नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो, प्रत्येकाच्याच घरी कोणत्या ना कोणत्या कारणातून भांडण तंटा, वाद विवाद होत असतात. त्यामुळे आपल्या घरामध्ये अशांततेचे वातावरण निर्माण होते. प्रत्येक लोक या भांडणामुळे खूपच त्रस्त होतात. तर मित्रांनो अनेकांच्या घरी पती-पत्नीमध्ये भरपूर वादविवाद होत असतात. पती-पत्नीचे एकमेकांशी पटत नाही. या ना त्या कारणांवरून पती-पत्नीमध्ये भांडण होत असते.
तर मित्रांनो या पती-पत्नी मधील भांडण तंटे कमी करण्यासाठी, वैवाहिक कोणत्याही प्रकारच्या जर समस्या असतील त्या समस्या दूर करण्यासाठी आज मी एक तुम्हाला चमत्कारिक सेवा सांगणार आहे. जी केल्याने पती-पत्नीमध्ये कधीच भांडण होणार नाही. त्यांचा संसार सुखाचा होईल. वैवाहिक समस्या दूर होतील.
तर मित्रांनो हा उपाय नेमका कोणता आहे तो आता आपण जाणून घेऊयात. तर मित्रांनो पत्नीने किंवा पतीने ज्या कोणालाही याचा त्रास होत आहे त्यांनी दर गुरुवारी कडकडीत उपवास करायचा आहे. म्हणजेच तुम्ही पाणी, चहा किंवा सरबत पिऊ शकता. परंतु मित्रांनो तुम्ही मिठाचे किंवा तिखट पदार्थ सेवन करायचे नाहीत. तुम्हाला दिवसभर उपवास करायचा आहे.
संध्याकाळी सूर्यास्तानंतर स्वामी समर्थांच्या समोर बसून तुम्हाला कोणतेही एक फळ म्हणजेच जर पेरू असेल, चिकू असेल, सफरचंद असेल, केळी असेल यापैकी कोणतेही फळ तुम्हाला स्वामींच्या मूर्तीसमोर अर्पण करायचे आहे. आणि तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तीन माळी जप करायचा आहे. स्वामी समर्थांचा मंत्र झाल्यानंतर तुम्हाला तीन वेळेस पुरुष सूक्त वाचायचे आहे. पुरुष सूक्त वाचल्यानंतर तुम्हाला तीन वेळेस श्री सूक्त वाचायचे आहे.
म्हणजेच तीन माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप, तीन वेळेस पुरुष सूक्त आणि तीन वेळेस श्री सूक्त वाचायचे आहे. नंतर तुम्ही उपवास सोडायचा आहे. जे स्वामी समर्थांना तुम्ही फळ अर्पण केलेले आहे ते फळ तुम्ही घरातील सर्वांना प्रसाद म्हणून द्यायचे आहे. मित्रांनो हा उपाय तुम्हाला दर गुरुवारी करायचा आहे म्हणजेच कमीत कमी 11 गुरुवार तरी तुम्हाला हा उपाय करायचा आहे.
हे व्रत केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होऊन पती-पत्नीमध्ये प्रेम वाढेल. जर मित्रांनो पती-पत्नीमध्ये वाद होत असतील, एकमेकांबरोबर पटत नसेल तर हा उपाय केल्याने या सर्व त्रासातून तुम्हाला जरूर सुटका मिळेल आणि पती-पत्नी मधील नाते हे खूपच घट्ट बनेल. तर मित्रांनो हा चमत्कारिक उपाय तुम्ही अवश्य करून पहा.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!