तुमच्या आजूबाजूला स्वामी शक्ती आहेत का.?? असे ओळखा.!!!

.

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्र-मैत्रिणींनो, आपल्यापैकी अनेक स्वामी समर्थांचे भक्त व सेवेकरी यांची नित्यनियमाने पूजा अर्चा करत असतात आणि काहीजण स्वामी समर्थांच्या स्तोत्राचे रोजच्या रोज वाचन करत असतात.

त्यामुळे काही भक्तांना व सेवेकऱ्यांना स्वामी समर्थ दृष्टांत देत असतात, याचा अर्थ असा होतो की स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावरवर आहे आणि स्वामींची शक्ती त्या भक्ताच्या पाठीशी आहे. अशी भक्त व सेवेकरी खूपच नशीबवान असतात कारण त्यांच्या पाठीशी स्वयम् श्री स्वामी समर्थ उभे असतात.

त्याच प्रमाणे अनेक सेवकांना पहाटेच्या वेळी अचानकपणे जाग येते पण त्यांना हेच कळत नाही, के हे स्वामी समर्थांनी त्यांना दिलेले संकेत आहेत की ब्रह्मसमयी झोपून न राहता माझी आराधना कर आणि माझा आशीर्वाद मिळवून घे,असा स्वामींचा संदेश असतो. त्याचप्रमाणे स्वामी समर्थांचे जे भक्त किंवा सेवेकरी ज्यावेळेस उपासना करत असतात त्यावेळी त्यांना मंद आणि सुगंध असा वास येतो, त्याचे असे संकेत असतात की स्वामी शक्ती त्यांच्या अस्तित्वाची जाणीव त्यांना करून देत असतात.

अनेकदा स्वामी समर्थांच्या भक्तांना थंड हवेची झळ लागते आणि अंगावर काटे येतात आणि आपल्या आजूबाजूला कोणीतरी आहे असा भास होतो आणि कित्येक वेळा आपल्या देवघरातील शंखाची हालचाल झाल्याचाही भास होत असतो त्यावेळी त्याचा अर्थ असा होतो की स्वामी शक्ती आपल्या आसपास आहे आणि आपल्या उपासनेत व ती स्वामी शक्ती प्रसन्न झाली आहे. असा अनुभव स्वामी समर्थांची उपासना करणाऱ्या अनेक भक्तांना येत असतो, पण त्यांना त्या लगेच लक्षात येत नाहीत.

मित्रांनो तुमच्यापैकी कोणाला असे अनुभव येत असतील तर लक्षात घ्या स्वामी समर्थांची शक्ती तुमच्या पाठीशी आहे आणि तुमच्या उपासनेने ते प्रसन्न आहेत, त्यानंतर या स्वामी शक्तीला कशाप्रकारे अनुकूल करून घ्यावे याचे आपण आता काही उपाय पाहणार की ज्यामुळे स्वामी समर्थ तुमच्या व वर प्रसन्न होतील.

जी व्यक्ती स्वामी समर्थाची सेवकरी आहे त्या व्यक्तीने आपले चरित्र एकदम स्वच्छ ठेवावे आणि मौन पाळावे आणि कायम
शांत राहण्याचा प्रयत्न करावा, त्याच प्रमाणे आपला आहार शुद्ध ठेवावा.

त्याचप्रमाणे स्वामी समर्थांच्या मंत्राचा नित्यनियमाने जप करावा, देवपूजा करत असताना स्वामी समर्थांची विशेष पूजा करावी. पहाटेच्या वेळी जाग येणाऱ्या भक्तांनी स्वामी समर्थांच्या या संदेशाचे भान ठेवून स्वच्छ स्नान करून देवपूजा करावी आणि स्वामी समर्थना ही अभिषेक घालून त्यांची विशेष पूजा करा आहे आणि स्वामी समर्थांच्या मंत्राचा जप करावा. शक्य असल्यास स्वामी समर्थांच्या पारायणाचे पटन करावे आणि त्यांच्या मंत्राचे नामस्मरण करावे त्यामुळे स्वामी समर्थ तुमच्यावर प्रसन्न होतील.

पहाटेच्या वेळी शक्य होईल तेवढ्या लवकर अंथरूण सोडून स्वच्छ स्नान करून स्वामी समर्थांची पूजा करायचा प्रयत्न करा, ब्रह्ममुहूर्तावर उपासना आणि देव पूजा करणार्‍यांना वर स्वामी समर्थांची तसेच इतर देवी-देवतांची कृपा राहते आणि त्याचे चांगले फळ लगेच आपल्याला मिळते.

मित्रांनो वर सांगितलेले अनुभव जर तुम्हाला येत असतील तर लक्षात ठेवा की तुमच्या आजूबाजूला स्वामी शक्ती वास करत आहे आणि जर येत नसतील तर जे उपाय सांगितले आहेत ते करून स्वामी समर्थांना प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न हे तुम्ही करू शकता.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Comment