्ठा दिली जाते. त्याच व्यक्तीला भाव मिळत असतो. तुमच्या कडे पैसा नसेल तर तुम्हाला कुणीही विचारत नसतं.

आणि मित्रांनो, अशा व्यक्तींना कुणी मदत करत नाही. ज्यांच्याकडे पैसा नसतो. त्यापेक्षा आताच्या परिस्थितीतून बाहेर कसं पडावं यावर चिंतन करा. आर्थिक हानी झाली म्हणजे सगळं काही संपलं असं वाटून घेऊ नका. आपल्या कर्तृत्वावर, स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. आहे ती परिस्थिती कायम राहणार नाही हे लक्षात ठेवा.

बदल हा सृष्टीचा नियम आहे, तुमचेही दिवस पालटतील असा निर्धार मनाशी करा. सुखा नंतर दुःख व दुःखा नंतर पुन्हा सुख हे येणारच आहे. काही काळासाठी आलेल्या दुःखासाठी तुमचा आज वाया घालवू नका. म्हणून सांगतो मित्रांनो.. स्वतःचा सन्मान स्वतःच करावयास शिका… व आपली गुपिते दुसऱ्यांना सांगत जाऊ नका.

टिप – वरील लेख केवळ धा-र्मिक मान्यतेचा आधारावर तयार करण्यात आला आहे. तरीही या माध्यमातून आमचा कोणतीही अं-धश्रद्धा पसरविण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा कोणताही उद्देश नाही.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा,शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स