तुम्ही पाणी पिण्यासाठी योग्य प्लास्टिक बॉटल वापरता आहात का..??


आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडाल..??

आपण प्लास्टिक ला कितीही टाळायचा प्रयत्न केला तरीही, हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. पण या प्लास्टिक चा दर्जा किंवा पत तुम्ही कशी ठरवावी..?? तुम्ही दररोज ज्या प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिता ती तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे की नाही हे तुम्ही कसे ओळखाल..???

चला तर मग हे तुम्ही नक्की वाचायला हवे…

आपण हल्ली पाणी पिण्यासाठी प्लास्टिक वॉटर बॉटलचा वापर करतो. एकतर ती रिकामी बिसलरी ची (मिनरल वॉटर) किंवा दुकानांतून, किंवा मॉल मधून खरेदी केलेली महागडी प्लास्टिक बॉटल असते.

बहुतेका लोकांचा असाच समज असतो की, दिसायला सुंदर आणि आकर्षक, महागडी बाॅटल आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित आहे. पण वस्तुस्थिती या उलट असते.

आपण कधी विचार केलाय का, या प्लास्टिक वॉटर बॉटलचं पाणी तुमच्यासाठी खरंच सुरक्षित आहे का..?? आज आम्ही आपल्याला याच प्लास्टिक वॉटर बॉटलच्या बाबत असे काही घातक सत्य सांगणार आहोत जे तुमच्या पासून नेहमी लपविण्यात आले आहेत.

मग कोणत्या प्लास्टिक बॉटल मधून पाणी पिणे योग्य आहे..??
यासाठी प्रथम प्लास्टिकचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत? हे जाणून घेवूयात.

खरंतर प्रत्येक प्लास्टिकची बॉटल एकसारखीच सुरक्षित नसते.

प्लास्टिकची बॉटल ही आरोग्यास धोकादायक अशी रसायन बाहेर टाकते. तुम्हाला हे ओळखण्यासाठी बॉटलच्या तळाशी असलेल्या विशेष चिन्हांकडे लक्ष द्यायचं आहे, तिकडे दाखवलेला त्रिकोण हे दर्शवितो की त्या बॉटलला बनविण्यासाठी कुठल्या प्रकारचं किंवा कुठल्या दर्जाचं प्लास्टिक वापरलं गेलं आहे.

प्लास्टिकच पत किंवा दर्जा ठरविण्यासाठी एक ग्रेडिंग प्रणाली आहे. प्लास्टीक तयार करताना वेगवेगळ्या प्रकारचे प्लास्टिक तयार केले गेलं आहे. आणि ते ओळखण्यासाठी खालील प्लास्टिक ग्रेड आहेत:

ग्रेड 1

लेबल असलेली बाटली (पीईटी किंवा पीईटीई) फक्त एका वापरासाठी सुरक्षित असते . सूर्य, उष्णता, ऑक्सिजन किंवा उच्च तापमानाच्या संपर्कात येताच अशा बाटलीतुन पाण्यामध्ये विषारी द्रव्य सोडली जातात.

ग्रेड 2, 4 व 5

पॉलीथिलीन (2 आणि 4) आणि पॉलीप्रॉपिलीनने (5 आणि पीपी) बनलेल्या बाटल्या पुन्हा, पुन्हा वापरांसाठी उपयुक्त आहेत. पण जर त्यात नेहमी थंड पाणी साठवून ठेवलं आणि त्यांना नियमितपणे निर्जंतुक करत राहिलं तरच त्या सुरक्षित असतात.

ग्रेड 3 व 7


3 किंवा 7 लेबल असणाऱ्या बाटल्या घेणं शक्यतो टाळा कारण त्यातून काही विषारी रसायने बाहेर टाकली जातात आणि ती तुमच्या पेयात समाविष्ट होतात. तसेच या बॉटल जास्त काळ सूर्यप्रकाशात राहिल्यास त्या पाण्यातून अथवा पेयातून आपल्याला गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

असे आहे तर मग कोणत्या ग्रेडची प्लास्टिकची बाटली ही आरोग्यास चांगली..??

खरे तर कोणत्याही प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी न पिणेच चांगले, तरीही..

मर्यादित वापरासाठी ग्रेड 2, 4 आणि 5 योग्य आहेत. (फक्त नियमितपणे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक)

तर ग्रेड 1, 3, 6, आणि 7 यांचा वापर टाळवा.

विशेष सूचना :

पाण्याच्या प्लास्टिकच्या बॉटल व्यतिरिक्त ईतर ठिकाणी सुद्धा प्लास्टिकचा वापर करीत असतो. या साठी आपण प्रत्येकाने एक चांगली सवय लावून घेने गरजेचे आहे की, प्लास्टिकची कुठलीही प्लास्टीक ची वस्तू खरेदी करतांना ती उलटी करुन त्रिकोणातील ग्रेड तपासून घ्यायचा असा प्रयत्न केल्याने तुमचा अभ्यासही वाढेल व तुम्ही स्वतःच्या आरोग्य बाबत सदैव जागरूक राहाल.