तुमची जांभई सांगते तुमचा स्वभाव, मोठ्ठी जांभई देणारे असतात जास्त बुद्धिमान..!!

मित्रांनो, आपल्याला जांभई येणे ही एक सामान्य गोष्ट जरी असेल, तरीही आपण कुठे बाहेर असाल तेव्हा याची काळजी नक्कीच घ्या की जांभई देतांना तुम्ही विचित्र दिसणार नाही. हो हे अगदी खरं आहे, आपण जिकडे कुठे बाहेर असाल तेथे आपण घरी वावरतात अगदी त्याप्रमाणे तर वागत नाही याची काळजी घ्या.

मेंदूवर जर खूप ताण असेल तर बचावासाठी शरीराची पहिली प्रतिक्रिया जांभई देणे ही असते. यामुळे मेंदू टॉक्सिनफ्री होतो, ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो आणि त्यामुळे रक्तदाब वाढला असल्यास नियंत्रित होण्यासाठी मदत मिळते परिणामी मेंदूवरील तणाव कमी होतो.

म्हणजेच, घरी आपण कशीही जांभई घेऊ शकतात, पण हेच तुम्ही जेव्हा सार्वजनिक ठिकाणी असतात तेव्हा असं वागतांना जरा विचार करुन वागा. सार्वजनिक ठिकाणी जांभई देतांना याबाबत काही तारतम्य बाळगायला हवे. नाहीतर तुमचं हसू व्हायला वेळ नाही लागणार.. नाही का..???

सार्वजनिक ठिकाणी जांभई येणे हे चांगले मानले जात नाही. आज आपण जांभई या विषयावर बोलणार आहोत. आम्ही तुम्हाला हे सांगणार आहोत की आपण ज्या पद्धतीने जांभई घेतो ती पद्धत आपल्याबद्दल बरेच काही सांगून जाते. चला तर तुमची जांभई घेण्याची पद्धत काय म्हणते ते जाणून घेऊयात.

जांभई आपण किती आळशी आहोत हे दर्शविते –

जगात क्वचितच लोक असतात जे जांभई रोखू शकतात. जांभई कडे कंटाळवाणेपणाचे किंवा झोप येण्याचे लक्षण म्हणून पाहिले जाते. परंतु आताच एका नवीन अभ्यासा नुसार असे समोर आले आहे ज्यामध्ये असे म्हटले आहे की आपली जांभई मधून आपण किती बुद्धिमान आहोत हे सिद्ध होते. म्हणजेच आपल्या बुद्धीमत्तेची पातळी आपल्या जांभई च्या माध्यमातून प्रतिबिंबित होत असते.

जांभई तुमची बुद्धिमत्ता दर्शविते –

तुम्ही जितका वेळ आणि जास्त मोठे तोंड उघडून जांभई द्याल तुम्ही तितके जास्त बुद्धिमान आहात. ऐकायला नवल आणि न पचण्या सारखा हा विषय जरी आहे, पण तितकाच खरा सुद्धा आहे.

मित्रांनो, तुमची जांभई तुमच्या बुद्धिमत्तेच्या पातळीला दर्शविते, अलिकडेच शास्त्रज्ञांनी केलेल्या एका रिसर्च मध्ये हे सिद्ध सुद्धा झालं आहे. आणि त्या विषयाला प्राण्यांच्या बुद्धिमत्तेशी जोडले आहे कारण हे सिद्ध झाले आहे की ज्या प्राण्याचा मेंदू मोठा आहे तो प्राणी तेवढी मोठी जांभई देत असतो.

जांभई वरुन एखाद्या व्यक्तीच्या बुद्धिमत्तेची पातळी ठरते –

आपल्या मेंदूचे वजन आणि मेंदूच्या बाह्य थरात असलेल्या न्यूरॉन्सच्या संख्येच्या आधारावर, त्या व्यक्तीची जांभई किती मोठी असू शकते याचा अंदाज केला जाऊ शकतो.

जांभई येण्याचे काही मुख्य कारणं…
थकवा किंवा झोपेमुळे.
झोप पूर्ण न झाल्याने.
औषधांमुळे.
शरीराचे तापमान कमी झाल्याने.
मेंदूच्या कार्यांमध्ये बिघाड झाल्यास.
शरीरात ऑक्सिजनची कमतरता असल्यास.
लिव्हर निकामी होण्याच्या अंतिम टप्प्यावर.
थकवा नसतानाही जांभई येणे हे हृदय विकाराचे लक्षणही असू शकते.
मेंदूचे कार्य मंदावल्यानेही जांभईचे प्रमाण वाढते .

तर मित्रांनो तुम्ही किती मोठी जांभई देतात हे आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा, तसेच तुमच्या एखाद्या बुद्धिमान मित्रांबरोबर हा लेख जरुर शेयर करा. जो तुमच्या सारखी मोठी जांभई देत असेल.

Leave a Comment