तुम्ही झोपतांना तर करत नाही ना ही चूक : जाणून घ्या वास्तूनुसार कोणत्या दिशेने झोपणे आहे योग्य..??

मित्रांनो, आपल्या भारतीय वास्तुनियमांनुसार जर आपण रात्री झोपतांना या दिशेला झोपत असाल तर तुम्हाला आयुष्यात कधीही धनाची किंवा धान्याची कमतरता भासणार नाही, तर वास्तू शास्त्रानुसार चार दिशांपैकी कोणती एक दिशा झोपण्यासाठी योग्य आहे हे जाणून घेण्यासाठीच आजचा आपला हा लेख आहे.

मित्रांनो, झोपण्याशी संबंधित काही वास्तू नियम आपल्या भारतीय वास्तु शास्त्रात सांगितले गेले आहेत. बर्‍याच वेळा आपण दिवसभराचा शीण घालवण्यासाठी लवकर जेवण उरकून झोपण्याची तयारी करत असतो.

पण थकलो असल्यामुळे आपण दिशा वैगरे न बघता कोणत्याही दिशेला झोपी जात असतो. पण मित्रांनो, आपण या वास्तू नियमांकडे आपण दुर्लक्ष केल्याने आपणास बर्‍याच वास्तू सं’बंधित अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

भारतीय वास्तुशास्त्र असे म्हणते की तुम्ही ज्या दिशेला झोपत असाल तर , त्याचा तुमच्या आरोग्यावर सकारात्मक तसेच नकारात्मक आणि पर्यायाने आर्थिक परीस्थितीवर देखील परिणाम हा होत असतो.

म्हणूनच आपण स्वतःला योग्य दिशेला झोपायची सवय लावणे अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, चला तर मग झोपेच्या संबधित काही योग्य नियम तसेच दिशा आज आपण जाणून घेऊयात.

वास्तुशास्त्रा नुसार पूर्वेच्या दिशेकडे डोकं करून झोपणे हे शुभ मानले गेले आहे. या दिशेला जर डोकं ठेवून आपण झोपत असाल तर त्यामुळे सकारात्मकतेत वाढ होते.

पूर्वेकडील दिशेला झोपल्यामुळे आपल्या वाचनातही एकाग्रता वाढते. वास्तु शास्त्राच्या मते, जर तुम्ही पश्चिम दिशेकडे झोपत असाल तर ते देखील फायदेशीर आहे. पश्चिम दिशेने झोपल्यामुळे आपल्या यश आणि कीर्तीमध्ये वाढ होत असते.

मित्रांनो, वास्तु नियमांनुसार उत्तर दिशा जरी एक अतिशय शुभ दिशा मानली जाते, परंतु आपल्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून या दिशेने झोपणे कधीही योग्य मानले नाही. या दिशेला झोपल्या मुळे आपल्या शरीरात अनेक रोग उद्भवतात.

तसेच दक्षिणे दिशेकडे डोकं करून झोपल्यामुळे देखील आपल्याला बराच फायदा होतो. या दिशेने झोपल्यामुळे नकारात्मकता दूर होते. तसेच चुकीचे विचार आणि तणाव देखील दूर होतो.

याचबरोबर दक्षिण दिशेने झोपल्यामुळे घरामध्ये आनंद आणि समृद्धीही वाढते. कोणत्याही प्रकारची आर्थिक अडचण आणु पैशांची कमतरता भासत नाही.

वास्तु नियमांनुसार झोपण्याचे नियम –

१) तुटलेली अवस्थेतील खाट, घाणेरडे अंथरुण, किंवा बेडशीट आणि उष्ट्या तोंडासह कधीही झोपायला जाऊ नये.

२) झोपताना कधीही निर्वस्त्र झोपू नये.

३) सुन्या पडलेल्या घरामधे, स्मशानभूमी, मंदिराच्या गर्भगृहात, तसेच अंधार असलेल्या खोलीत कधीही झोपू नये.

टिप – वरील लेख केवळ धार्मिक मान्यतेचा आधारावर तयार करण्यात आला आहे. तरीही या माध्यमातून आमचा कोणतीही अंधश्रद्धा पसरविण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा कोणताही उद्देश नाही. मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा,शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा.

Leave a Comment