तुम्हीसुद्धा रात्री उठून पाणी पिता का.? तुम्हालाही आहे रात्री उठून लघवीला जाण्याची सवय.? तर पश्र्चाताप होण्याआधी हे एकदा तरी नक्कीच वाचा आणि या चुका टाळा.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. नमस्कार मंडळी, जर तुम्हालाही रात्री उठून पाणी पिण्याची सवय आहे. किंवा रात्री उठून लघवीला जाण्याची सवय असेल तर आणि तूम्ही जर ही चूक करत असला तर तुमच्याही जीवाला यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून रात्री पाणी पिण्याची सवय असेल किंवा रात्री लघवीला जाण्याची सवय असेल तर कोणती चूक आपण केली नाही पाहिजे आणि कोणती काळजी घेतली पाहिजे या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.

मानवी शरीरामध्ये सुमारे ७०% पाणी असते आणि पाणी कधी, किती आणि कसे प्यायचे यावर आपले ८०% आजार हे अवलंबून असतात. रात्री पाणी पिने ही जर तुम्हाला सवय असेल आणि तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने पाणी पीत असाल तर त्याचे परिणाम काय होतात? आणि रात्री उठून पाणी पिणं हे चांगल की वाईट?

तसेच त्याचे दुष्परिणाम काय आहेत? त्याचबरोबर तुम्ही जर रात्री लघवीला उठून जात असाल तर ते इतके घातक का आहे? आणि तरी लघवीला लागल्यावर नेमके काय केले पाहिजे हे सर्व सांगण्यामागचे कारण म्हणजे, आपल्या कुटुंबातील एक अतिशय जवळचा, धडधाकट, कोणताही आजार नसलेला, रोज व्यायाम करणारा एक तरुण, एका साध्या चुकीमुळे ब्रेन स्ट्रोक मुळे गेला असे अनेक उदाहरणे आहेत.

त्यामुळेच झोपेतून उठल्यानंतर लगेचच २ ते ३ मिनिटे आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही तुमचा आणि तुमच्या प्रियजनांचा जीव वाचवू शकतात. माणूस हा कोणतीही चुक जाणूनबुजून करत नाही.

परंतु बेसावध आणि नकळतपणे अनेक चुक त्याच्या हातून होत असतात आणि याची किंमत त्याला मोजावी लागत असते. बऱ्याच व्यक्तींना पाणी पिण्याची सवय असते, तर काही जण अगदी उशाला पाणी घेऊन झोपत असतात आणि उठून लगेच पाणी पीत असतात.

तसं पाहिलं तर पाणी हे शरीरासाठी खूप आवश्यक असते आणि रात्री झोपल्यावर जर आपल्या शरीरात पाणी कमी पडत असेल तर पाणी प्यावं परंतु हे पाणी कसं प्यावं हे खूप महत्वाचं आहे. रात्री उशाला पाणी घेऊन झोपणे आणि लगेच उठून पाणी पिने हे शरीरासाठी अत्यंत घातक असते.

म्हणून रात्री झोपेमधे जरी तुम्हाला तहान लागलेली असेल, पाणी पिण्याची गरज असेल तर तुम्हाला त्या आधी व्यवस्थितरीत्या २ ते ३ मिनिटे आधी उठून बसायचे आहे आणि पूर्णपणे आपण जागे झालेलो आहोत याची आपल्याला खात्री झाली पाहिजे आणि त्या नंतरच आपल्याला पाणी प्यायचे आहे.

अर्ध्या झोपेत आपल्याला पाणी प्यायचे नाही आहे आणि पाणी पिल्याबरोबर लगेच झोपायचे सुद्धा नाही आहे, तर त्यांनतर एक ४ ते ५ मिनिटे आपल्याला तसेच बसून राहायचे आहे. तसेच आपण जे पाणी पिणार आहेत ते पाणी एकदम गार नसले पाहिजे, तर ते पाणी एकतर कोमट असेल पाहिजे किंवा नॉर्मल असेल पाहिजे.

जर तुम्ही गार पाणी पीत असाल तर तुम्हाला एलर्जी आणि वात होण्याचा त्रास होऊ शकतो, त्या बरोबरच कॉलेस्ट्रॉल सुद्धा वाढू शकते. परंतु जर तुम्ही सांगितल्याप्रमाणे नॉर्मल किंवा कोमट पाणी पिले तर ते तुमच्या दातांना देखील चांगले असते आणि त्यामुळे एसिडीटी देखील कमी होते. म्हणून रात्री पाणी पिणे चांगले आहे परंतु ते आपल्याला व्यवस्थितपणे जागे होऊन प्यायचे आहे.

आता बऱ्याच जणांना रात्री लघवीला जाण्याची सवय असते. रात्री लघवी लागली आणि लघवीला गेल्यानंतर मृत्यू झाला अश्या अनेक घटना तुम्ही पहिल्या असतील किंवा ऐकल्या असतीलच. तर रात्री लघवीला गेल्यानंतर मृत्यू का होतो, तर रात्री जेव्हा आपण झोपलेलो असतो तेव्हा मेंदूपर्यंत रक्ताचा पुरवठा हा अगदी संथ गतीने सुरू असतो.

आणि यामधे जर तुम्ही लघविसाठी पटकन उठून उभे राहिले तर यामुळे तुमच्या मेंदूला होणारा जो रक्तपुरवठा आहे तो मेंदूच्या दिशेने जात नाही आणि त्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा होत नाही. आणि हेच कारण आहे की ज्यामुळे ब्रेन स्ट्रोक येऊ शकतो, किंवा हृदयाला रक्तपुरवठा न झाल्यामुळे हृदयविकाराचा झटका सुद्धा येऊ शकतो.

म्हणून जर रात्री झोपल्यावर लघवी लागली तर त्यामधे घाबरण्याचे अजिबात कारण नाही, आपल्याला फक्त एक छोटीशी काळजी घ्यायची आहे. तर रात्री लघवीला जाण्याआधी आपण झोपेतून उठून आधी व्यवस्थित बसायचे आहे. आपल्या हातावरून, आपल्या पायावरून आपले हात फिरवायचे आहे. हे असे करून आपल्याला रक्तपुरवठा सुरळीत करायचा आहे.

त्याच बरोबर उठल्यानंतर आपल्या दोन्ही कानामागे आपल्या हाताच्या बोटांनी हलके हलके खालीवर असे चोळायचे आहे. यामुळे तुमच्या शरीरामधील संपूर्ण रक्तपुरवठा हा सुरळीत होईल, तुमचा बीपी एकदम व्यवस्थित राहील, मेंदूपर्यंत रक्तपुरवठा व्यवस्थित होईल आणि तुम्हाला कुठलाही धोका राहणार नाही. म्हणून जर तुम्ही रात्री लघवीला उठत असाल तर या गोष्टींची विशेष काळजी घ्या आणि तुमच्या प्रियजनांना सुद्धा अवश्य सांगा.!!

तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Comment