तुमच्या कपड्यांच्या रंगांचाही तुमच्या जीवनावर होतो सकारात्मक परिणाम : जाणून घ्या तुम्ही कोणता रंग वापरायला हवा..!!

तुमच्या कपड्यांचा रंग देतो यश, भरभराटी, आनंद आणि अफाट संपत्ती..!!

नमस्कार मित्रांनो, आपलं रोजचं एक रुटीन लाइफ असतं. आपण ऑफिस ला जातांना किंवा बाहेर कुठेतरी जातांना आपल्या आवडीच्या रंगांचे कपडे घालत असतो मगच घराबाहेर पडतो.

तसे तर आपल्या वास्तु शास्त्रामध्ये प्रत्येक समस्येसाठी अनेक उपाय सांगितलेले आहेत, वास्तुनियमानुसार आपण रोजच्या रुटीन मध्ये कोणत्या रंगाचे कपडे घालतो यावर देखील बरंच काही अवलंबून असतं.

तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की कुठे एखाद्या महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना कोणत्या रंगाचे कपडे आपणं परिधान करायला हवेत, किंवा आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी देखील आपण कोणता रंग घातलेला असतो हे बघणं खुपचं गरजेचं आहे.

मित्रांनो, वास्तुशास्त्र म्हणजे आपल्या जीवनाशी संबंधित एक अतिशय महत्वाचा विषय आणि घटक देखील आहे. आपले जीवन सुखी तथा समाधानी करण्यासाठी आपण या वास्तुच्या नियमांचे पालन हे करायला हवेच.

आणि वास्तुशास्त्रानुसार आपण वापयतो ते रंग सुद्धा आपल्या आयुष्यावर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव टाकत असतात. आणि आपण स्वभावतः म्हणा हवं तर पण नकळत वेगवेगळ्या रंगाचे कपडे घालत असतो.

मित्रांनो, या रंगांचा आपल्या भावनांवर, मनांवर, आसपास च्या वातावरणावर देखील खूपच खोल असा परिणाम हा होत असतो. तसेच काही रंग आपल्याला उत्साहित करत असतात तर काही आपल्याला शांत राहण्यासाठी मदत करतात.

म्हणूनच जर कधी आपण वास्तुनियमानुसार रंगांची निवड करुन वस्त्र परिधान केलेत तर त्यांच शुभ फळ म्हणून आपल्या जीवनात आनंद येतो भरभराटी येते आणि आपल्या यशाचे अनेक मार्ग उघड होतात.

आज आम्ही आपल्या साठी याच माहितीचा खजिना घेऊन आलो आहोत. त्यावरुन कळेलच की कोणत्या रंगाचे कपडे वापरणं आपल्यासाठी अधिक फायदेशीर आहे.

पां ढ ऱ्या रंगाचे कपडे – वास्तूशास्त्रामध्ये पां ढ रा रंग हा शांततेचं प्रतीक मानला जातो. मित्रांनो, जेव्हा आपलं मन विचलित होत असतं आणि आपल्या सभोवताली नकारात्मक वातावरण तयार होत असते तेव्हा आपण पां ढ र्‍या रंगाचे कपडे घातले पाहिजेत.

मित्रांनो, ज्योतिष शास्त्रानुसार सुद्धा पां ढ ऱ्या रंगाचे कपडे हे शुक्र या ग्रहाशी सं बं धि त आहेत, तसेच ते शुभतेचे प्रतिक देखील आहेत. पां ढ रा रंग हा ज्योतिषशास्त्रामध्ये शुभ मानला जातो.

पिवळ्या रंगाचे कपडे – वास्तुशास्त्राच्या म्हणण्यानुसार जर तुमचं एखादं काम तुम्हाला लवकरात लवकर करायचं असेल तर तुम्ही त्या कामासाठी बाहेर पडतांना पिवळे कपडे घालायला हवेत.

मित्रांनो, पिवळ्या रंगाचे कपडे घातल्यामुळे एखादी व्यक्ती आव्हानाला सामोरे जाण्यास तयार होते. तशी सकारात्मक उर्जा त्या व्यक्तीच्या आसपास आपोआपच तयार होते. आणि या उर्जेचा थेट संबंध बृहस्पति ग्रहाशी निगडित असतो.

लाल रंगाचे कपडे – वास्तुशास्त्राच्या मते, लाल रंगाचे कपडे परिधान केल्याने एखाद्या व्यक्तीमध्ये उत्साह आणि उर्जा आपोआपच येते. जर एखाद्या व्यक्तींमध्ये कमजोरपणाची भावना आली असेल तर त्या व्यक्तीने लाल रंगाचे किंवा त्या सारख्याच दिसणाऱ्या रंगाचे कपडे घालायला हवेत.

असे केल्याने त्या व्यक्तीमध्ये अचानक बदल घडून त्या व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल होत असतो, किंवा त्या व्यक्तीचे विचार सकारात्मक होत असतात. त्या कपड्यांचा प्रभाव आणि त्या उर्जेची झलक त्या व्यक्तीच्या वागण्यावरुन आणि आत्मविश्वासावरुन स्पष्टपणे दिसून येते.

मित्रांनो, असा समज आहे की आपले कपडे म्हणजे आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतात, म्हणूनच कपडे निवडतांना किंवा त्यांचा वापर करताना या सर्वच बाबींची विशेष अशी काळजी आपण घ्यायला हवी.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment