तुम्ही सुद्धा हे धोकादायक पासवर्ड ठेवलेले नाहीत ना..??

फोनपासून लॅपटॉपर्यंत आपला पासवर्ड हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. दिवसेंदिवस सायबर क्राईम वाढत चालला आहे. तुमचं अकाऊंट हॅक होऊ नयेसाठी वारंवार पासवर्ड बदलत राहणं, अधिक कठीण पासवर्ड ठेवणं असे अनेक पर्याय तुम्ही वापरु शकता. मात्र असं करुनही बऱ्याचदा आपलं अकाऊंट अगदी सहजपणे हॅक केलं जाऊ शकतं. आपण आळस म्हणून किंवा विसरू नये म्हणून सोपा पासवर्ड टाकतो. मात्र तुम्ही स्वत: असं करून हॅकर्सला आयती संधीच देत असतो.

? सायबर सिक्युरिटी ImmuniWeb कंपनीने केलेल्या संशोधनानुसार 2.10 कोटी अकांऊट साधारण 500 कंपन्यांच्या वेबसाईटसोबत जोडले गेले आहेत. यामध्ये 1.6 कोटी अकाऊंटवर वायरस सोडण्याचा किंवा हॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 49 लाख अकाऊंटचे पासवर्ड हे युनीक असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या अकाऊंटची सिक्युरिटी तोडून हॅक करणं शक्य नव्हतं. उरलेल्या सर्व लोकांचे अकाऊंट हॅक करणं अगदी सहज शक्य आहे. तुमचा पासवर्ड क्रॅक करुन त्याचा गैरउपयोग केला जाऊ शकतो किंवा तुमचे बँक डिटेल्स मिळवून खिशाला कात्री लागू शकते. अशा प्रकारचे अनेक धोके तुम्हाला आहेत. त्यामुळे तुम्ही जर पासवर्ड बदलला नसेल तर तातडीनं बदलणं आवश्यक आहे.

पासवर्डमध्ये एक कॅपिटल, अंक, कोडवर्ड, अक्षरांचा समावेश असेल तर तो क्रॅक करणं तुलनेनं कठीण होऊ शकतं असं तज्ज्ञ सांगतात. कंपनीने जारी केलेल्या यादीमधील साधारण पासवर्डचं स्वरुप काय आहे पाहा:-

000000

111111

112233

123456

12345678

123456789

1qaz2wsx

3154061

456a33

66936455

789_234

aaaaaa

abc123

career121

carrier

comdy

cheer!

cheezy

exigent

old123ma

opensesame

pass1

passer

passw0rd

password

password1

penispenis

snowman

!qaz1qaz

Soccer1

Student

Welcome

अशा प्रकारचे पासवर्ड असतील तर तुमचं आकाऊंट हॅक होण्याची संभावना नाकारता येणार नाही.

? पासवर्डबाबत तज्ज्ञांचं काय आहे मत आपण कोणताही पासवर्ड सेट करताना लक्षात राहिल हा एकच विचार करुन अगदी सोपा पासवर्ड ठेवतो. उदा. 12345, 00000 अशा पद्धतीचे पासवर्ड ठेवताना आपण हा विचार नाही करत की हॅकर्सचं काम आपण अगदी सोप करत आहोत. आपलं अकाऊंट अशा सोप्या पासवर्डमुळे हॅक होऊ शकतं.

सोशल मीडिया अकाऊंटवर अनेक जण घरातील सदस्य, बॉयफ्रेन्ड किंवा अगदी सोपी नावं टाकतात. जन्मतारीख आणि नाव या दोन्ही गोष्टी हॅक करणं अगदी सहज शक्य असल्यानं त्या पासवर्ड म्हणून ठेवू नयेत. याचा अंदाज हॅकर्स अगदी सहज लावू शकतो आणि तुमचं अकाऊंट हॅक होऊ शकतं.

Leave a Comment