तुमच्या मुलीने तिच्या लग्नात परिधान केलेला दागिना तुम्हाला बनवू शकतो श्रीमंत आणि धनवान..!!!

मित्रांनो, फक्त तुमच्या मुलीने परिधान केलेला हा एक दागिना आपल्याला श्रीमंत बनवू शकतो. चला तर मग आज आपण जाणून घेऊयात या दागिन्याचा उपयोग काय आणि तो कोणता दागिना आहे..!!!

आपण आपल्या आजुबाजूला बघतो की, लोक श्रीमंत होण्यासाठी प्रत्येक गोष्ट करत असतात. कष्ट करुनही काही लोकांना पाहिजे तसं आयुष्य जगता येत नाही. वास्तुशास्त्रानुसार ज्या घरातील महिला सदैव आनंदी आणि प्रसन्न असतात तेथेच माता लक्ष्मींचे वास्तव्य टिकून असते.

आपल्या शास्त्रामध्ये सांगितल्या प्रमाणे स्त्रियांनी नेहमी घरामध्ये सजून -धजून तसेच सोळा शृंगार करून रहायला हवे. तसेच ज्योतिषानुसार सुद्धा हेच सांगितले जाते.

घरात सौख्य नांदण्यासाठी महिलांनी नेहमी प्रसन्न आणि आनंदी रहावे. आपल्या हिंदू परंपरेनुसार आपण हा एक दागिना आपल्या मुलीला अवश्य भेट म्हणून द्यायलाच पाहिजे.

मित्रांनो, खरं तर , स्त्री च्या सोळा शृंगाराच्या बाबतीत बोलयचंच झाल, तर त्यामध्ये स्त्रीच्या पायांतील पैंजण खुप महत्त्वाचे आहेत. शास्त्रात असे म्हटले आहे कि, एखाद्या व्यक्तीच्या घरात कायम पैशांची कमतरता भासत असेल, तर त्या व्यक्तीने आपल्या मुलीला चांदीचे पैंजण भेट म्हणून दिली पाहिजे.

चांदीला चंद्राचे कारक मानले जाते. तसेच चांदी चंद्राचे प्रतिक असल्याचे देखील म्हटले जाते. आणि चंद्रमा हा आपल्या मनाचा ग्रह सुद्धा मानला जातो. म्हणूनच तुमच्या कुंडलीतील चंद्राची स्थिती जर चांगली असेल तर तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात यश मिळत जाते.

मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या मुलीला पैंजण भेट म्हणुन दिलेत तर तुमच्या घरात कधीही पैशांची कमतरता भासणार नाही. तसेच, असेही म्हटले जाते की, ज्या घरात मुलीच्या किंवा सुनेच्या पायातील पैंजणांचा छुम-छुम आवाज कायम येत असतो. अशा घरामध्ये साक्षात गजांतलक्ष्मी नांदत असते.

हिंदू धर्मग्रंथांनुसार असेही सांगितले गेले आहे की घरात संपत्ती टिकवण्यासाठी घरातील स्त्रीने आपल्या घरामध्ये सजून – धजून सोळा शृंगार करूनच रहावे. तसेच, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातील स्त्रियांच्या पायामध्ये चांदीचे पैंजण असणे सर्वात गरजेची गोष्ट आहे.

ज्योतिषानुसार असे देखील सांगितले जाते की , जेव्हा आपल्या घरातील मुलीचे लग्न निश्चित होते त्या वेळी मुलीच्या पायात चांदीचे पैंजण घालावेत, आणि लग्नाच्या वेळी निरोप घेताना ते पैंजण काढून आपल्या घरातील तिजोरीमध्ये ठेवावे.

आणि विदाई करतांना आपल्या मुलीच्या पायात एक नवीन पैंजणांची जोडी घालून द्यावी. असे केल्याने आपल्या घरामध्ये कधीच पैशांची कमतरता भासणार नाही.

टीप- येथे दिलेली सर्व माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा,शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment