तुने किसी मराठे को हराया है क्या.? ही म्हण आजही अफगाणिस्तानात सर्रास म्हटली जाते.. जाणून घ्या या मागचा इतिहास..

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… ‘तू कोणत्या मराठ्याला हरवलं आहे?’, ‘तू तर असं बोलतोयस की, जसं काय तू मराठ्यांचा पराभव केलाय.’ ही वाक्ये अफगाणिस्तानात आजही अगदी सहज बोलली जातात. यावरून असं लक्षात येतं की, अफगाणिस्तानात आजही मराठ्यांच्या पराक्रमाची चर्चा होते. पण ही चर्चा का होते? असं नेमकं काय घडलं होतं.?

अफगाणिस्तानात मराठ्यांची चर्चा काही आत्ताच होत नाहीये, तर ती गेल्या कित्येक वर्षांपासून होतेय. या मागचं कारण म्हणजे पानिपतचं तिसरं युद्ध. हे पानिपतचं युद्ध इतकं भयंकर होतं की त्याचे किस्से आजही भारतात आणि अफगाणिस्तानात सांगितले जातात.

त्या काळातली मराठ्यांची ताकद पाहिली तर, मराठा साम्राज्याला पराभूत करणं तसं खूपच अवघड होतं. पण काही गोष्टींमुळं मराठे या युद्धात पराभूत झाले. मराठ्यांना पराभूत करणं म्हणजे खूपच अवघड काम होतं, अशा आशयातून ही वाक्य तिथं बोलली जात असावीत. तेव्हा अहमदशाह अब्दालीच्या मनात मराठ्यांची इतकी जबरदस्त दहशत बसली होती, की त्याचा या युद्धात विजय झाला असला, तरी पुन्हा मराठ्यांवर आक्रमण करणार नाही अशी शपथच त्याने घेतली होती.

तेव्हा मराठ्यांच्या या शौर्याची चर्चा फक्त अफगाणिस्तानातच नाही, तर संपूर्ण जगभरात झाली होती. मराठ्यांचा पराभव करणारा अहमदशाह अब्दाली अफगाणिस्तानातला पहिला शासक मानला जातो. त्याला आधुनिक अफगाणिस्तानचा जनक देखील म्हटलं जातं. त्यानेच स्थापन केलेलं राज्य म्हणजे आजचा अफगाणिस्तान.

अब्दालीच्या याच अफगाणिस्तानवर सध्या तालिबान ही दहशतवादी संघटना राज्य करतेय. तालिबानने दहशत पसरवत अफगाणिस्तानवर आपला ताबा मिळवला. अफगाणिस्तानातली राष्ट्रपती भवन, संसद, सरकारी कार्यालये अशी सगळी महत्त्वाची ठिकाणं तालिबानने ताब्यात घेतली. आणि आज अफगाणिस्तानातले सगळे नियम तालिबानच्या म्हणण्यानुसार चालतात. तेव्हा तालिबानने राष्ट्रपती भवनात एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी दिसलेल्या राष्ट्रपती भावनातल्या एका फोटोची चांगलीच चर्चा झाली होती. हा फोटो होता अहमदशाह दुराणी म्हणजेच अहमदशाह अब्दाली याचा.

अहमदशाह अब्दालीला अफगाणिस्तानात आजही देव मानलं जातं. अहमदशाहला बाबा, राजा, मोत्यांमधला सर्वोत्कृष्ट मोती अशा अनेक उपाधी दिल्या जातात. काबूलमध्ये राष्ट्रपती भवनात असलेल्या फोटोत अहमदशाह अब्दाली एका फकीरासमोर झुकून त्याचा आशीर्वाद घेताना दिसत आहे. अब्दालीच्या राज्याभिषेकाचा हा फोटो असल्याचं म्हटलं जातं. अफगाणिस्तान हा देश अनेक टोळ्या, तांडे आणि वस्त्यांचा मिळून बनलेला आहे. त्याचीच काहीशी झलक या फोटोमधून दिसते.

या टोळ्यांमध्ये राहणारे लोक काही सार्वजनिक ठराव करण्यासाठी तेव्हा एक सभा घ्यायचे. त्याला लोया जिर्गा असं म्हटलं जातं. याच लोया जिर्गाने अहमदशाह अब्दालीला 1947 मध्ये राजा म्हणून घोषित केलं. कंदाहार ही त्याच्या साम्राज्याची पहिली राजधानी होती. कंदाहारच्या एका मशिदीमध्ये त्याचा राज्याभिषेक पार पडला होता. विशेष म्हणजे वयाच्या फक्त 25 व्या वर्षी अब्दाली तिथला राजा झाला होता. अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती भावनातला हा फोटो तेव्हाचंच वर्णन करणारा आहे. भारतातल्या काही स्थानिक राजांनी मराठ्यांना रोखण्यासाठी अब्दालीला बोलावलं होतं. त्याच संघर्षातून तेव्हा पानिपतचं तिसरं युद्ध झालं होतं. हे युद्ध इतकं भयंकर होतं की अब्दाली आणि मराठे या दोघांचं या युद्धात प्रचंड नुकसान झालं होतं. याचे दूरगामी परिणाम दोन्ही देशांवर झाले होते. मराठ्यांनी या युद्धात अक्षरशः जीवाची बाजी लावली. मात्र या युद्धात ,मराठ्यांचा पराभव झाला. काही मराठा सैनिक उत्तर भारतातल्या काही राज्यांमध्ये लपून राहिले. अहमदशाह अब्दालीचं सैन्य त्यांच्या मागावर होतंच. हरियाणाच्या जंगलांमध्ये हे मराठा सैन्य अनेक दिवस लपून बसलं होतं. जर तेअब्दालीच्या सैन्याच्या नजरेस पडलेच तर रोड राजाचे सैनिक आहोत असं सांगायचे. आणि तेव्हापासून त्यांना तिथं रोड मराठे म्हणूनच ओळखलं जातं. सावंत, भोसले, पाटील अशी आडनावं असणारे रोड मराठे हरियाणामध्ये आहेत. त्यांचा बोलण्याचा लहेजा काहीसा हरियाणवी असला, तरी त्यांच्या बोलण्यात आजही काही मराठी शब्द ऐकायला मिळतात.

आज इतकी वर्षे झाली तरी रोड मराठ्यांच्या मनात आपण मराठी असल्याचा तितकाच अभिमान दिसून येतो. ज्यांच्या घरावर भगवा दिसून येईल ते तिथल्या रोड मराठ्यांचं घर आहे हे लगेच ओळखू येतं. आजही अनेक मराठी परंपरा असणारे सण ते साजरे करतात. महाराष्ट्रात जरी पानिपत युद्धाला आपला मोठा पराभव मानलं जात असलं तरी, रोड मराठे मात्र दरवर्षी 14 जानेवारीला पानिपतच्या युद्धात पराक्रम गाजवणाऱ्या योद्धयांच्या स्मरणार्थ ‘शौर्य दिन’ साजरा करतात. त्या दिवशी त्यांना मानवंदना दिली जाते.

पानिपत युद्धाचं वर्णन आजही ऐकलं तरी आपल्या अंगावर काटा येतो. या युद्धाची चर्चा आजही दोन्ही देशात होते. अब्दालीला आजही अफगाणिस्तानात देव मानलं जातं. भारतीयांसाठी मात्र व एक क्रूर शासक होता. मात्र एक गोष्ट खरी की, अफगाणिस्तानात आजही मराठ्यांच्या पराक्रमाची चर्चा होते.

Leave a Comment