श्री स्वामी समर्थ.!! नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, तुमच्या घरात जर स्वामी समर्थांचा फोटो असेल तर तुम्ही सुद्धा या चुका अजिबात करू नका. स्वामी समर्थांचा फोटो सगळ्या स्वामी सेवेकऱ्यांच्या घरात असतोच पण जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही छोटा-मोठा जसा तुम्हाला वाटेल तसा फोटो तुम्ही तुमच्या घरात नक्की लावा.
फोटो लावल्यानंतर आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी पाळावे लागतात आणि कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते हे बऱ्याच जणांना माहिती नसते. स्वामींची प्रतीमा आपल्याला मानसिक समाधान मिळते. स्वामींची मुद्रा पाहून दिवस सुरू केल्यास दिवसातील अडचणी दूर होतात.
जरी आल्याचं तर त्यावरती स्वामी मार्गदर्शन करतात. स्वामींचे दर्शन रोज घेणे म्हणजे अमृतयोग होय. स्वामी आपल्या घरातील सर्व सदस्यांवर कृपा करतात, जे सेवेकरी स्वामींची पूर्ण श्रद्धेने, भक्तीने, विश्वासाने पूजा करतील त्यांना त्यांच्या सर्व कामात यश मिळते.
स्वामी समर्थांचा फोटो आपल्या घरात आला की असे समजावे, स्वामी समर्थ स्वतः आले आहेत, त्यांना फोटोमध्ये किंवा फोटो आहे असं समजून पूजा नका करू, तर इथे आपल्या घरी स्वतः स्वामी समर्थ आले आहेत, एक मोठे आपल्या घराचे थोर पुरुष आहेत हे समजून आपण वागावे.
त्यांना दोन वेळेस जेवण म्हणजेच नैवेद्य दाखवावा, अगदी जे तुम्ही रोज पोळी भाजी, भाजी भाकरी, स्वीट काही असेल तर ते नक्की दाखवायचं, अगदी दाखवल्या शिवाय आपण जेवण करू नये असा नियम करून घ्या. त्यानंतर प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही त्यांच्याशी बोलत राहायचं.
बाहेर जाल तेव्हा स्वामींना नमस्कार करुन बाहेर जा, बाहेरून आल्यावर हात-पाय तोंड धुवून नमस्कार करा आणि आभार माना की सुखरूप घरी आलो. स्वामी समर्थ आपल्या घरात जे फोटो मध्ये येतात तेव्हा ते साक्षात असतात हाच जर तुमचा विचार झाला असेल तर नक्कीच स्वामी तुमच्यावर कृपा करतील.
स्वामी प्रसन्न होतील. तुमच्या हातून चुका होणार नाहीत. स्वामींच्या सेवेकरीला त्याच्या आयुष्यातील समस्यांचा सामना करण्यासाठी बळ मिळते, ताकद मिळते, आत्मविश्वास वाढतो तसेच त्यांचं जीवन सफल होतं. स्वामींची पूजा, सेवा केल्यास आपलं जीवन एक वेगळं सुंदर वळण घेते.
त्यामुळे तुमच्या जीवनातील गोष्टी या जरी अडलेल्या असतील तर त्या पूर्ण होतात. तसेच तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना देखील पूर्ण होतात.
वरील माहिती विविध स्रोतांची आधारे एकत्रित केलेली आहे याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!