मित्रांनो, आपण सर्वच रविवारची आतुरतेने वाट पाहतो आहोत, आम्हाला रविवार सर्वात जास्त आवडतो. कारण रविवारी सुट्टी असल्यावर आपल्याला मौज करायला मिळणार असते, आउटिंग ला वैगेरे जायचा प्लान करता येऊ शकतो. अजूनही बरीच मौज आपण रविवारच्या दिवशी करण्याचं ठरवत असतो.
रविवार हा एकच दिवस आहे जो आपण आपल्या इच्छेनुसार घालवू शकतो. या दिवशी आपल्यावर कुठल्याही कामाचा जास्त ताण नसतो. ना कुणी आपल्यावर बॉसगिरी करणार असतं.. आपल्या मर्जीचे आपण मालक असतो या रविवारच्या दिवशी..
आम्ही हा एकमेव दिवस आमच्या कामापासून मुक्त करतो आणि कुटुंबासमवेत एकत्र घालवितो. बँका, शाळा, कार्यालये इत्यादी सर्वांना रविवारी सुट्टीच असते आणि ती बंदच असतात.
आठवड्यातले सर्व दिवस काम करून, आम्ही सर्वजण रविवारीची वाट पाहत असतो कारण रविवार हा सुट्टीचा दिवस आहे, परंतु रविवारी सुट्टी का असते याबद्दल आपण कधी विचार केलेला आहे का?
रविवारची सुट्टी कुणामुळे सुरु करण्यात आली..?? या दिवसाच्या सुट्टीमागील इतिहास काय आहे? रविवारच सुट्टीसाठी का म्हणून निवडला गेला आहे.? तर मित्रांनो यामागे देखील एक विशिष्ट कारण आहे.
आपल्या सर्वांना माहिती आहेच की ख्रिस्ती ध-र्माचे बरेच लोक जगात वास्तव्य करतात. या ख्रिश्चन ध-र्माच्या लोकांचा असा विश्वास आहे की जेव्हा देवाने या जगात ज्यावेळी मनुष्य, तथा प्राणी निर्माण केले, तेव्हा देवाला सृष्टी ही निर्माण करण्यासाठी 6 दिवस लागले.
आणि मग असे केल्याने देवाला खूप थकवाआला होता आणि 6 दिवसानंतर देवाने 7 व्या दिवशी आराम केला. अशा प्रकारे ख्रिश्चन धर्माच्या लोकांनीही रविवारचा दिवस हा विश्रांतीचा, आराम करण्याचा दिवस बनविला. याच कारणास्तव रविवारची सुट्टी जाहीर करण्यात आली.
मित्रांनो, तुम्हाला रविवारच्या सुट्टीचा इतिहास माहित असावा. पण आता रविवारची सुट्टी आपल्या भारतामध्ये कधी सुरू झाली याबद्दल चर्चा करूयात.
रविवारची सुट्टी आपल्या देशात कधी अंमलात आणली गेली?
भारतातील रविवारचा सुट्टीचा इतिहास –
मित्रांनो, रविवारच्या सुट्टीचे संपूर्ण श्रेय श्री नारायण मेघाजी लोखंडे या मराठी माणसाला जाते. खरं तर, जेव्हा आपला देश इंग्रजांचा गुलाम होता, तेव्हा सर्व मजुरांना सुट्टीशिवाय काम करावे लागले. यामुळे त्या काळी आठवड्यातील सात दिवसांपैकी कामगारांना एक दिवसही मिळाला नाही.
सुट्टी नसल्याने मजुरांपैकी कुणालाही आपल्या कुटुंबातील सदस्यांसमवेत वेळ घालवता येत नव्हता. आणि मजूराना विश्रांती वेळही मिळू शकत नव्हता.
तर अशा प्रकारे त्या वेळी कामगार नेते श्री नारायण मेघाजी लोखंडे यांनी ही समस्या ब्रिटीश सरकारसमोर मांडली. आणि ब्रिटिश सरकारला आठवड्यातून एक दिवस सुट्टी देण्याचे आवाहन केले.
परंतु ब्रिटिश सरकारने श्री नारायण मेघाजी लोखंडे यांची ही विनंती मान्य करण्यास नकार दिला. ब्रिटीश सरकारच्या या निर्णयाने श्री नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांबरोबर त्याचा निषेध केला.
रविवारची सुट्टी कधीपासून सुरू झाली?
मित्रांनो, हा निषेध अनेक दिवस सुरु राहीला होता. अखेरीस ब्रिटीश सरकारने 7 वर्षांच्या दिर्घ कालावधी नंतर कामगारांच्या हा संघर्षाचा स्वीकारावा लागला.
ब्रिटीश सरकारने 10 जून 1890 रोजी रविवारच्या सुट्टीचा आदेश दिला. आणि या दिवसापासूनच रविवारीही भारतात सुट्टी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यानंतर रविवारी, शाळा, कार्यालये, महाविद्यालये आणि बँका इत्यादी सर्वत्र सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रविवारीच्या सुट्टीचे सर्वात मोठे कारण म्हणजे जेव्हा माणूस सलग 6 दिवस काम करतो तेव्हा त्याला 7 व्या दिवशी विश्रांतीची आवश्यकता असते.
म्हणून रविवार हा विश्रांतीसाठीचा दिवस म्हणून निवडला गेला. सतत काम केल्यामुळे ताणतणाव आणि थकवा शरीरात येतो, त्यामुळे प्रत्येकाला विश्रांती साठी एक दिवस अवकाश मिळणे आवश्यक आहे.